पश्चिम बंगाल राज्यात पाच 'परिवर्तन यात्रा' होणार आहेत. जेपी नड्डा जी 6 फेब्रुवारी रोजी एक यात्रा काढणार आहेत आणि 11 फेब्रुवारीला कूचबिहार येथून गृहमंत्री एक यात्रा सुरू करणार आहेत. दोन यात्रांची तयारी करण्यात आली आहे, तर अन्य तिघांची माहिती लवकरच दिली जाईल. कैलास विजयवर्गीय, भाजपा यांनी ही माहिती दिली.
यवतमाळ: पोलिओ डोस ऐवजी सॅनिटायझर देणे ही एक अक्षम्य चूक आहे. संबंधित अंगणवाडी वर्कर्सवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कॅप्टन सर Tom Moore यांचे कोरोना व्हायरसने निधन झाले आहे. NHS साठी त्यांनी जवळजवळ 33 मिलियन उभे केले होते. 100 वर्षीय मूर यांना रविवारी बेडफोर्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची मुलगी हन्ना इंग्राम-मूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांपासून त्यांच्यावर न्यूमोनियाचे उपचार चालू होते आणि गेल्या आठवड्यात त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती.
शेतकरी आंदोलनामुळे हरियाणाच्या 7 जिल्ह्यात मोबाइल इंटरनेट सेवांचे निलंबन उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाढविण्यात आले आहे. अधिकृत निवेदनात ही माहिती दिली.
रमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था, मुंबई (VJTI) येथे भेट देऊन संस्थेच्या तसेच सिडनेहॅम महाविद्यालय, इस्माईल ईसुफ महाविद्यालय, एलफिन्स्टन महाविद्यालय, विज्ञान संस्था आदींच्या विकासात्मक कामांचा उदय सामंत यांनी आढावा घेतला आहे. ट्विट-
यवतमाळ येथे 31 जानेवारीला 12 मुलांना पोलिओ लसीऐवजी सॅनिटायझर देण्यात आले होते. आता त्यांना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना उद्या सकाळी घरी सोडण्यात येणार आहे, असे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणाले आहेत. ट्वीट-
उत्तराखंडचे सीएम त्रिवेंद्रसिंग रावत यांनी कोव्हिड वार्डमध्ये कार्यरत असलेले डॉक्टर आणि आरोग्यसेवा कामगारांसाठी प्रत्येकी 11,000 रुपये जाहीर केले. आरोग्य विभागाशी संबंधित सर्व कोरोना योद्ध्यांना प्रमाणपत्र दिले जाईल, अशी माहिती उत्तराखंड मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. ट्विट-
व्हॅलेंटाईन डे निमित्त समाजमाध्यमांवर व्हायरल होणाऱ्या फ्री गिफ्टच्या लिंक्सवर क्लिक न करण्याचे मुंबई सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. ट्विट-
सीबीएसई बोर्ड दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे डेट शीट जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची बोर्डाच्या परीक्षेची तारीख पत्रक प्रसिद्ध केले आहे. बोर्ड परीक्षा 4 मे ते 10 जून या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल. या ठिकाणी संपूर्ण वेळापत्रक पाहू शकता
26 जानेवारीला पोलिसांवर झालेला हल्ला, ट्रॅक्टर्सचा वापर आणि बॅरिगेट्स तोडल्यावर काहीच प्रश्न उपस्थितीत न केल्याने आश्चर्य वाटतेअसे दिल्ली पोलीस कमिशनर यांनी म्हटले आहे.
देशाताचे काल (1 फेब्रुवारी) युनियन बजेट 2021-22 अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत सादर केले. या अर्थसंकल्पावर मोदी सरकारने आनंद व्यक्त केला. पण विरोधकांकडून अर्थसंकल्पाला विरोध दर्शवला गेला आहे. अशातच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामानाच्या अग्रलेखातून कालच्या बजेट बद्दल टीका करण्यात आली आहे. त्यात असे म्हटले आहे की, अर्थसंकल्प हा स्वप्नाळू पद्धतीचा आहे. त्याचसोबत आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप या जुन्याच शब्दांचे बुडबुडे आणि पायाभूत सुविधा, कृषी विकास वैगेरे त्याच त्या शब्दांचे नव्याने वाजविलेले तुणतुणे याशिवाय सामान्य जनतेला थेट दिलासा मिळेल असे अर्थसंकल्पात काहीच नाही आहे.
दिल्लीत हवेची गुणवत्ता अधिक खालावली असून सकाळच्या वेळेस धुक्यांची चादर मंजू का टिला येथे दिसून आली. IMD कडून येथील तापमान 5 अंश सेल्सिअस आणि जास्तीत जास्त तापमान 27 अंश सेल्सिअस राहिल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच दिल्लीतील एकूणच AQI हा 347 वर पोहचल्याचे ही सफर यांनी म्हटले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तसेच मुंबईतील माहिम येथून एनसीबीने MD ड्रग्ज जप्त केले आहे. यामध्ये तीन जणांना अटक केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच याआधी ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेला ड्रग पेडलर चिकू पठाण याची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)