7th Pay Commission: दिवाळीपूर्वी वाढणार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, 'या' राज्यांनी केली घोषणा; महाराष्ट्र आहे का त्यात? घ्या जाणून

ही घोषणा करणाऱ्या राज्यांमध्ये पंजाब हे राज्य नुकतेच समाविष्य झाले आहे. दरम्यान, या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा मात्र समावेश नाही.

7th Pay Commission | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी सरकारी कर्मचार्‍यांचा (States Government Employees) महागाई भत्ता (Dearness Allowance ) वाढवण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा करणाऱ्या राज्यांमध्ये पंजाब हे राज्य नुकतेच समाविष्य झाले आहे. दरम्यान, या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा मात्र समावेश नाही. दरम्यान, केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ केली आहे. त्या पाठोपाठ राज्य सरकारांनीही महागाई भत्यात वाढ केली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. महागाई भत्त्तायत वाढ करणारी राज्ये खालील प्रमाणे.

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh)- उत्तर प्रदेश सरकारने 1 जुलैपासून राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत 38% पर्यंत वाढवली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यास दिवाळी भेट म्हणून, राज्य सरकारने देखील 6,908 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला. (हेही वाचा, 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 'गूड न्यूजचा' डबल धमाका, 'या' कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 212% पर्यंत वाढवला; घ्या जाणून)

हरियाणा (Haryana)- हरियाणा सरकारने या आठवड्याच्या सुरुवातीला 7 व्या वेतन आयोगाच्या संरचनेनुसार पगार घेणाऱ्या राज्य सरकारी कर्मचार्‍यांसाठी महागाई भत्ता (DA) मध्ये 4% वाढ करण्याची घोषणा केली. 1 जुलै 2022 पासून मूळ वेतनाच्या विद्यमान 34% वरून 38% डीए वाढवण्यात आला आहे. वाढीव भत्ता ऑक्टोबरच्या पगारासह दिला जाईल तर जुलैपासून तीन महिन्यांची थकबाकी नोव्हेंबरमध्ये देय होणार आहे.

छत्तीसगड (Chhattisgarh)- छत्तीसगडमधील राज्य सरकारी कर्मचार्‍यांसाठीचा महागाई भत्ता (DA) 5% ने वाढवून तो 33% वर नेला आहे. ताज्या वेतनवाढीचा सुमारे 3.80 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. ही दरवाढ ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे.

झारखंड (Jharkhand)- झारखंड सरकारने राज्य सरकारी कर्मचार्‍यांसाठीचा महागाई भत्ता (DA) आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता (DR) 4% ने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, जो या वर्षी 1 जुलैपासून विद्यमान 34% वरून 38% वर आणला आहे. या निर्णयामुळे सुमारे दोन लाख राज्य सरकारी कर्मचारी आणि 1.35 लाख निवृत्ती वेतनधारकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.

दिल्ली (Delhi)- केंद्राच्या निर्णयानुसार, दिल्ली सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ करण्याचा आदेश जारी केला.

राजस्थान (Rajasthan)- केंद्र सरकारच्या घोषणेनंतर राजस्थान सरकारने राज्य कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ मंजूर केली. ताज्या वाढीमुळे राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्ता 1 जुलैपासून लागू होऊन 38% झाला आहे.

ओडिशा (Odisha)- ओडिशा सरकारने आपल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याची घोषणा सप्टेंबरमध्ये केली आहे. 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार्‍या डीए 31 टक्क्यांवरून 34 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मंजुरी दिली. या वाढीमुळे सुमारे चार लाख कर्मचारी आणि 3.5 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार आहे.