Telangana Car Accident: तेलंगणातील यादद्री भुवनगिरी जिल्ह्यात वाहन तलावात पडल्याने 5 ठार, एक जखमी
पोचमपल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जलालपूर गावात कार तलावात पडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात (Accident) एक जण जखमी झाला आहे. कोथागुडेम ते पोचमपल्ली असा प्रवास करताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
Telangana Car Accident: तेलंगणातील (Telangana) यादद्री भुवनगिरी जिल्ह्यातील (Yadadri Bhuvanagiri District) पोचमपल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जलालपूर गावात कार तलावात पडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात (Accident) एक जण जखमी झाला आहे. कोथागुडेम ते पोचमपल्ली असा प्रवास करताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. सर्व पीडित एलबी नगर आरटीसी कॉलनीतील रहिवासी आहेत.
हर्षा, दिनेश, वामशी, बाळू आणि विनय अशी या अपघातातील मृतांची नावे असून ते सर्व एलबी नगर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या कारचा ताबा सुटल्याने ही गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन तलावात कोसळल्याने हा अपघात झाला. वालीगोंडा मंडलातील लक्ष्मपुरम गावातील एक तरुण अपघातावेळी कारमधून उडी मारण्यात यशस्वी झाला. पोचमपल्ली पोलिस स्टेशनच्या उपनिरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. (हेही वाचा -Kannauj Accident: लखनौ-आग्रा एक्सप्रेसवेवर डबल डेकर बसची टँकरला धडक; 8 ठार, 19 जखमी (Watch Video))
दरम्यान, पुण्यामध्ये ड्रंक-अँड-ड्राइव्हमुळे गुरुवारी बाणेरमध्ये 19-वर्षीय तरुणाने अनेक वाहनांना धडक दिली. त्यानंतर जमावाने कारवर दगडफेक केली. ननावरे अंडर पास सर्व्हिस रोडवर मद्यधुंद चालकामुळे स्कूल बससह चार वाहनांची समोरासमोर धडक झाली. संतप्त जमावाने वाहनावर दगडफेक केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही. (हेही वाचा - Raigad Car Accident: रायगड मध्ये कार कठडा तोडून नदीत कोसळली; पती-पत्नीचा जागीच मृत्यू)
बाणेर पोलिसांनी वाहन व चालक ऋतिक श्याम बनसोडे याला ताब्यात घेतले. मद्यसेवनाच्या स्थितीची पुष्टी करण्यासाठी बनसोडेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. बनसोडेने आधी शाळेच्या बसला धडक दिली आणि नंतर पाषाण रोडवर शिवशक्ती चौकात दुसऱ्या वाहनाला धडक दिली.
(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2024 03:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

