ऐकावे ते नवलंच! 70 वर्षीय सासऱ्याचा 28 वर्षीय सुनेवर जडला जीव; समाजाची पर्वा न करता मंदिरात केले लग्न- Reports

स्थानिक माध्यमांनी या दोघांचा विवाह झाल्याचा दावा केला असला तरी, पोलिसांनी त्यांच्या लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पोलीस निरीक्षक जेएन शुक्ला यांनी सांगितले की, कैलाश यांचे त्यांच्या विधवा सुनेशी लग्न झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना ही बातमी समजली.

ऐकावे ते नवलंच! 70 वर्षीय सासऱ्याचा 28 वर्षीय सुनेवर जडला जीव; समाजाची पर्वा न करता मंदिरात केले लग्न- Reports
सासरा-सून लग्न (संग्रहित संपादित प्रतिमा)

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील (Gorakhpur) एक लग्न सध्या देशात चर्चेत आहे. या लग्नात वराचे वय 70 वर्षे आणि वधूचे वय 28 वर्षे आहे. वरवर पाहता ही सामान्य गोष्ट वाटू शकते, मात्र या वधू-वरांचे आधीचे नाते समजल्यावर तुम्हाला नक्क्कीच आश्चर्य वाटेल. तर अहवालानुसार, गोरखपूरमध्ये 70 वर्षीय सासऱ्याने आपल्या 28 वर्षीय सुनेशी लग्न केले आहे. दोघांनी मंदिरात लग्न केले आणि जेव्हा त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले तेव्हा लोकांना याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूरच्या बड़हलगंज कोतवाली भागातील छापिया उमराव गावात राहणारे 70 वर्षीय कैलाश यादव यांनी आपल्या मुलाची पत्नी पूजासोबत लग्न केले. पूजा 28 वर्षांची आहे. कैलास हे पोलीस ठाण्यात चौकीदार म्हणून काम करायचे. कैलाशच्या पत्नीचे 12 वर्षांपूर्वी निधन झाले होते. दोघांना चार मुलगे होते, त्यापैकी तिसऱ्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या मुलाची पत्नी पूजा आहे, जिच्याशी तिच्या सासऱ्यांनी म्हणजेच कैलाश यांनी लग्न केले आहे.

तर आपल्या मुलाच्या मृत्युनंतर कैलाश यांनी आपली विधवा सून म्हणजेच पूजाचे दुसरे लग्न लावून दिले, पण सून दुसऱ्या घरात सुखी राहू शकली नाही. काही वेळाने पूजा आपल्या पूर्वीच्या सासरच्या घरी परतली. दरम्यान सासऱ्याचे आपल्या सुनेवर प्रेम जडले. त्यानंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि समाजाची पर्वा न करता दोघांनी मंदिरात लग्न केले. आता हा विवाह संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय राहिला आहे. (हेही वाचा: कॉलेजमधील प्रत्येक विद्यार्थीनीला या ‘व्हेलेंटाईन्स डे’ला बॉयफ्रेन्ड असणं बंधनकारक, थेट कॉलेजच्या मुख्याध्यापकांनी काढली नोटीस)

स्थानिक माध्यमांनी या दोघांचा विवाह झाल्याचा दावा केला असला तरी, पोलिसांनी त्यांच्या लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पोलीस निरीक्षक जेएन शुक्ला यांनी सांगितले की, कैलाश यांचे त्यांच्या विधवा सुनेशी लग्न झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना ही बातमी समजली. मात्र त्यांचे खरेच लग्न झाले आहे की कोणीतरी फोटो एडीट केला आहे याचा तपास सुरू आहे. कैलाश यांनी यापूर्वी आपल्या सुनेचे दुसरे लग्न लावून दिले होते, तरी त्या पतीशी घटस्फोट घेऊनच सुनेने आता सासऱ्याशी लग्न केली आहे की नाही, याचाही तपास सुरू आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 27, 2023 04:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).