केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ; 5 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
लॉकडाऊन किती काळ चालणार, कसे हटवणार याबाबत सध्या तरी काही विशेष माहिती उपलब्ध नाही. या सर्व गोष्टींमुळे कोरोना व्हायरस, कोविड 19 आणि लॉकडाऊन याबाबत घडणाऱ्या घडामोडी, घटना, वृत्त यांबाबतची अद्यवावत माहिती ठेवावे वाटणे स्वाभाविक आहे. म्हणूनच लेटेस्टली मराठीच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये ही माहिती अद्ययावतपणे दिली जाणार आहे.
केंद्र सरकारने पेट्रोलवर प्रतिलिटर 10 रुपये तर, डिझेलवर 13 रुपये प्रतिलिटर उत्पादन शुल्क वाढविले आहे. तसेच हे शुल्क दरात झालेले बदल 6 मे 2020 पासून अंमलात येणार आहेत. एएनआयचे ट्वीट-
महाराष्ट्रात आजपासून लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. यादरम्यान, अनेक गोष्टींसाठी सूट देण्यात आली आहे. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेड, ऑरेंज आणि ग्रीन या तीनही झोनमध्ये दारुची दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे तळीरामांनी दारुच्या दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली आहे. यामुळे मुंबईत उद्यापासून दारू विक्रिला बंदी घातली आहे. तसेच किराणा दुकाने, मेडिकल यांसारख्या जीवनाश्यक वस्तूंच्या दुकानांना मुंबई महानगरपालिकेने परवानगी दिली आहे. एएनआयचे ट्वीट-
महाराष्ट्रात आजपासून लॉकडाऊन 3.0 सुरु झाले आहे. यादरम्यान, अनेक गोष्टींसाठी सूट देण्यात आली आहे. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेड, ऑरेंज आणि ग्रीन या तीनही झोनमध्ये दारुची दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सामाजिक अंतर आणि सॅनिटाइजरचा वापन न केल्याप्रकरणी पुण्यातील 9 दारुच्या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. एएनआयचे ट्वीट-
महाराष्ट्रात आज 841 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 34 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात 15 हजार 525 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
मुंबईत आज 635 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून 26 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 9758 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मुंबईत आतापर्यंत 387 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
Lockdown मुळे विविध जिल्ह्यांत आणि इतर राज्यांत अडकलेल्या आदिवासी मजुरांना त्यांच्या मूळ गावी आणण्यासाठी एसटी अथवा खासगी बसेसची व्यवस्था करणार. त्यासाठी आदिवासी विभागाच्या न्यूक्लियस बजेट योजनेमधून खर्च केला जाणार असल्याच आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी सांगितलं आहे.
भारतामध्ये कोरोना रुग्णाची 46,711 वर पोहोचली आहे. यातील 31,967 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 1,583 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने माहिती दिली आहे.
आंध्र प्रदेश: विशाखापट्टणममधील महिलांनी जिल्ह्यात लॉकडाऊन दरम्यान उघडलेल्या दारू दुकानांच्या विरोधात आज निषेध नोंदविला. भाजीपाला बाजारपेठा फक्त 3 तास खुल्या राहतात परंतु दारूची दुकाने 7 तास खुली ठेवण्यास कशी काय परवानगी आहे? असा सवालही आंदोलनकर्त्या महिलांनी विचारला. राज्य सरकारने लॉकडाऊन काळात मद्यविक्री करण्यास आणि दुकाने सुुरु करण्यास मान्यता दिली आहे.
देशातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 46,433 वर पोहोचली. गेल्या 24 तासात 3,900 कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची नोंद. अग्रवाल, सहसचिव, आरोग्य मंत्रालय यांची माहिती
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सींग कायम ठेवण्यासाठी, विवाह सोहळ्यात 50 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित करण्यास परवानगी नाही. तसेच मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी 20 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र आणण्याची परवानगी नाही, अशी माहिती पुण्य सलीला श्रीवास्तव, संयुक्त सचिव, गृह मंत्रालय यांनी दिली आहे.
आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम शहरात नागरिकांनीक दारु खरेदीसाठी दारुच्या दुकानापुुढे रांगा लावल्या. प्रचंड गर्दी झाल्याने लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सींग नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाले.
