1998 साली देशात अनेक ठिकाणी बॉम्ब-स्फोटांचा कट रचल्याचा आरोपातून अब्दुल करीम टुंडाची निर्दोष मुक्तता; 3 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

04 Mar, 04:39 (IST)

हैदराबाद: आज अब्दुल करीम टुंडाला, 1998 साली देशातील अनेक भागांत झालेल्या बॉम्ब-स्फोटांच्या कट रचल्याबद्दल निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. मेट्रोपॉलिटन सेशन जज कोर्ट (जेएमसी) नामल्ली, हैदराबादने टुंडाला सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केले.

04 Mar, 03:54 (IST)

सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसमुळे मुंबई विमानतळावर आजपर्यंत 551 विमानातील, 65,621 प्रवाश्यांची तपासणी करण्यात आली आहे. राज्यात कोरोना व्हायरस प्रभावित भागातून 401 प्रवासी येत आहेत. तसेच या आजाराची लक्षणे आढळल्याने 152 जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते, पैकी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे यांच्या अहवालानुसार 149 जणांची तपासणी नकारात्मक आली असून, तीन जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

04 Mar, 02:54 (IST)

आजपासून 10 वीची परीक्षा सुरु झाली.जळगाव जिल्ह्यातील कुऱ्हा येथे मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फुटीबाबत वृत्त प्रसिध्द झाले होते. याविषयी विभागीय सचिवांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर केला आहे. त्यानुसार कोणत्याही प्रकारची प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचे नमूद केले आहे. प्रश्नपत्रिका फुटीचे वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे.

04 Mar, 02:28 (IST)

जयपूरमध्ये 69 वर्षीय इटलीच्या पर्यटकाला कोरोनाची लागण झाली आहे. इटलीतील 20 पर्यटकांचा एक गट जयपूर येथे फिरण्यासाठी आला होता. त्यावेळी यातील एका पर्यटकाची प्रकृती बिघडली. त्याला ताप आणि श्वसनाला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्ताच्या नमुन्याच्या तपासणीनंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

 

04 Mar, 02:09 (IST)

खडकवासला मधील कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कैलास चव्हाण हे खडकवासला येथे पोहण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांचा अचानक तोल गेला. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या पत्नीने  पाण्यात उडी घेतली. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. 

04 Mar, 24:46 (IST)

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 'महाराष्ट्र विकास हाच धर्म' म्हणत आदित्य ठाकरे यांचे आभार मानले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी आदित्य ठाकरे यांचे ट्विट रिट्विट केले आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून जितेंद्र आव्हाड यांचा अधिवेशनातील एक व्हिडिओ शेअर केला आहे.

04 Mar, 24:10 (IST)

झारखंडमध्ये 6 वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोस्को कोर्टाने दोषींना 4 दिवसांत फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. 

 

03 Mar, 23:29 (IST)

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोना व्हायरसच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. सोशल मीडिया अकाउंटवर विदुषकी खेळ खेळून भारताचा वेळ वाया घालवणं बंद करा, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

03 Mar, 22:38 (IST)

बीड जिल्ह्यात आठवीत शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे.  एक महिन्यांपासून पीडित मुलगी बेपत्ता होती. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. तसेच आरोपीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

03 Mar, 21:32 (IST)

14 फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याचे संशयित  जबाबदार वडील-मुलीला NIA कडून अटक करण्यात आली आहे.

03 Mar, 21:16 (IST)

कोरोना व्हायरसचा इराण मध्ये प्रसार झाल्यास तिथे शिकणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विद्यार्थ्यांना तेथून हलवण्यात यावे. या मागणीसाठी करण्यात आलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राला उत्तर देण्यास सांगितले आहे.  11 मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी होईल.

03 Mar, 20:58 (IST)

इटली, इराण, दक्षिण कोरिया, जपान मधून भारतात येण्यासाठी ३ मार्च रोजी किंवा त्यापूर्वी जारी केलेले नियमित व्हिसा / ई-व्हिसा अद्याप भारतात प्रवेश न घेतलेल्या नागरिकांसाठी तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत 

 

03 Mar, 20:45 (IST)

दिल्ली हिंसाचारामुळे आज पुन्हा एकदा संसदीय अधिवेशन 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते, यानंतर लोकसभेत खासदारांनी पुन्हा एकदा तोच मुद्दा काढून गदारोळ सुरु केला, शेवटी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 'सरकार दिल्ली हिंसाचारावर चर्चा करण्यासाठी तयार असेल मात्र ही चर्चा होळीनंतर होईल' असं म्हणत आजच दिल्ली हिंसाचारावर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी फेटाळली.

