कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. यातच नाशिक येथे कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. एएनआयचे ट्वीट-
लॉकडाउनच्या काळात अवैध मद्य विक्री व वाहतूक केल्याप्रकरणी महाराष्ट्रात 6 हजार 332 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत 2958 हजार आरोपींना अटक केली आहे. तर, तब्बल 17 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. ट्वीट-
सध्या जगामध्ये अमेरिकेत सर्वाधिक कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण आहेत. अशात आता अमेरिका हा पहिला देश ठरला आहे, जिथे कोरोना विषाणूमुळे 100,000 मृत्यूंची नोंद झाली आहे.
कोरोना विषाणूने संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. यातच एअर इंडियामध्ये कार्यरत असलेल्या एका 50 वर्षीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती समोर आली आहे. एएनआयचे ट्वीट-
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेक कोरोनाबाधित विमानातून प्रवास करत मुंबईत दाखल झाले आहे. यामुळे मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यावेळी केंद्र सरकारने विमानाची वाहतूक बंद केली नाही. एवढेच नव्हेतर संसदही सुरु ठेवली होती, असा आरोप महाराष्ट्राचे मंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. एएनआयचे ट्वीट-
मुंबईमध्ये आज 1002 जणांना कोरोनाचे संक्रमण झालं असून 39 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहारातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 32,791 वर पोहोचली आहे.
गुजरातमध्ये आज 361 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 27 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 14,829 वर पोहोचली आहे.
पुणे शहरात आज नव्याने २४६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यात नायडू-महापालिका रुग्णालये २०८ , खासगी ३३ आणि ससूनच्या ०५ रुग्णांचा समावेश आहे. आजच्या २४६ रुग्णांसह पुणे शहरातील एकूण संख्या ५ हजार ४२७ इतकी झाली आहे.
राज्यात मे महिन्यात शिधापत्रिकाधारकांना 65 लाख 80 हजार 330 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. तसेच 27 लाख 28 हजार 502 गरजूंनी शिवभोजन थाळ्यांचा लाभ घेतला आहे. यासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माहिती दिली आहे.
नांदेड जिल्ह्यात आज आणखी 4 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोनाविषाणू बाधीत रूग्णांची संख्या आता 137 झाली आहे. आज आढळून आलेले सर्व 4 रूग्ण ऊमरी तालुक्यातील आहेत. तसेच आज 16 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
भारतात आज राजस्थानमधील चूरू येथे 50 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर दिल्लीतील पालम या ठिकाणी 47.6 डिग्री सेल्वियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांचा आकडा हा आता पन्नाशीकडे जात असून आज आणखीन 2 रूग्णांचा अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे आता जिल्ह्याची एकूण कोरोना बाधीत रूग्णांची संख्या 49 वर पोहोचली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मान्सूनपूर्व पूर्वतयारी आढावा बैठक घेतली. या बैठकीवा उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री विजय वडेट्टीवार, एमओएस प्राजक्त प्रसादराव तनपुरे, मुख्य सचिव, रेल्वे, नौदल, सैन्य, हवाई दल, तटरक्षक दल, आयएमडी आदी अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता आता काँग्रेसकडून हात वर करून सर्व जबाबदारी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. याविषयी आज राहुल गांधी यांनी सुद्धा आम्ही निर्णय घेऊ शकत नाही, आमचं या सरकारमध्ये भाष्य नाही असे सांगून इशारा दिला आहे. हे स्वतःची जबाबदारी झटकण्याचे काम आहे जे योग्य नाही असे मत आज देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या पत्रकार परिषदेत म्हंटले आहे.
शेतमाल खरेदी आणि पीक विम्यासाठीची मदत मोजता केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला 9079 कोटी रूपये देण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. राज्याला या काळात कापूस खरेदीसाठी 5647 कोटी रूपय, तांदूळ खरेदीसाठी 2311 कोटी रूपय, तूर खरेदीसाठी 593 कोटी रूपये, चणा/मका खरेदीसाठी 125 कोटी रूपये देण्यात आली आहे. तसेच पीकविम्यासाठी 403 कोटी रूपये देण्यात आले आहे असे फडणवीस यांनी सांगितले आहे.
देशांतर्गत सुरु झालेल्या विमानसेवांचा आजचा दुसरा दिवस आहे. यासाठी मुंबई (Mumbai) आणि दिल्ली (Delhi) विमानतळावरून दिवसाच्या सुरुवातीलाच आज आणि उद्याच्या दिवसभरातील विमानफेऱ्यांची सविस्तर वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. काल या सेवा पुन्हा सूरु होण्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई विमानतळावरून दिल्लीसाठी सुटणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाची फेरी रद्द झाली होती, ज्यामुळे प्रवाशांची एन वेळेस पंचाईत झाली होती, मात्र असे पुन्हा घडू नये यासाठी अगोदरच वेळापत्रकाविषयी प्रवाशांना कळवण्यात आले आहे.
दुसरीकडे मागील काही दिवसांपासून जम्मू काश्मीर येथे सुरु असणाऱ्या सततच्या दहशतवादी कारवाया सुरु आहेत. आज तर पाकिस्तानी लष्कराकडून सुद्धा काश्मीर येथील पुंछ जिल्ह्याजवळील LOC चे उल्लंघन करून गोळीबार करण्यात आला आहे. सध्या या ठिकाणी भारतीय व पाकिस्तानी सैन्यात चकमक सुरु आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, देशातील कोरोना व्हायरसच्या अपडेट्सकडे पाहायला गेल्यास, सद्य घडीला देशातील कोरोनाबाधितांचा आकडा हा दीड लाखाचा टप्पा गाठण्याच्या जवळ आहे. आजवर कोरोनामुळे 4000 हुन अधिक मृत्यू झाले आहेत तर 57 हजाराहून अधिकांनी कोरोनावर मात केली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र जिल्ह्यात आढळले असून त्यांचीच संख्या 52 हजाराच्या वर आहे. जगभरात आतापर्यंत 5.3 मिलियन नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे तर 3 लाख 42 हजार जणांचा या जीव घ्या विषाणूने बळी गेला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)