एआयआयएमएसचे डाक्टरांनी एका व्यक्तीच्या पोटातून चक्क 20 सेंटीमीटरचा चाकू काढला; 27 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

मुंबई, पुणे, ठाणे सह देशा-परदेशातील ठळक घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी, कोरोना विषयक अपडेट्ससाठी मराठी लेटेस्टलीच्या पेजला नक्की भेट द्या.

28 Jul, 05:07 (IST)

एआयआयएमएसचे डाक्टरांनी एका व्यक्तीच्या पोटातून चक्क 20 सेंटीमीटरचा स्वंयपाक घरातील चाकू काढला आहे. एएनआय ट्वीट-

 

 

28 Jul, 04:20 (IST)

भारतीय जनता पक्षाने सोमू वीरराजू यांना पक्षाच्या आंध्र प्रदेशच्या युनिटचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.

28 Jul, 03:20 (IST)

राजस्थानमध्ये आज 1134 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 37 हजार 564 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

28 Jul, 02:43 (IST)

मुंबईत आज आणखी 1 हजार 33 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, 39 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 10 हजार 129 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

28 Jul, 02:05 (IST)

अहमदाबाद येथे कोरोनाचे आणखी 184 रुग्ण आढळून आल्याने आकडा 25,876 वर पोहचला आहे.

28 Jul, 01:53 (IST)

ओडिशा येथे कोरोनाबाधितांचा आकडा 26,892 वर पोहचला असून 17,373 जणांची प्रकृती सुधारली आहे.

28 Jul, 01:34 (IST)

महाराष्ट्रात आज कोरोनाचे आणखी 7924 रुग्ण आढळून आले असून  227 जणांचा बळी, राज्यातील COVID19 चा आकडा 3,83,723 वर पोहचला आहे.

28 Jul, 01:26 (IST)

उत्तराखंड येथे कोरोनाचे आणखी 224 रुग्ण आढळून आल्याने आकडा 6328 वर पोहचला आहे.

28 Jul, 01:21 (IST)

US चे नॅशनल सिक्युरिटी अॅडव्हायजर   Robert O'Brien यांना कोरोनाची लागण झाली आहे.

28 Jul, 01:12 (IST)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासह मुंबईतील अन्य पक्षातील  नेत्यांची बकरी ईदच्या सणाच्या संदर्भात बैठक बोलावली आहे.

28 Jul, 01:00 (IST)

मध्य प्रदेशात कोरोनाचे आणखी 789 रुग्ण आढळून आले असून 9 जणांचा बळी गेला आहे.

28 Jul, 24:49 (IST)

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत देशात एकूण 43,022 आरोग्य सेवा कार्यरत असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.

28 Jul, 24:45 (IST)

पाँडेचेरी येथे कोरोनाचे आणखी 86 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2872 वर पोहचला आहे.

28 Jul, 24:33 (IST)

पश्चिम बंगाल येथे 29 जुलै पर्यंत पूर्णपणे लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत.

28 Jul, 24:19 (IST)

धारावीत  आज आणखी कोरोनाचे 9 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2540 वर पोहचला आहे.

28 Jul, 24:13 (IST)

कर्नाटक येथे कोरोनाचे आणखी 5324 रुग्णांची भर पडल्याने आकडा 1,01,465 वर पोहचला आहे.

27 Jul, 23:53 (IST)

सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी निर्माता करण जोहर जबाब नोंदवणार आहे.

27 Jul, 23:42 (IST)

आँध्र प्रदेशात कोरोनाचे आणखी 6051 रुग्ण आढळून आल्याने आकडा 1,02,349 वर पोहचला आहे.

27 Jul, 23:31 (IST)

पालघर येथे गेल्या 24 तासात आणखी 284 कोरोना संक्रमितांची भर पडल्याने आकडा 14 हजारांच्या पार गेला आहे.

27 Jul, 23:17 (IST)

जानेवारी महिन्यात देशात फक्त 1 कोविड19 चे चाचणी केंद्र होते पण आता 1300 लॅब्स त्यासाठी सुरु करण्यात आल्या असल्याचे पीएम नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

Read more


आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांची सकाळ धुव्वाधार पावसामुळे झाली आहे. सकाळपासून मुंबईत जोरदार पाऊस पडत असल्याने सखल भागात पाणी साचले आहे. सायन, किंग्स सर्कल, हिंदमाता परिसरामध्ये पावसामुळे पाणी साचले आहे. दरम्यान सकाळपासूनच ढग दाटून आले होते त्यामुळे वातावरण देखील ढगाळ आहे.

महाराष्ट्रात आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे. या दिवसाला धार्मिक महत्त्व असतं. मात्र यंदा कोरोना संकटकाळामुळे अद्यापही मंदिरं उघडण्यात आली नसल्याने भाविकांना श्रावणी सोमवारच्या पहिल्या दिवशी घरातच भगवान शंकराची पूजा करावी लागणार आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. या मराठा आरक्षण बाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये पुढील 3 दिवसांत अंतिम सुनावणी पूर्ण होणार आहे. तसेच पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा खटला देखील आज सर्वोच्च न्यायलयात घेतला जाणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now