पालघर येथे कोरोना व्हायरसमुळे एका व्यक्तीचा मृत्यू; 31 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

मुंबई, महाराष्ट्रासह देशा-परदेशातील बातम्या, ठळक घडामोडी, ताज्या बातम्या, कोरोना व्हायरस संसर्गाचे अपडेट्स अवघ्या एकाअ क्लिकवर पाहण्यासाठी लेटेस्टली मराठीच्या पेजला नक्की भेट द्या.

01 Apr, 05:09 (IST)

पालघर तालुक्यातील सफाळे उसरणी येथे वास्तव्य करणाऱ्या एका 50 वर्षीय नागरिकाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे राज्यातल्या मृतांचा आकडा 11 वर गेला आहे.

01 Apr, 04:34 (IST)

नागपूर येथील निवारागृहात मुलभूत सुविधांचा अभाव असल्याची तक्रार येथील स्थलांतरीत कामगारांनी केली आहे. स्थलांतरित कामगारांचे म्हणणे असे की त्यात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. एक कामगार म्हणतो, "आमच्याकडे वीज आणि शौचालयाची सुविधा नाही. आम्ही आमचे जेवण कचऱ्याच्या ढिगाजवळ खाल्ले आहे. आम्हाला खात्री आहे की आम्ही ठीक आहोत." परंतु येथे परिस्थिती अशी आहे की आम्ही आजारी पडू शकतो.

01 Apr, 03:49 (IST)

केंद्र सरकारकडून पीपीएफ, एनएससी, सुकन्या समृद्धि यांसारख्या छोट्या बचत योजनांवरील व्याज दरात कपात केली आहे. सरकारने अशा छोट्या बचत योजनेचा व्याज दर 0.70 ते 1.40 टक्क्यां पर्यंत कमी केला आहे. हा कमी केलेला व्याज दर एप्रिल-जून 2020 तिमाहीत लागू होईल.

01 Apr, 03:13 (IST)

सीएनएन अँकर Chris Cuomo यांची कोरोना विषाणूची चाचणी सकारात्मक आली आहे. त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून ते आपल्या घरूनच काम करणार आहेत. Chris Cuomo हे न्यूयॉर्कचे गव्हर्नर Andrew Cuomo यांचे भाऊ आहेत.

01 Apr, 02:56 (IST)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात कोरोना विषाणूमुळे 35 जणांचा मृत्यू झाला असून 1,397 प्रकरणांची नोंद झाली आहे.

01 Apr, 02:29 (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड  यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूरचे यंदाच्या सरकार मधील पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे कामगार मंत्रालयाची जबाबदारी असल्याने त्यांना भार पडू नये म्ह्णून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जातेय. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा. 

01 Apr, 02:00 (IST)

मजुरांनी स्थलांतर करण्याची गरज नाही, जिथे आहात तिथेच राहा, आम्ही तुमची जबाबदारी घेऊ, कुणीही स्थलांतर करण्याची गरज नाही, आता राज्याने आपल्या सीमा सील केल्या आहेत त्यामुळे कोणी स्थलांतर करु शकणार नाही, तसा प्रयत्नही करू नका असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना सांगितले आहे. 

 

01 Apr, 01:57 (IST)

गरजेपेक्षा अधिक प्रमाणात खरेदी करणाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  राज्यात अन्न धान्याचा पुरेसा साठा आहे त्यामुळे घाबरून जाऊन अति खरेदी करू नका असा विश्वास दर्शवला आहे. 

 

01 Apr, 01:54 (IST)

उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना लोकप्रतिनिधींच्या वेतनात कपात होणार नाही; पगार टप्प्यात होईल असे स्पष्ट केले आहे. 

 

01 Apr, 01:03 (IST)

राज्यात 13 शासकीय प्रयोगशाळांच्या माध्यमातून कोरोनाची चाचणी केली जात आहे. त्याद्वारे दररोज 2300 चाचण्या केल्या जाण्याची क्षमता आहे. आता त्यामध्ये अजून 3 शासकीय प्रयोगशाळांना मान्यता देण्यात येणार असून राज्यात शासकीय प्रयोगशाळांची संख्या 16 होणार आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. 

