आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहिर हुसेन निलंबित ; 27 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आज महाराष्ट्रासह जगभरातील मराठी लोक हा दिवस साजरा करत आहेत. या दिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
म्यानमारचे अध्यक्ष यू विन मायंट यांनी आपल्या पत्नीसह आज रात्री दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्यासह इतर मान्यवरांची भेट घेतली आहे. ट्विट-
इराणचे उपाध्यक्ष मासूमेह एबटेकर यांना नवीन कोरोना व्हायरस ची लागण झाल्याचे वृत्त ANI दिले आहे. ही खूप धक्कादायक बातमी असून कोरोना व्हायरस लोण आता इराणमध्येही ब-यापैकी पसरत चालल्याचे चित्र यावरुन दिसत आहे.
दिल्ली हिंसाचार प्रकरण चिघळत चालले असून दिल्ली पोलिस गुन्हे शाखेअंतर्गत विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आली आहे. तसेच सर्व FIR ही SIT कडे देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येत्या 7 मार्चला अयोध्येला जाणार आहेत. त्यांच्या महत्वपूर्ण दौ-याआधी शिवसेना खासदार संजय राऊत स्वत: अयोध्येला भेट देणार आहेत.
बांग्लादेशी घुसरखोरांची माहिती देणाऱ्याला मनसे 5 हजार रुपये बक्षीस देणार आहे. मनसेकडून बांग्लादेशी घुसखोरांना देशातून पळवून लावण्यासाठी मनसे जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. अशातचं आता मनसेकडून नवीन घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनुसार, बांग्लादेशी घुसरखोरांची माहिती देणाऱ्याला मनसे 5 हजार रुपये बक्षीस देणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यात एका 10 वर्षांच्या चिमुरडीचा लग्न समारंभात विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. अक्षय चांदेकर, असं या नराधमाचं नाव आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
धुळे जिल्ह्यात शेंगदाणे खात असताना ठसका लागून अडीच वर्षांच्या चिमुरडीचा श्वास कोंडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सृष्टी ठाकरे, असं या मृत चिमुरडीचं नाव आहे. या घटनेमुळे ठाकरे परिवारावर शोककळा पसरली आहे.
व्हॅलेटाईन डे च्या दिवशी महाविद्यालयातील विद्यार्थींना प्रेमविवाह न करण्याची शपथ देणाऱ्या चांदुर रेल्वे महाविद्यालयातील 3 शिक्षकांचे निलंबन करण्यात आलं आहे.
विमानात अर्णब गोस्वामी याच्याशी गैरवर्तन केल्यामुळे इंडिगो एअरलाइन्सने, कुणाल कामरावर 6 महिन्यांची विमान बंदी घातली होती. त्यानंतर या प्रकरणाबाबत कामराने डीजीसीए आणि दिल्ली उच्च न्यायालयाशी संपर्क साधला. यावर निर्णय देत कोर्टाने कामराची 6 महिन्यांची विमान बंदी कमी करून ती 3 महिने केली आहे.
दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर CBSE ने 28 व 29 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या 10 वी, 12 वी च्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. उर्वरित दिल्लीतील परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात येतील. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता होऊ शकणार नाहीत त्यांच्या परीक्षेची पुढील तारीख लवकरच कळविली जाणार आहे.
सातारा जिल्ह्यातील रस्त्यावरील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी, सातारा शहरात 24 तास बीट मार्शल योजना राबविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या प्रयत्नातून ही गोष्ट घडली. यातील दुसरा टप्पा आज सुरु झाला. यामुळे महिलांबाबत घडणारे गुन्हे , घरफोडी, सोनसाखळी चोरी, वाहनचोरी आणि इतर प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसणार आहे.
दिल्ली पोलिसांनी, सध्याच्या परिस्थितीमध्ये द्वेषयुक्त भाषणाबद्दल कोणावरही एफआयआर दाखल न करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत उच्च न्यायालयाला माहिती देण्यात आली. यामुळे दिल्लीत शांतता व सुव्यवस्था निर्माण होणार नाही असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच त्यांनी ईशान्य दिल्ली हिंसाचार प्रकरणात 48 एफआयआर दाखल केले असल्याची माहिती दिली.
पुण्यात 18 वर्षीय मुलासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पैशाबाबत झालेल्या वादामुळे या मुलाच्या मित्रांनी त्याला निर्घृणपणे मारहाण केली व तो परीक्षेसाठी वेळेत पोहचू नये म्हणून त्याला लोखंडी रेलिंगला बांधून ठेवले.
मनोज कोटक हे खासदार म्हणून निवडून गेल्यावर आता, भाजपने मुलुंडचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे. सोबत उज्ज्वला मोडक आणि रिटा मकवाना यांची महापालिकेत उपनेतेपदी निवड झाली आहे.
औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करावे याबाबत पुन्हा वाद उफाळून आला आहे. याबाबत औरंगाबादचे नगरसेवक गेले चार महिने हा ठराव पास करावा यासाठी मागणी करत आहेत, मात्र महापौर याकडे कानाडोळा करत आहेत. अखेर आज भाजपच्या सर्व नगरसेवकांनी या गोष्टीचा निषेध करण्यासाठी पालिकेच्या सभागृहात काळे कपडे घालून प्रवेश केला.
दिल्लीः म्यानमारचे राष्ट्रपती यू विन मायंट आणि फर्स्ट लेडी डाव चो चो हे सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी राजघाट येथे महात्मा गांधी यांच्या समाधीला अभिवादन केले.
मराठी भाषा... भारतातील 22 प्रमुख भाषांमधील एक. ज्या भाषेने महाराष्ट्राची संस्कृती, कला, इतिहास, साहित्य जगभरात पोहचवले, अशा मराठी भाषेचा आज गौरव करण्याचा दिन. मराठी भाषा दिवस किंवा मराठी राजभाषा दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी जगभरातील मराठी भाषकांकडून साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. 1987 साली कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, त्यानंतर शासनाने हा दिवस गौरव दिन म्हणून जाहीर केला.
आज महाराष्ट्रासह जगभरातील मराठी लोक हा दिवस साजरा करत आहेत. या दिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
दिल्लीच्या ईशान्य भागात गेले चार दिवस सीएएविरोधी हिंसाचार उफाळला आहे. यामध्ये डझनभर वाहने आणि अनेक घरे पेटवण्यात आली आहेत. बुधवारपर्यंत यामध्ये एकूण 27 जणांचा मृत्यू झाला आहे तर 250 लोक जखमी आहेत.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
कोरोना व्हायरसने घातलेले थैमान अजून थांबण्याचे नाव घेत नाही. याचे लोण जगातील अनेक देशांत पसरले आहे. इटली नंतर आता स्पेनमध्येही या विषाणूने शिरकाव केला आहे. इटलीमधील एक पर्यटक कोरोना विषाणूच्या संशयास्पद प्रकरणात रुग्णालयात दाखल झाल्यानंतर, शेकडो लोक टेनिरिफमधील हॉटेलमध्ये अडकले आहेत व आता त्यांच्या बाहेर जाण्यास बंदी घातली. त्यातल्या त्यात चांगली बातमी म्हणजे, जपानच्या जहाजावर अडकलेले 119 भारतीय दिल्लीत परत आले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)