Corona Update In Maharashtra Today: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा हाहाकार; राज्यात एका दिवसात 729 नवे रुग्ण आढळले तर, 31 लोकांचा मत्यू; 28 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
मुंबई, पुणे महाराष्ट्रासह देशा-परदेशातील ठळक घडामोडी, ताज्या बातम्यांसह कोरोना व्हायरसचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठीला नक्की भेट द्या.
भारतात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आज 31 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, दिवसभरात 729 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आतापर्यंत 400 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येने 9 हजार 318 चा आकडा गाठला आहे. एएनआयचे ट्वीट-
कोरोना विषाणूने संपूर्ण देशाला हादरून टाकले आहे. सध्या दिल्लीत कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. दिल्लीत गेल्या 24 तासांत 204 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाबाधीतांचा आकडा 3 हजार 314 वर पोहचला आहे. त्यापैंकी 54 जणांचा मृत्यू झाला असून 1 हजार 078 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एएनआयचे ट्वीट-
डीएचएफलच्या वाधवान बंधूंचा मुंबई कोर्टाने जामीन नाकारला आहे. वाधवान बंधूनी लॉकडाउनच्या काळात मुंबई ते महाबळेश्वर प्रवास केल्याचे हे प्रकरण असून त्यांचा ताबा आता CBI कडे देण्यात आला आहे. नुकतेच त्यांना सातारा येथून मुंबईत आणण्यात आले आहे.
आज आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकारपरिषदेमध्ये लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार प्लाझ्मा थेरपीला अद्याप उपचार पद्धतीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही. या उपचार पद्धतीबाबत ICMR देखील प्रयोग करत आहे. पूर्व परवानगीशिवाय त्याचा उपचारांमध्ये समाविष्ट करणं हे रूग्णासाठी घातक ठरू शकते. तसेच हे बेकायदेशीर देखील आहे.
भारतामध्ये आरबीआयच्या कर्मचार्यांनी त्यांच्या पगारातून किमान दिवसाच्या मानधनाची रक्कम पीएम केअर फंडमध्ये दान केली आहे. यामुळे सुमारे 7.30 कोटी रूपयांचा निधी दान करण्यात आला आहे.
मुंबईमध्ये लॉकडाऊन दरम्यान 14 एप्रिलच्या संध्याकाळी अचानक मजुरांची गर्दी जमा झाली. या घटनेला विनय दुबे जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दरम्यान आता 15,000च्या पर्सनल बॉन्डवर त्याची सुटका झाली आहे.
नागपूरच्या सतरंजीपुरा भागात 80 जणांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर आता सुमारे 750 लोकांना क्वारंटीन करण्यात आलं असून अजून 500 जणांच्या क्वारंटीनची व्यवस्था केली जाईल अशी माहिती नागपूर पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिली आहे.
हरियाणा मध्ये कोरोना बाधितांची एकूण संख्या 304 वर पोहोचली असून यात 14 इटालियन नागरिकांचा समावेश आहे. तसेच यातील 218 जणांना डिस्चार्ज मिळविला असून 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये एकीकाडे कोरोनाचे रूग्ण वाढत असताना दुसरीकडे कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे उभं ठाकलेले आर्थिक संकट महाराष्ट्रावरही घोंघावत आहे. देशात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्याने महसूलामध्ये मोठी घट झाली आहे. त्यावर आता मोदी सरकारने काटकसर सुरू केल्याने या आर्थिक उपाययोजनांवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' च्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. अर्थव्यवस्थेचे कठोर उपाय म्हणजे सामान्यांच्या खिशाला कात्री लावणं असेल तर मग देशाला अर्थमंत्र्यांची गरजच काय? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.
दरम्यान महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंतेची बाब आहे. काल मागील चोवीस तासात भारतामध्ये आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. काल भारतात एकूण 60 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, देशभरातील रुग्णांची संख्या आता 29 हजारांच्या पार गेला आहे. दरम्यान सध्या देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. आता या लॉकडाऊनचं पुढे काय होणार? याकडेच देशातील जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान महाराष्ट्रातही कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत सतत चढ-उतार पहायला मिळत आहे. मुंबई, पुण्यातील दाटीवाटीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रूग्ण आढळत असल्याने त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)