01 Apr, 24:23 (IST)

महाराष्ट्रात कोव्हिड 19 चे नवे 72  रुग्ण आढळले आहेत. यानुसार राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ३०२ वर पोहचली आहे. आकडेवारी पाहता, मुंबईत 59, अहमदनगर येथे 3,  पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वाशी विरारमधील प्रत्येकी 2  नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

31 Mar, 23:47 (IST)

पीएम केअर्स फंड साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांनी स्वतःच्या बचतीतून 25 हजाराचे योगदान दिले आहे.

31 Mar, 23:00 (IST)

नागपाडा येथील क्राईम ब्रांच च्या कारवाईतून 1 लाख 22 हजार सर्जिकल मास्क जप्त करण्यात आले आहे. काळाबाजार करण्याच्या हेतूने हे मास्क साठवून ठेवण्यात आले होते असे समजत आहे. 

31 Mar, 22:32 (IST)

महाराष्ट्रातील राज्य सरकार कर्मचार्‍यांच्या वेतनकपातीच्या निर्णयामधून पोलिस, कोरोना संबंधित विभागातील कर्मचार्‍यांचा समावेश नसेल असे  रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान लवकरच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार याबाबत माहिती देतील मात्र इतरांनी खोट्या बातम्या, अफवा पसरवू नयेत असे आवाहनही ट्वीटरच्या माध्यमातून केले आहे.

31 Mar, 21:51 (IST)

भारतामध्ये कोरोना बाधितांचा एकूण आकडा 1251 वर पोहचला आहे. मागील 24 तासामध्ये 227 नवे रूग्ण आढळले असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आतापर्यंत देशात एकूण 32 जणांची कोरोना विरूद्धची झुंज अपयशि ठरल्याने त्यांचा बळी गेला आहे.  

31 Mar, 21:45 (IST)

स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या  सुमारे 2,56,000 कर्मचार्‍यांनी PM’s National Relief Fund मध्ये आपला दोन दिवसांचा पगार दान केला आहे. त्यामुळे यामध्ये 100 कोटींचे दान करण्यात आले आहे.

31 Mar, 21:23 (IST)

भारतामध्ये अडकलेल्या परदेशी पर्यटकांसाठी ‘Stranded in India’ पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान त्यामध्ये पर्यटकांना माहिती देण्यासाठी खास हेल्पलाईन क्रमांकदेखील जारी करण्यात आले आहेत.

31 Mar, 20:27 (IST)

'लार्सन अँड टुब्रो लिमिटेड' कंपनीकडून कोरोना विरोधातील लढाईसाठी 150 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

 

 

31 Mar, 20:17 (IST)

मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने भीमा कोरेगाव कट प्रकरणातील दोन्ही आरोपी वरवरा राव आणि शोमा सेन यांच्या जामीन याचिका फेटाळल्या आहेत.

 

31 Mar, 20:05 (IST)

कोरोना विरोधातील लढाईसाठी राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी पीएम केअर फंडला मदत दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हँडवरून यासंदर्भात माहिती दिली आहे.

 

 

Read more


महाराष्ट्रासह देशभरात जसा कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. तशतशी त्याची चिंता वाढत आहे. इतर विकसित देशांच्या तुलनेत भारतामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचं प्रमाण नियंत्रणामध्ये असलं तरीही नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळातले नियम, स्वयंशिस्तीने पाळणं गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घोषित केल्याने नागरिकांना संचारबंदी आहे. या काळात अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडले तरीही नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचे आहे. सध्या देशात अनेक ठिकाणी लोकल ट्रान्समिशनचा धोका जाणवू लागला आहे त्यामुळे झपाट्याने पसरणार्‍या कोरोना व्हायरसला आटोक्यात ठेवण्यासाठी नागरिकांनी घरातच बसणं गरजेचे झाले आहे.

सध्या मुंबईच्या वरळी कोळीवाड्यामध्येही सुमारे 6 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने आता हा सारा भाग पोलिसांनी सील केला असून कोणालाच या भागात फिरता येत नाही. सोमवारी रात्रीच या भागात निर्जुंतीकरणाचे औषध फवारले असून नागरिकांना घरीच बसण्याचा सल्ला दिला आहे. तर गोरेगावच्या बिंबीसार नगरमध्येही काल संध्याकाळी काही काळ पोलिसांकडून संशयितांची तपासणी सुरू होती.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

जगभरामध्ये आता कोरोनाबाधितांचा आकडा 785,777 पर्यंत पोहचला असून त्यापैकी 37,815 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनपाठोपाठ आता इटली, अमेरिका, आणि युरोपामध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे थैमान पसरले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now