Coronavirus: अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे 10 हजार नागरिकांचा मृत्यू ; 6 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

कोरना व्हायरस बाधित रुग्णांची देशभरातील संख्या, त्यात होणारी वाढ, घट. केंद्रीय आणि राज्य आरोग्य मंत्रालय आदींकडून त्याबाबत दिले जाणारे अद्ययावत तपशील, माहिती हे सर्व लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवले जाणार आहे.

07 Apr, 05:25 (IST)

अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे 10 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

United States #Coronavirus deaths top 10,000: AFP news agency quoting Johns Hopkins tracker

— ANI (@ANI) April 6, 2020

07 Apr, 05:21 (IST)

ब्रिटनेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन तुम्ही लवकरच रुग्णालयातून तंदुरुस्त बरे होऊन येणार असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा व्यक्त केली आहे.

07 Apr, 05:16 (IST)

तेलंगणा येथे कोरोना व्हायरसचे आणखी 30 रुग्ण आढळल्याने आकडा 308 वर पोहचला असून 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

07 Apr, 05:08 (IST)

फ्रान्स येथे कोरोनामुळे आणखी 833 जणांचा मृत्यू झाल्याने आकडा 8911 वर पोहचल्याची माहिती AFP न्यूज यांनी दिली आहे. 

07 Apr, 04:36 (IST)

लॉकडाउनच्या काळात अवैध मद्य विक्री केल्याने राज्य उत्पादन शुक्ल विभागाने 13 दिवसात 1429 गुन्हांची नोंद तर 541 आरोपींना अटक करण्यात आले आहे. तसेच 43 लाख रुपयांचा मुद्देमाल ही जप्त केल्याची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. 

07 Apr, 04:08 (IST)

नागपूर येथे कोरोना व्हायरसमुळे 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

07 Apr, 03:35 (IST)

दिल्ली येथे 525 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यामधील 329 जण हे तबलीगी जमातीचे आहेत.  तर कोरोना व्हायरसमुळे 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

07 Apr, 03:25 (IST)

न्यूयॉर्क येथे कोरोना व्हायरसमुळे आणखी 599  जणांचा मृत्यू झाला आहे.

07 Apr, 03:01 (IST)

महाराष्ट्रातील पुणे येथे कोरोना व्हायरसचे नवे 37 रुग्ण आढळून आल्याने आकडा 141 वर पोहचला आहे.

07 Apr, 02:50 (IST)

कोरोना व्हायरसमुळे 38 वर्षीय गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती वसई-विरार महापालिकेने दिली आहे. 

07 Apr, 02:12 (IST)

महाराष्ट्रात 120 नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 868 वर पोहचली आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.


 

07 Apr, 01:37 (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे 'मातोश्री' निवासस्थान सीलबंद करण्यात आल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे BMC ने स्पष्ट केलं आहे.

07 Apr, 01:10 (IST)

Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानाजवळील चहा विक्रेत्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मातोश्री परिसरात कोरोना रुग्ण आढल्याने एकच खळबळ उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मातोश्रीचा परिसर सील करण्यात आला आहे.

07 Apr, 01:00 (IST)

गेल्या 24 तासांत भारतात 704 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 4281 वर पोहचली आहे. यातील 3851 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच 318 जणांना उपचार देऊन डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत देशात 111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय गेल्या 24 तासांत 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.

 

07 Apr, 24:45 (IST)

देशात कोरोनामुळे 111 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोना बाधितांची संख्या 4 हजार 281 वर पोहचली आहे.

 

07 Apr, 24:08 (IST)

Coronavirus: मुंबईत 57 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोना बाधितांची संख्या 490 वर पोहचली आहे. आज एकूण 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 5 जणांना आज डिस्चार्ड देण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.

 

06 Apr, 23:24 (IST)

दिल्लीत 24 तासांत 20 नव्या कोरोना प्रकरणांची नोंद; एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 523 वर पोहचली आहे. यातील 10 रुग्णांनी दिल्लीतील निजामुद्दीन येथील मकरज कार्यक्रमाला हजेरी लावली होती. गेल्या 24 तासांत एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माहिती दिली आहे.

06 Apr, 22:34 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अवाहनाला प्रदिसाद देत दिवेलागण उपक्रमावेळी हवेत गोळीबार करणाऱ्या मंजू तिवारी यांना पादवरुन निलंबीत करण्यात आले आहे. मंजू तिवारी या भाजप महिला मोर्चा, बलरामपूर प्रदेशाच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्यावर हवेत गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

06 Apr, 22:21 (IST)

उपचार केलेल्या रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील तब्बल 42 डॉक्टर आणि 50 कर्मचारी क्वारंटाईन करण्यात आल आहेत. ज्या रुग्णावर डॉक्टरांनी उपचार केले तो रुग्ण एका अपघातात जखमी झाला होता. त्यामुळे त्याला डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

06 Apr, 22:07 (IST)

सीओव्हीआयडी 19 ची चाचणी करण्यासाठी तब्बल 5 लाख चाचणी किटसाठी ऑर्डर देण्यात आली आहे; 8 ते 9 एप्रिल रोजी अडीच लाख किट वितरित करण्यात येतील: आर गंगाखेडकर, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर)

Read more


कोरोना व्हायरस (Coranavirus) संकटामुळे राज्यासह देशभरात असलेली लॉकडाऊन (Lockdown) स्थिती. त्याचा आर्थिक, सामाजिक आणि त्यानंतर होणारा सांस्कृतीक परिणाम. दररोजची वाढणारी कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नरत असलेली महाराष्ट्र (Maharashtra), भारतासह जगभरातील आरोग्य यंत्रणा. ही यंत्रणा अधिक सक्षमपणे काम करावी यासाठी त्यांना अर्थपुरवठा करणारी जगभरातील राष्ट्रं आणि या सर्वांत घरातील दिवे बंद करुन देवे लाऊन उजेड पाडण्यासाठी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेल स्वागत. त्याला मिळालेला देशभरातील जनतेचा उत्साही आणि अतिउत्साही पाठिंबा... अशा काही प्रमुख मुद्द्यांवर उमटणाऱ्या क्रिया प्रतिक्रिया आज दिवसभरातील ठळक घटना, घडामोडींचे आकर्षण असणार आहे.

कोरोना व्हायरस संकटाशी केवळ भारतच नव्हे तर, जगभरातील अनेक देश सामना करत आहेत. खरेतर ते देश भारताच्या कितीतरी पटींनी गर्तेत आहेत. यात भारताचा शेजारी पाकिस्तानही आहे. दरम्यान, काश्मीर येथे पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आले. यात तीन जवानही शहीद झाले. आता हे घुसखोर दहशतवादी नेमके कोठून येत असतात हे जगाला माहिती आहे. कोरोनाशी सामना करता करता भारताच्या शेजाऱ्यांकडून सीमेवर काय उद्योग सरु आहेत, याबाबतही घडणाऱ्या घडामोडींकडे आज दिवसभरात लक्ष राहणार आहे.

दरम्यान, कोरना व्हायरस बाधित रुग्णांची देशभरातील संख्या, त्यात होणारी वाढ, घट. केंद्रीय आणि राज्य आरोग्य मंत्रालय आदींकडून त्याबाबत दिले जाणारे अद्ययावत तपशील, माहिती हे सर्व लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवले जाणार आहे. त्यामुळे ताज्या घटना, घडामोडी आणि त्यांबाबतच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगशी जोडलेले राहा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now