UP Horror: बकरी ईदच्या दिवशी 60 वर्षीय व्यक्तीने बकरीऐवजी स्वत:चा गळा चिरून दिली कुर्बानी; सुसाईड नोटमध्ये सांगितले मृत्यूचे कारण
60 वर्षीय ईश मोहम्मद यांनी बकरी ईदनिमित्त स्वतःची कुर्बानी दिली. ईश मोहम्मद यांनी त्यांच्या घराबाहेर बांधलेल्या झोपडीत गळा कापला. ईश मोहम्मद सुमारे एक तास झोपडीत त्रास सहन करत राहिले, परंतु जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा आवाज ऐकला तेव्हा ते घटनास्थळी धावले आणि त्यांना घाईघाईने गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले.
UP Horror: बकरी ईद (Bakrid 2025) निमित्त, उत्तर प्रदेशातील देवरिया येथून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने बकरीची कुर्बानी देण्याऐवजी स्वतःची कुर्बानी दिली आहे. या व्यक्तीने चक्क स्वत:चा गळा कापून कुर्बानी दिली. त्याला गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्येही नेण्यात आले, परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
देवरियाच्या गौरी बाजार पोलिस स्टेशन परिसरातील उधोपूर गावातील ही घटना आहे. 60 वर्षीय ईश मोहम्मद यांनी बकरी ईदनिमित्त स्वतःची कुर्बानी दिली. ईश मोहम्मद यांनी त्यांच्या घराबाहेर बांधलेल्या झोपडीत गळा कापला. ईश मोहम्मद सुमारे एक तास झोपडीत त्रास सहन करत राहिले, परंतु जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा आवाज ऐकला तेव्हा ते घटनास्थळी धावले आणि त्यांना घाईघाईने गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान ईश मोहम्मद यांचा मृत्यू झाला. (हेही वाचा - Ayodhya: अयोध्येत रस्त्याच्या कडेला गर्भवती महिले दिला बाळाला जन्म; आरोग्य केंद्राचा हलगर्जीपणा, रक्ताच्या कमतरतेमुळे घडली घडना (Video))
पत्रात केला मृत्यूचा उलगडा -
गळा कापण्यापूर्वी, ईश मोहम्मद यांनी गावातील मशिदीत नमाजही अदा केली. ते तेथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांना भेटले. यानंतर ते घरी आले. त्यानंतर त्यांनी अल्लाहचे स्मरण केले आणि गळा कापण्यापूर्वी एक पत्रही लिहिले. पत्रात ईश मोहम्मदने लिहिले की, 'एक व्यक्ती आपल्या घरात बकरीला मुलासारखा वाढवतो आणि नंतर त्याचा बळी देतो. ते देखील जिवंत प्राणी आहेत. बलिदान दिले पाहिजे. मी स्वतः अल्लाहच्या दूताच्या नावाने बलिदान देत आहे. मला कोणीही मारले नाही. मला शांततेने दफन करा. कोणाचीही भीती बाळगू नका. माझी कबर जिथे खुंटी आहे तिथेच असावी.'
दरम्यान, अतिरिक्त एसपी देवरिया अरविंद कुमार वर्मा यांनी सांगितेल की, 'यूपी 112 वर फोन करून माहिती देण्यात आली की गौरी बाजार पोलीस स्टेशनमधील एका व्यक्तीने गळा कापला आहे. या माहितीवर पीआरव्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि जखमी ईश मोहम्मद अन्सारी यांना रुग्णवाहिकेद्वारे देवरिया मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. त्याची गंभीर प्रकृती लक्षात घेता, त्याला चांगल्या उपचारांसाठी बीआरडी मेडिकल कॉलेज गोरखपूर येथे रेफर करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.'
(The above story first appeared on LatestLY on Jun 08, 2025 02:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

