कोरोना लसीकरणाचा ड्राय रन 2 जानेवारीला देशभर होणार, महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड; 31डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

01 Jan, 04:47 (IST)

कोरोना लसीकरणाचा ड्राय रन 2 जानेवारीला देशभर होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. लसीकरणासाठी कशा प्रकारे तयारी करायची याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली.

01 Jan, 04:12 (IST)

मध्य प्रदेशातील कटनी शहरात ट्रकने धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी ही माहिती दिली.

01 Jan, 03:34 (IST)

मध्य प्रदेश: छिंदवाडा जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आपल्या पाळीव कुत्र्याचे नाव त्याच्या वडिलोपार्जित मालमत्तेचा कायदेशीर वारस म्हणून लावले आहे. याबाबत ओम नारायण वर्मा म्हणतात, 'माझ्याकडे जवळपास 21 एकर जमीन आहे व मी या माझ्या मालमत्तेतील हिस्सा बायको आणि कुत्र्यामध्ये विभागला आहे.'

01 Jan, 03:00 (IST)

2021 च्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या शहरी लँडस्केपचे रूपांतर करण्याच्या उद्देशाने आयोजित केल्या गेलेल्या कार्यक्रमात भाग घेतील. लाइट हाऊस प्रकल्पांची पायाभरणी आणि PMAY (Urban) व आशा-भारत पुरस्कारांचे वितरण केले जाईल.

01 Jan, 02:15 (IST)

महाराष्ट्रात आज कोरोनाचे आणखी 3509 रुग्ण आढळले असून 58 जणांचा बळी गेला आहे.

01 Jan, 02:13 (IST)

गुजरात येथे कोरोनाचे आणखी 780 रुग्ण आढळले असून आणखी 4 जणांचा बळी गेला आहे.

01 Jan, 01:55 (IST)

केरळ येथे कोरोनाचे आणखी 5215 रुग्ण आढळले असून 30 जणांचा बळी गेला आहे.

01 Jan, 01:39 (IST)

हैदराबाद येथे Loan App Fraud Case प्रकरणी 16 जणांना अटक करण्यात आली आहे.

01 Jan, 01:33 (IST)

New Year 2021: हिमाचल प्रदेशातील शिमला येथे  22,910 गाड्या दाखल तर 15,966 वाहनांनी गेल्या 34 तासात केला प्रवास केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

01 Jan, 01:15 (IST)

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक आणि महापालिकेच्या मुख्य कार्यालयावर नवं वर्षाच्या स्वागतासाठी रोषणाई करण्यात आली आहे.

01 Jan, 24:58 (IST)

राष्ट्रीय महामार्गावर येत्या 15 फेब्रुवारी पर्यंत FASTag किंवा कॅशच्या स्वरुपात टोल भरता येणार आहे.

01 Jan, 24:38 (IST)

ओडिसा मधील पुरीतील गोल्डन बीचवर कलाकार मानस कुमार शाहू यांनी नवं वर्षाच्या स्वागतासाठी साकारले वाळूतील शिल्प साकारले आहे.

पहा फोटो-

01 Jan, 24:24 (IST)

साउथ आणि नॉर्थ दिल्लीत  नवं वर्षाच्या पूर्वसंध्येला रोषणाई करण्यात आली आहे.

01 Jan, 24:05 (IST)

तमिळनाडू येथे युके मधून आलेल्यांपैकी फक्त एकालाच कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झाल्याची माहिती आरोग्य सेक्रेटरी यांनी  दिली आहे.

31 Dec, 23:57 (IST)

10 वी आणि 12 वी सीबीएसई बोर्ड परीक्षा 4 मे पासून सुरु होणार असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी जाहीर केले आहे.

31 Dec, 23:33 (IST)

मणिपूर येथे 3.1 रिश्टर स्केलच्या भुकंपाचे धक्के जाणवले आहेत.

31 Dec, 23:22 (IST)

Last sunset of 2020: माहिम बीच येथील वर्षाअखेरच्या सूर्यास्ताचा पहा फोटो

31 Dec, 23:16 (IST)

Punjab Smart Connect Scheme अंतर्गत राज्यात पहिल्या टप्प्यात 44,015 स्मार्टफोनचे वाटप केले जाणार असे  मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी जाहीर केले आहे.

31 Dec, 23:06 (IST)

नवं वर्षाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जनतेल्या  आगामी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

31 Dec, 22:56 (IST)

शाहजहांपूर मध्ये शेतकऱ्यांकडून पोलिसांचे बॅरिगेटर तोडत राजस्थान-हरियाणा बॉर्डरवरुन हरियाणात दाखल झाले आहेत.

Read more


आज नववर्षाची पूर्वसंध्या! अवघ्या काही तासांमध्ये सारं जग 2020 या वर्षाला निरोप देत 2021 चं स्वागत करण्यासाठी सज्ज होणार आहे. 2021 वर्षामधला पहिला दिवस अनेकांसाठी पुन्हा नवी उमेद, आशा, आकांक्षा घेऊन येणारी आहे. मात्र मुंबई सह भारतातील अनेक प्रमुख शहरांमध्ये न्यू इयर सेलिब्रेशनवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. यामध्ये मुंबई, दिल्ली, केरळ या राज्यांत सध्या नाईट कर्फ्यू असल्याने सेलिब्रेशन करण्यासाठी लोकं फार एकत्र जमू शकणार नाहीत. मुंबई पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला आहे. गच्चीवरील पार्ट्यांना देखील रोखण्यासाठी आता प्रशासन सज्ज आहे. त्यांच्यावर ड्रोनने लक्ष ठेवले जाणार आहे.

एकीकडे युके मधून आलेला नवा कोरोनाचा स्ट्रेन आणि अद्यापही भारतात लसीला परवानगी नसल्याने आता स्थिती चिंताजनक बनली आहे. मात्र घाबरून जाऊ नका केवळ दक्ष रहा असं आवाहन प्रशासनाने देशवासियांना केले आहे. भारतात काही राज्यांमध्ये यूकेच्या नव्या स्ट्रेनचा वायरस भारतामध्येही दाखल झालेला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

कालच युकेमध्ये ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीला मान्यता मिळाल्यानंतर आता भारतामध्येही कोरोना वायरसचा धोका टाळण्यासाठी नवी लस उपलब्ध करून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. येत्या काही दिवसांतच भारतातही ऑक्सफर्डची कोविशिल्ड उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now