चेंबूर, घाटकोपर, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि पवई येथील परिसरात गॅस गळती? अग्निशमन दलाकडून तपास सुरु; 6 जून 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
मुंबईचा पाऊस ते कोरोना व्हायरस, तसेच शिवराज्यभिषेक सोहळा ते निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड चे झालेले नुकसान आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
चेंबूर, घाटकोपर, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि पवई येथील रहिवाशांकडून संशयित गॅस गळती होण्याच्या काही तक्रारी आल्या आहेत, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली असून पुढील तपास सुरु केला आहे. ट्वीट-
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला येथील सोपोर भागातील एडीपोरा जवळ दहशतवाद्यांनी आज संध्याकाळी गोळीबार केला. दरम्यान एकाचा तरूणाचा मृत्यू झाला आहे. एएनआयचे ट्वीट-
कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजवला आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. मुंबईत आज आणखी 1 हजार 274 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 47 हजार 128 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्वीट-
महाराष्ट्रात आज नव्या 2739 कोरोनाबाधित रुग्णांची भर तर 120 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील COVID19 चा आकडा 37,390 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
नेपाळ मध्ये मागील 24 तासात कोरोनाचे 323 नवे रुग्ण आढळून आल्याने आता देशातील कोरोना रुग्णांची संख्या 3,235 वर पोहचली आहे. दिवसभरात एकूण 3 मृत्यूंची नोंद झाली असून देशात आजवर एकूण 13 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
आयुष्यात आपण पाहू शकणार नाही असे निर्णय मोदी सरकारच्या वेळी घेण्यात आले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. कारण मोदी सरकारला 6 वर्ष पूर्ण झाली असल्याच्या पार्श्वभुमीवर त्यांनी हे विधान केले आहे.
आज, 6 जून 2020 रोजी रायगडावर अत्यंत साधेपणाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४७ वा राज्याभिषेक दिनाचा सोहळा रंगणार आहे. आज सकाळपासूनच अनेक मान्यवर व शिवभक्तांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या इतिहासातील या सुवर्ण दिवसाच्या शुभेच्छा देत डिजिटल सेलिब्रेशन सुरु केले आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभक्तांनी कुठेही रॅली किंवा कार्यक्रमाचे आयोजन करू नये शिवाजी महाराजांना आपल्या मनातून आणि घरातूनच मानवंदना द्यावी असे आवाहन अनेक राजकीय मंडळींनी केले आहे. Shivrajyabhishek Sohala 2020 Messages: शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त मराठी संदेश, Facebook, WhatsApp वर शेअर करून शिवरायांना द्या मानवंदना!
दरम्यान, 24 तासांच्या गैरहजेरी नंतर आता मुंबई सह उपनगरात सुद्धा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज सकाळपासून मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली, या सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पूर्व- मध्य अरबी समुद्रात नव्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबई (Mumbai) आणि केरळात (Kerala) येत्या 8 किंवा 9 जून पासून पाऊस वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे.
दुसरीकडे निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रायगड, रत्नागिरी, दिवेआगार आणि अलिबाग- पालघर या भागात आता अनेक ठिकाणे उद्ध्वस्त होऊन पडली आहेत. अनेकांच्या घरांवरचे छपरं उडून गेल्याचे समजतेय. अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने मागील दोन दिवसांपासून वीज पुरवठा तसेच मोबाईल इंटरनेट कनेक्शन सर्व काही खंडित झाले आहे. या परिस्थितीचा काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेत नुकसान भरपाई म्हणून या भागांसाठी 100 कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे कोरोना व्हायरस अशी सध्या महाराष्ट्राचे स्थिती झाली आहे. कालच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात सद्य घडीला 80,229 कोरोनाग्रस्त आहेत. कालच्या दिवसभरात राज्यात 139 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात 2436 जणांची कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत 2849 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तसेच 35,156 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर देशातील कोरोनाबाधितांची संख्या काळ २ लाख २२ हजारच्या पार गेली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)