केरळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणूकीत 74,899 उमेदवार निवडणूक लढवणार, निवडणूक आयोगाची माहिती ; 27 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आजच्या दिवसभरातील ताज्या बातम्या, महत्त्वाच्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी सह जोडलेले रहा...
मास्क न घालणाऱ्या नागरिकांसाठी कर्नाटक सरकारची नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, महापालिका क्षेत्रात 250 तर, इतर शहरातील नागरिकांकडून 100 दंड आकारला जाणार आहे. ट्विट-
मुंबईत मागील 24 तासांत 313 रुग्ण आढळले असून 17 रुग्ण दगावले आहेत. यामुळे मुंबईत कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,80,811 वर पोहोचली असून मृतांची एकूण संख्या 10,756 वर पोहोचली आहे. सद्य घडीला मुंबईत 12,588 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्रात आज दिवसभरात 6185 कोरोनाचे रुग्ण आढळले असून 85 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 18 लाख 08 हजार 550 वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या 46,898 वर पोहोचली आहे. राज्यात सद्य घडीला 87,969 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
न्यायाधीश वा न्यायालयाविषयी असभ्य वक्तव्यांमुळे अवमान होतो मात्र जेव्हा कोणी महाराष्ट्र वा मुंबईबद्दल अशा प्रकारचे भाष्य करते तो अवमान नाही का असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.
कोणीही कितीही प्रयत्न केले तरी NDA ला इकडचे तिकडे करु शकत नाही. बहुमतासाठी 122 जागा हव्या आहेत आणि NDA जवळ 125 जागा आहेत अशी माहिती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिली आहे.
उत्तराखंड मध्ये 530 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 73,527 वर पोहोचली असून मृतांची एकूण संख्या 1201 वर पोहोचली आहे.
जी अभिनेत्री हिमाचल मध्ये राहते आणि मुंबईत येऊन आमच्या मुंबईला PoK असा उल्लेख करते, असे दोन टक्क्यांच्या लोकांनी कोर्टाला राजकीय आखाडा बनवणे चुकीचे आहे असे सांगत मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी कंगना रनौतवर सडकून टिका केली आहे.
कोरोनाच्या काळात कोविड योद्धा म्हणून राज्यात अहोरात्र काम करणा-या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना पात्रतेनुसार पदोन्नती देणार असल्याचे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अॅड.यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे.
राजस्थान: दिल्ली-जयपूर महामार्गावर बसला लागलेल्या आगीत 3 ठार झाले असून अनेक जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हाय व्होल्टेज वायरच्या संपर्कात आल्याने बसला आग लागली.
कोविड-19 लसीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या तीन शहरांना भेट देणार आहेत. अहमदाबादमधील Zydus Biotech Park, हैदराबादमधील भारत बायोटेक आणि पुण्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे मोदी उद्या कोरोना लसीच्या विकासाचा आढावा घेतील.
मुंबई पोलिसांनी ड्रग संबंधित प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले असून आतापर्यंत सुमारे 146.143 किलो एम.डी. (मेफेड्रॉन) ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत 13 लोकांना अटक करण्यात आली आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे. सरकार काही महिन्यांतच पडणार अशी टीका विरोधकांकडून वारंवार होत होती. मात्र ठाकरे सरकारची आज वर्षपूर्ती झाली आहे. गेल्या वर्षी नाट्यमय घडामोडींनंतर ठाकरे सरकार सत्तेत आले. दरम्यान, वर्षपूर्तीनंतरही विरोधकांच्या टीका थांबवलेल्या नाहीत. पुढीत 3 महिन्यात महाविकास आघाडी सरकार पडून भाजप सत्तेत येणार, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
गुजरात मधील राजकोट येथे कोविड रुग्णालयाला आग लागली असून त्यात 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर इतर रुग्णांना वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अद्याप सुरु आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, कोरोना व्हायरस संसर्गाची दुसरी लाट टाळण्यासाठी ठाकरे सरकार सज्ज झाले आहे. लॉकडाऊनचा विचार अद्याप नसला तरी निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्यामुळेच कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)