हैदराबादमध्ये मॉल सोडून इतर सर्व दुकाने गुरुवारपासून सुरू करण्यास परवानगी; 27 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
मुंबई, पुणे सह देशभरातील आणि जगातल्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, कोरोना व्हायरस अपडेट्स अवघ्या एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी मराठी लेटेस्टली ला नक्की भेट द्या.
हैदराबादमध्ये मॉल सोडून इतर सर्व दुकाने गुरुवारपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पर्यायी मार्गावर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आल्याने, लोक दुकानांमध्ये गर्दी करीत होते, त्यामुळे सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेलंगणा मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत माहिती दिली.
25 मे रोजी अहमदाबाद ते गुवाहाटी स्पाइसजेटच्या SG-8194 (Ahmedabad-Delhi) आणि SG-8152 (Delhi-Guwahati) असा प्रवास करणारे दोन प्रवासी कोरोना व्हायरस सकारात्मक आढळले आहेत.
मुंबईत आज 1,044 नवीन कोरोना व्हायरस प्रकरणे आणि 32 मृत्युंसह एकूण संक्रमितांची संख्या वाढून 33,835 झाली आहे. आतापर्यंत एकूण मृत्यूंची संख्या 1,097 वर पोहोचली आहे.
मुंबईहून उत्तर प्रदेशकडे गेलेल्या श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये दोन प्रवासी मृतावस्थेत आढळले आहेत. ही घटना मंडूआडीह रेल्वे स्थानकात घडली. अरुण केआर, स्टेशन मास्टर यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, 'सरकारी रेल्वे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृतांपैकी एकजण आपल्या कुटुंबासमवेत प्रवास करत होता तर दुसरा एकटाच होता.'
चेंबूरमध्ये आतापर्यंत 1028 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यातील 78 जणांचा मृत्यू झाला आहे. पी.एल. लोखंडे मार्ग कोरोनाने सर्वात जास्त प्रभावित झाला आहे त्या ठिकाणी 305 जणांना कोरोनाची लागण झाली. असून दिवसेंदिवस या ठिकाणची रुग्ण संख्या वाढत आहे.
चेंबूरमध्ये आतापर्यंत 1028 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यातील 78 जणांचा मृत्यू झाला आहे. पी.एल. लोखंडे मार्ग कोरोनाने सर्वात जास्त प्रभावित झाला आहे त्या ठिकाणी 305 जणांना कोरोनाची लागण झाली. असून दिवसेंदिवस या ठिकाणची रुग्ण संख्या वाढत आहे.
देशात कोविड19 चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४२ पूर्णांक ४५ शतांश टक्के एवढे झाले आहे. गेल्या २४ तासात देशात ३ हजार ९३५ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ६४ हजार ४२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत देशात कोरोना विषाणूची लागण झालेले ६ हजार ३८७ नवीन रुग्ण आढळले.
महाराष्ट्रात कोव्हिड 19 मुळे मृत्यू होणार्यांचे डेथ ऑटीड होते. महाराष्ट्रात डेथ रेट नियंत्रणात ठेवण्यात यश. नियमित मोठ्या प्रमाणात टेस्टिंग केलं जातं.
मजुर प्रवासाचा गोंधळ हा रेल्वेच्या आयत्या वेळेस वेळांमध्ये बदल होत असल्याने होत आहे. दरम्यान हा राज्याला बदनाम करण्याचा कट असल्याचं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रासह देशभरात सध्या कोरोना व्हायरसचं संकट कायम आहे. सध्या देशभरात उन्हाचा तडाखादेखील वाढला असल्याने अनेक ठिकाणी सूर्यनारायण कोपल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान विदर्भातही उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. राजस्थानमध्ये तापमानाचा पारा 50 अंशाच्या पार गेला आहे.
कोरोना व्हायरस लॉकडाऊनचा फटका शेती आणि व्यापाराला देखील बसला आहे. दरम्यान नाशिकच्या मार्केटमध्ये काल कांदे विक्रीसाठी आले तेव्हा पूर्वीपेक्षा निम्म्याहून कमी भाव मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली. हा दर आमच्या प्रवास खर्चापेक्षा देखील कमी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
कोरोनाच्या व्हायरसच्या जगभरातील थैमानाने आता जगभरात 54 लाखापेक्षा अधिक जणांना संक्रमित केले आहे. मागील 24 तासामध्ये सुमारे लाखभर नवीन कोरोनाबाधित रूग्ण समोर आले आहेत. अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)