Human Rights: शेतकरी आंदोलकांना आम्ही जास्तीत जास्त संयम बाळगण्याचे अवाहन करतो- मानवाधिकार आयोग.; 5 फेब्रुवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

06 Feb, 04:58 (IST)

भारतात सुरू असलेल्या शेतकरी निषेधांमध्ये अधिकाधिक आणि निदर्शकांना जास्तीत जास्त संयम बाळगण्याचे आम्ही आवाहन करतो. शांततापूर्ण असेंब्ली आणि अभिव्यक्ति हक्कांचे ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही संरक्षण केले जावे. सर्वांसाठी मानवाधिकारांबद्दल योग्य तेच न्याय्य तोडगा शोधणे अत्यंत आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया मानवाधिकार आयोगाने व्यक्त केली आहे.

06 Feb, 04:55 (IST)

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर खासदार डॉ. फौजिया खान आणि खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आल्याची अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री नवाब मलिक यांची घोषणा. अधिसूचना निर्गमित. ‘राज्यातील मुस्लिम संसद सदस्य’ या संवर्गातून या सदस्यांची नियुक्ती.

06 Feb, 04:39 (IST)

कर्नाटक: शिवमोगा पोलिसांनी गेल्या महिन्यात शिवमोगा जिल्ह्यातील हुनासोडो येथे एका उत्खननात झालेल्या स्फोटाच्या संदर्भात, जमीन मालकासह चार जणांना अटक केली आहे, यामध्ये कमीतकमी 5 जणांचा बळी गेला आहे.

06 Feb, 03:29 (IST)

जम्मू-काश्मीरमधील Pre-Paid ग्राहकांना संपूर्ण पडताळणीनंतरच मोबाइल इंटरनेट उपलब्ध होईल, असे सरकारच्या आदेशात म्हटले आहे.

06 Feb, 02:44 (IST)

दिल्ली सरकारने आज ईव्ही (Electric Vehicle) चार्जिंगसाठी देशातील सर्वात मोठी निविदा काढली असून, दिल्लीत 100 ठिकाणी चार्जिंग पॉईंटची तरतूद आहे. जेणेकरुन घराबाहेरही ईव्हीचा वापर केला जाऊ शकेल. वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे दिल्लीचे मंत्री सत्यंदर जैन यांनी सांगितले.

06 Feb, 02:21 (IST)

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखजी यांची कोविड19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ते यातून लवकर बरे व्हावेत ही सदिच्छा, अशा आशयाचे राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. ट्विट-

 

06 Feb, 01:38 (IST)

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. एएनआय वृत्त संस्थेने याबाबत माहिती दिली आहे. ट्विट-

 

 

06 Feb, 01:13 (IST)

मणिपूर येथ आज नव्या 11 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, गेल्या 24 तासात 11 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ट्वीट-

 

06 Feb, 24:39 (IST)

शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या 'चक्का जाम'मुळे देशभरातील सर्व राष्ट्रीय व राज्य महामार्ग उद्या दुपारी 12-3 दरम्यान ब्लॉक करण्यात येणार आहेत. या कालावधीत केवळ आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहतील, असा इशारा संयुक्त किसान मोर्चाने दिला आहे. ट्विट-

 

05 Feb, 23:59 (IST)

शेतकरी संघटनांनी उद्या  पुकारलेल्या 'चक्का जाम'ला कॉंग्रेस पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे. ट्विट-

 

05 Feb, 23:34 (IST)

अभिनेते दीपंकर दे, भारत कौल आणि लवली मैत्र, आणि संगीतकार शाओना खान यांनी आज तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ट्विट-

 

05 Feb, 22:51 (IST)

दिल्ली येथे आज आणखी 154 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, 2 जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 6 लाख 35 हजार 793 वर पोहचली आहे. ट्विट-

 

05 Feb, 22:21 (IST)

कोलकाता पोलीस फोर्समध्ये नेताजी बटालीयनची स्थापना केली जाणार असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

05 Feb, 22:11 (IST)

तेलंगणा मध्ये 100 टक्के उपस्थितीत  सिनेमागृह सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.

05 Feb, 21:56 (IST)

लोकसभेचे कामकाज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तहकूब  करण्यात आले आहे.

05 Feb, 21:47 (IST)

मानखुर्द येथे लागलेल्या भीषण आगीचा पहा व्हिडिओ

05 Feb, 21:32 (IST)

उस्मानाबाद इथे शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात पेट्रोल-डिझेल दरवाढीबद्दल आंदोलन  करण्यात येत आहे.

05 Feb, 20:53 (IST)

मानखुर्द मधील मंडाळे परिसरात भीषण आग लागली असून  घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 15-16 गाड्या दाखल झाल्या आहेत. 

05 Feb, 20:45 (IST)

नाना पटोले यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

05 Feb, 20:36 (IST)

तमिळनाडू येथील सर्वांना कोरोनाची लस मोफत दिली जाणार असे मुख्यमंत्री एडप्पादी के पलानीस्वामी यांनी म्हटले आहे.

Read more


केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांकडून आंदोलन अद्याप सुरुच आहे. तसेच केंद्र सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात नाहीतर आंदोलन थांबणार नाही असा इशारा सुद्धा शेतकऱ्यांनी दिला आहे. अशातच आता हॉलिवूड मधील रॅप सिंगर रिहाना हिने दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनावरुन ट्विट केले आहे. यावरुनच आता नवा मुद्दा उपस्थितीत होऊन विदेशातील लोकांनी यावर बोलू नये असे म्हटले आहे.

दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षासंदर्भात आज महत्वाची सुनावणी सकाळी 10.30 वाजता सर्वोच्च न्यायालयात पार पडणार आहे. 20 जानेवारीला झालेल्या सुनावणीवेळी ती वर्च्युअल ऐवजी प्रत्यक्षात घेण्यात यावी अशी मागणे न्यायालयाकडे केली होती. पण आज सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या पाच सदस्यीय खंडपीठाखाली ही सुनावणी होणार आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

तर सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणात झालेल्या ड्रग्जच्या खुलासामुळे अनेक जणांना आतापर्यंत एनसीबीने ताब्यात घेतल्याचे दिसून आले आहे. तसेच अद्याप ही ड्रग्ज प्रकरणी विविध ठिकाणी छापेमारी ही केली जात आहे. अशातच सेलिब्रिटी मॅनेजर राहिला फर्निचरवाला आणि उद्योगपती करन सजनानी यांना ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now