जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेत जवळ पाकिस्तान कडून झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद; 3 फेब्रुवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

04 Feb, 05:23 (IST)

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेत जवळ पाकिस्तान कडून झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

04 Feb, 05:04 (IST)

पुढील 3-4 दिवस राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे.

04 Feb, 04:31 (IST)

अ‍ॅग्री सेसमुळे मद्य पेयं आणि कस्टम ड्युटी वाढीमुळे कारच्या किंमतीवर परिणाम होणार नाहीः अर्थ सचिव

04 Feb, 03:30 (IST)

कर्नाटकः  40 विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने मंगळुरु मधील उल्लाळ येथील एक खासगी नर्सिंग कॉलेज सील करण्यात आले आहे. हे विद्यार्थी केरळहून आले होते.

04 Feb, 03:03 (IST)

मणिपूरः थायल जिल्ह्यातील कामिचिंग भागातील शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. त्यात मोठ्या संख्येने दारूगोळा आणि युद्धासारख्या स्टोअरसह विविध प्रकारच्या नऊ शस्त्रे समावेश आहे.

04 Feb, 02:04 (IST)

कोरोना संकटात ज्या शेतकऱ्यांनी देशाची अर्थव्यवस्था वाचवली, आज त्याच शेतकऱ्यांना मारण्याचे काम मोदी सरकार करत आहे, काँग्रेस नेत राहुल गांधी म्हणाले आहेत. ट्विट-

 

04 Feb, 01:20 (IST)

कर्नाटक येथे आज आणखी 426 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 9 लाख 40 हजार 596 वर पोहचली आहे. ट्विट-

 

04 Feb, 24:42 (IST)

कृषी कायद्याबाबत सभागृहात झालेल्या गोंधळामुळे लोकसभा संध्याकाळी 9 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. ट्विट-

 

04 Feb, 24:09 (IST)

 

आम्ही सध्या ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ फायनलचा विचार करत नाही. चेन्नई येथे 5 तारखेला इंग्लंडबरोबर होणार्‍या कसोटी सामन्यावर आम्ही लक्ष केंद्रित करीत आहोत, असे भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला आहे.

 

03 Feb, 23:34 (IST)

केरळ येथे आज आणखी 6 हजार 356 कोरोनाबाधितांची नोद झाली आहे. ज्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या 8 लाख 71 हजार 548 वर पोहचली आहे. ट्विट-

 

03 Feb, 23:03 (IST)

पंतप्रधान मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे आणि सामान्य लोकांना हे माहित आहे. आतापर्यंत ट्विटचा प्रश्न आहे, तर परराष्ट्र मंत्रालयाने यावर एक निवेदन जारी केले आहे. आमचा हा अंतर्गत प्रश्न आहे. ज्याचा आपण निराकरण करूया, असे शेतकरी आंदोलनावर भाष्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींना भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सुनावले आहे. ट्विट-

 

03 Feb, 22:41 (IST)

15  फेब्रुवारी पासून महाराष्ट्रात महाविद्यालयं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आज उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत  यांनी दिली अअहे.  

03 Feb, 21:49 (IST)

जिंद मधील महापंचायतीमध्ये मंच तुटल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना आज राकेश टिकैत म्हणाले भाग्य्वान लोकांचेच मंच तुटतात. ही चांगली गोष्ट आहे. संयुक्त किसान  मोर्चाचेच 40 लोक सरकार सोबत बातचित करतील.

03 Feb, 20:46 (IST)

एल्गार परिषदेमध्ये हिंदूंबद्दल आक्षेपार्ह विधानं करणार्‍या Sharjeel Usmani विरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या तो  महाराष्ट्राबाहेर आहे.  त्याला पकडण्यासाठी टीम तैनात असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख  यांनी दिली आहे.

03 Feb, 20:22 (IST)

BMC चा अर्थसंकल्प 2021-22 मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडून सादर करण्यात आला आहे.

03 Feb, 20:07 (IST)

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनच्या नावाखाली लोकांमध्ये भीती निर्माण करण्याची भाजपची इच्छा आहे. मी पश्चिम बंगालमध्ये एनआरसी लागू होण्यास कधीही परवानगी देणार नाही, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

03 Feb, 19:58 (IST)

‘बिग बॉस’चे माजी स्पर्धक स्वामी ओम यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. तसेच त्यांना तीन महिन्यांपूर्वी कोरोना विषाणूची लागणदेखील झाली होती. 

 

03 Feb, 19:56 (IST)

लाल किल्ल्यावर जे घडलं ते लोकशाही विरोधात होतं. . पंतप्रधान ज्या ठिकाणी पंतप्रधानांना संबोधित करतात अशा ठिकाणी राष्ट्रध्वजाचा अपमान सहन केला जाऊ शकत नाही, असं राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.

 

 

03 Feb, 19:37 (IST)

राज्यसभेचं काम उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत तहकूब  करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

03 Feb, 19:29 (IST)

हरियाणा मधील जिंद मध्ये  महापंचायतीत सहभागी होण्यासाठी राकेश टिकैत दाखल झाले आहेत.

Read more


आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असणार्‍या मुंबई महानगरपालिकेचं आज बजेट सादर होणार आहे. बीएमसी यंदा कोरोना संकटकाळात 25%चं उत्पन्न निर्माण करू शकली आहे. त्यामुळे येत्या वर्षभरासाठी मुंबईकरांना कोणकोणत्या सोयी-सुविधा देणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान मुंबई कोस्टल रोड हा बीएमसीचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. याच काम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे दीड वर्षांनंतर येणार्‍या पालिका निवडणूका पाहता आता कामांचा वेग वाढणार आहे. आरोग्य, रस्ते आणि पाणी या क्षेत्रात बीएमसी आजच्या बजेटमध्ये काय घोषणा करणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

महाराष्ट्रात एकीकडे कोरोना संकटावर मात करण्यासाठी प्रशासन काम करत असतानाच नुकत्याच झालेल्या एल्गार परिषदेमध्ये शरजील उस्मानी याने केलेल्या हिंदूंबद्दलच्या प्रक्षोभक विधानावरून आता राजकारण पेटायला सुरूवात झाली आहे. यामध्ये काल भाजपा नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कडक कारवाईची मागणी केली आहे. सध्या पुण्यात एका भाजपा नेत्याने केलेल्या तक्रारीवरून शरजील विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दरम्यान काल शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ पोहचल्यानंतर आज मुखपत्र असलेल्या सामनामधूनही त्यावरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुनावण्यात आले आहे. तिरंग्याचा अपमान करून आंदोलन मोठे होत नाही. पण भाजपा सायबर सेल मुद्दामून तसे खोटे चित्र बनवत आहे. अशाप्रकारची कृती देखील तिरंग्याचा अपामान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now