7th Pay Commission: मोदी सरकारच्या कॅबिनेट बैठकीत आज 50 लाख कर्मचार्‍यांना खुषखबर मिळण्याची शक्यता; पगारात होणार भरघोस वाढ?

यासाठी सरकारी यंत्रणेकडून विशेष पाऊलं उचलली जात असल्याचं समजले आहे.

Indian Currency | (Photo Credits: PTI)

दिल्ली मध्ये आज (19 नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थित पार पडणारी केंद्रीय कॅबिनेट बैठक (Union Cabinet Meeting) खास ठरणार आहे. प्रामुख्याने केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी या कॅबिनेट बैठकीतून  काही दिलासादायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून सरकारी कर्मचार्‍यांना सातवं वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार आता सुमारे 50 लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी कामाची वेळ (Working Hours) वाढवण्याचा आणि किमान वेतन (Basic Salary)  वाढवण्यावर सरकार विचाराधीन आहे. यासाठी सरकारी यंत्रणेकडून विशेष पाऊलं उचलली जात असल्याचं समजले आहे. त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये त्यावर शिक्कामोर्तब होतं का? हे पाहणं उत्सुकतेचं आहे. 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 8,000 रुपये वाढ होण्याची शक्यता.

 मीडीया रिपोर्टनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार्‍या आजच्या कॅबिनेट बैठकीत केंद्रीय कर्मचार्‍यांना किमान वेतन 8 हजार रूपये वाढवून मिळण्याची शक्यता आहे. त्यावर आज मोदी सरकार एकत्र निर्णय घेऊन त्यावर शिक्कामोर्तब करू शकतील. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचे किमान वेतन 18,000 रूपये आहे. जर आज किमान वेतन वाढवण्याला मंजुरी मिळाल्यास ते 26,00 0 रूपये होण्याची शक्यता आहे. मागील अनेक वर्षांपासून केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांनी यासाठी मागणी केली होती.

ऑक्टोबर 2019 म्हणजे मागील महिन्यातच केंद्र सरकरने कर्मचार्‍यांना महागाई भत्त्यामध्ये 5% वाढ दिली होती. त्याचा फायदा सुमारे 1 कोटी कर्मचार्‍यांना मिळाला होता. यापूर्वी डीए मध्ये केवळ 2-3% वाढ केली जात असे. मात्र यंदा 5% वाढ केल्याने महागाई भत्ता 12 वरून 17% झाला आहे.