11 वर्षीय मुलासह कोरोना व्हायरस संक्रमित 3 रुग्णांचा पुण्यात मृत्यू झाला आहे. नव्या 118 रुग्णांसह पुण्याती कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 2,132 इतकी झाली आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या काँग्रेस शासीत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक घेणार आहेत. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे होणार आहे. कोरना व्हायरस परिस्थिती समजावून घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे वृत्त आहे.
कोरोना.. कोरोना.. कोरोना..! सकाळी झोपेतून उठल्या पासून रात्री झोपेपर्यंत कोविड 19 आणि कोरोना व्हायरस हे दोन्ही एकाच विषाणुची नावं आता परवलीचा शब्द झाली आहेत. प्रसारमाध्यमं, सोशल मीडिया आणि लोकचर्चा आदींमधून या शब्दाचा दिवसभरात उद्धार कधी, कुठे आणि किती वेळा याची गणतीच नाही. या विषाणूचा थेट मानवी आरोग्य आणि जीवन मरणाशी थेट संबंध येत असल्यामुळे असे घडताना दिसते. अद्याप तरी पृथ्वीवरील अखंड मानवजातीसमोर आव्हान बनलेल्या या विषाणूनर इलाज निघाला नाही. व्यक्तीव्यक्तीमधील प्रत्यक्ष संपर्कात काही फुटांचा दुरावा हाच सध्याच्या घडीचा काय तो उपाय. ज्याला सोशल डिस्टंन्सीग असा शब्द वापरला जातो आहे. हे सोशल डिस्टंन्सीग राखण्यासाठी जगभरातील देश लॉकडाऊन करुन बसले आहेत. लॉकडाऊन किती काळ चालणार, कसे हटवणार याबाबत सध्या तरी काही विशेष माहिती उपलब्ध नाही. या सर्व गोष्टींमुळे कोरोना व्हायरस, कोविड 19 आणि लॉकडाऊन याबाबत घडणाऱ्या घडामोडी, घटना, वृत्त यांबाबतची अद्यवावत माहिती ठेवावे वाटणे स्वाभाविक आहे. म्हणूनच लेटेस्टली मराठीच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये ही माहिती अद्ययावतपणे दिली जाणार आहे.
दरम्यान, देश आणि राज्यभरात असलेल्या लॉकडाऊनदरम्यान काय स्थिती आहे. लॉकडाऊनला टाळेबंदी असाही शब्दप्रयोग केला जात आहे. कालपासून म्हणजेच 4 मे पासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. या टप्प्यात लोकव्यवहार आणि इतर गोष्टींना काहीशी शिथिलता देण्यात आली आहे. जसे की, दुकाने, उद्योग, व्यवसाय, मद्यविक्री दुकाने वैगेरे सुरु ठेवण्यात येणार आहेत. पण, असे असले तरी ही दुकाने सुरु करण्याबाबत मुभा देण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टी पुन्हा एकदा स्थानिक प्रशासनावरच अवलंबून असणार आहेत.
राज्य आणि देश यांसोबतच जगभरात काय चालले आहे याबाबतही जाणून घेणे महत्त्वाचे जसे की, इटली या देशाला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. पण, आता इटलीलाही मागे टाकून अमेरिका हा कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेला सद्यास्थितीचा सर्वात मोठा देश ठरला आहे. महासत्ता असलेल्या देशाची ही अवस्था म्हणजे नक्कीच विचार करायला लावणारी गोष्ट. त्यामुळे आता महासत्ता अमेरिका आणि चीन यांच्यात एक नवाच संघर्ष सुरु झाला आहे. अमेरिकेला वाटते की चीनच्या वुहान प्रांतातील प्रयोगशाळांमधून कोरोना व्हायरस निर्माण करण्यात आला. हा व्हायरस पूर्णपणे मानवनिर्मित आहे. अर्थात चीनने अमेरिकेचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
कोरोनाच्या सर्व घटना, घडामोडी, लॉकडाऊन यांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जसे की मानवी आरोग्, ढासळती अर्थव्यवस्था, स्थलांतर, नागरिकीकरणाच्या समस्या असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. या सर्व प्रश्नांकडे महाराष्ट्र, भारत आणि जग कसे पाहते याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्याबाबतची माहिती, घटना, घडामोडी आदींबाबतचे अद्ययावत तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग सोबत जोडलेले राहा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)