03 Mar, 20:13 (IST)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी COVID-19 च्या दहशतीला घाबरण्याची गरज नसल्याचं सांगत संबंधित विभागांसोबत बैठका घेऊन उपाययोजना सुरू करण्याचे आदेश दिल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान परदेशातून येणार्‍यांचे स्क्रिनिंग ते वैद्यकीय सुविधा देण्याचे काम सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे.

03 Mar, 19:52 (IST)

जगभरात दहशत पसरवणारा कोरोना व्हायरस आता भारतामध्येही दाखल झाला आहे. दिल्ली, हैदराबादमध्ये कोरोनाग्रस्त रूग्ण आढळल्यानंतर आता सरकारने 26 औषधांवरील निर्यात रोखली आहे.

03 Mar, 18:53 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियापासून लांब राहणार असल्याच्या चर्चांवर स्वतः मोदींनी मोठा खुलासा केला असून हा निर्णय खास महिला दिनाच्या निमित्ताने घेण्यात आल्याचे समजत आहे. या दिवशी म्हणजेच रविवारी मोदींचे ऑफिशियल अकाउंटवर महिलांच्या प्रेरणादायी विचार शेअर केले जाणार आहेत . 

पहा मोदींचे ट्विट

03 Mar, 18:40 (IST)

पुण्यातील सिंहगड रोड येथे धायरी जवळ एका नाल्यात दोन मृतदेश आढळले आहेत, याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.

03 Mar, 18:19 (IST)

जळगाव मधील मुक्ताईनगर येथे दहावी बोर्डाची परीक्षा सुरु होताच मराठी भाषेचा पेपर व्हाट्सऍप वर व्हायरल झाला आहे. सकाळी 10 च्या सुमारास हा पेपर अनेक मोबाईलवर फिरत असल्याचे आढळले होते. 

03 Mar, 18:03 (IST)

देवेंद्र फडणवीस यांनी 2014 विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात आपल्यावरील 2 गुन्हे लपवल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर खटला चालणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. या प्रकरणी फडणवीस यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती मात्र ही याचिका फेटाळून सुप्रीम कोर्टाने फडणवीस यांना धक्का दिला आहे.

03 Mar, 17:57 (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 7 मार्च ला अयोध्येला जाण्याच्या मुद्द्यावरून घेतल्या जाणाऱ्या आक्षेपावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी देव सर्वांचा आहे, आणि देवाचे दर्शन घेण्यात राजकीय संबंध नाही असे सांगितले आहे, त्यामुळे श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाणारच असेही उद्धव ठाकरे यांनी ठाम पणे सांगितले आहे. 

Read more


आज, 3 मार्च पासून महाराष्ट्रात दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु होत आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा 9 विभागीय मंडळांमध्ये घेतली जाणार आहे. यंदा राज्यभरातून तब्बल 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. यापैकी 9,75,894 विद्यार्थी तर 7,89,898 विद्यार्थीनी आहेत.

दुसरीकडे,काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सहित सोशल मीडियाला रामराम ठोकण्याच्या विचारात आहोत आणि याबाबत आपण येत्या रविवारी आपला निर्णय मांडणार आहोत असे ट्विट केले होते,यावरून आजही सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत. मोदींच्या या निर्णयाच्या बाबत सामान्य नागरिकांपासून ते राजकारणी मंडळींपर्यंत सर्वच याबाबत तर्कवितर्क लावताना दिसत आहेत. तसेच मोदींच्या पाठोपाठ आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुद्धा आपण सोशल मीडिया सोडणार असल्याचे संकेत दिले आहेत.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

दरम्यान, आज 3 मार्च रोजी दिल्ली सामूहिक बलात्कार खटल्यातील दोषींना दिली जाणारी फाशी आता पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे, दोषी पवन कुमार गुप्ता याची दया याचिकेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून अजूनही निर्णय देण्यात आली नसल्याने दिल्ली पटियाला कोर्टाकडून या फाशीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. या वरून देशभरात संताप व्यक्त केला जात आहे

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now