मध्य प्रदेश-छत्तीसगड महसूल गुप्तचर संचालनालयाच्या युनिटची कारवाई; 1 हजार 534 किलो गांजा जप्त, पाच जणांना अटक ; 5 जानेवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
मध्य प्रदेश-छत्तीसगड महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) युनिटने 4 जानेवारी 2021 रोजी रायपूरजवळ एका ट्रकमधून 1 हजार 534 किलो गांजा (गांजा) ताब्यात घेऊन 5 जणांना अटक केली आहे. ट्वीट-
मध्य प्रदेश: इंदूरमध्ये पोलिसांनी पाच जणांना अटक करत त्यांच्याकडून 70 किलो एमडीएमए ड्रग्स जप्त केला. हे देशातील ड्रग्सच्या सर्वात मोठ्या जप्तीपैकी एक असून याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शिवसेना-काँग्रेसचे सद्या नाटक कंपनीसारखे उद्योग सुरु आहेत, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवीस यांनी भाजप प्रदेश कार्यालय येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले आहेत. ट्वीट-
तांत्रिक बिघाडामुळे भारतीय वायुसेनेचा मिग 21 लढाऊ विमान आज संध्याकाळी राजस्थानच्या सूरतगडजवळ क्रॅश झाला. वैमानिक सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यशस्वी झाले. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश कोर्ट ऑफ इन्क्वायरीला देण्यात आले आहेत. ट्वीट-
कोल्हापूर व लगतच्या परिसरातील पंचगंगा नदीतील प्रदूषणाच्या मुद्दयावर चर्चेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली.
महाराष्ट्रात आज 3160 नवे रुग्ण आढळले असून 64 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 19,50,171 वर पोहोचली असून मृतांची संख्या 49,759 वर पोहोचली आहे.
राजस्थानमध्ये आज दिवसभरात 397 नवे रुग्ण आढळले असून कोरोना बाधितांची एकूण संख्या 3,10,675 वर पोहोचली आहे. तर 5 रुग्ण दगावले असून मृतांची एकूण संख्या 2,719 वर पोहोचली आहे.
मी सर्व कागदपत्रे दिली आहेत. आयकर विभागाकडे स्थापनेपासून ते आतापर्यंतची सर्व कागदपत्रे आहेत. त्यामुळे त्यांचे काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरे मी देईन असे रॉबर्ट वाड्रा यांनी मिडियाशी बोलताना सांगितले.
राष्ट्रपती कोविंद 29 जानेवारीला संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. येत्या 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.
ब्रिटनमध्ये नव्या कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने पसरत आहे. अशात आता पंतप्रधान बेरिस जॉन्सन यांनी ब्रिटनमध्ये संपूर्ण लॉकडाउन लागू करण्याची घोषणा केली आहे. या लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या नव्या प्रकाराला रोखण्यास मदत होणार आहे. या लॉकडाऊनची सुरुवात देशातील शाळांपासून होणार आहे. ब्रिटनमध्ये 6 जानेवारीपासून सर्व शाळा बंद करण्यात येणार आहेत.
दरम्यान, राज्यात पुढील महिन्यात 10 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. या निवडणुकीत शिवसेना आपलं स्थान बळकट करण्यासाठी गुजराती मतदारांना आवाहन करत आहे. यासाठी शिवसेनेने गुजराती मतदारांसाठी मेळावा आयोजित केला आहे. तसेच गुजराती मतदारांना साद घालण्यासाठी शिवसेनेने 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईन वापरली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
अरबी समुद्रात वाऱ्याच्या चक्रकार स्थितीमुळे राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. ऐन हिवाळ्यात पाऊस पडल्याने पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस राज्यातील काही भागाच ढगाळ वातावरण असणार आहे, असंही हवामान विभागाने सांगितलं आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)