सचिन अहिर यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ; 26 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

27 Jul, 05:27 (IST)

सचिन अहिर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

27 Jul, 05:04 (IST)

आसाममध्ये आज 1142 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

 

27 Jul, 04:46 (IST)

उस्मानाबाद जिल्ह्यात आज 24 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. रविवारी रात्री प्राप्त झालेल्या प्रलंबित रिपोर्टमध्ये कोविड सेंटरमधील एका फिजिशियन आणि एका बालरोग तज्ज्ञाचादेखील समावेश आहे. 

27 Jul, 04:32 (IST)

पश्चिम बंगालमध्ये आज 2,341 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

27 Jul, 04:06 (IST)

पंजाब येथे आज आणखी 534 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 13 हजार 218 वर पोहचली आहे. पीटीआयचे ट्वीट- 

 

27 Jul, 03:46 (IST)

सत्ता आणि पैशाचा गैरवापर करून भाजप राजस्थानसह विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. याविरोधात उद्या दि. 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे राजभवनासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.  महाराष्ट्र काँग्रेसचे ट्वीट- 

 

27 Jul, 03:17 (IST)

पुणे शहरात आज 13 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यात ससून ३, DMH ३, नायडू ३, सिम्बॉयोसिस १, भाकरे १, D.H.AUNDH १ आणि KEM १ अशा तपशील आहे. सदरील मृत्यू २५ ते २६ जुलैदरम्यानचे आहेत.

 

27 Jul, 03:10 (IST)

राजस्थानमध्ये आज 1,132 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून  11 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

27 Jul, 02:45 (IST)

गोव्यात आज 175 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

 

27 Jul, 02:18 (IST)

अहमदाबाद येथे कोरोनाचे आणखी 163 रुग्ण आढळून आल्याने आकडा 1575 वर  पोहचला आहे.

27 Jul, 02:10 (IST)

मणिपूर येथे कोरोनाचे आणखी 59 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2235 वर पोहचला आहे.

27 Jul, 01:48 (IST)

मुंबईत कोरोनाचे आणखी 1115 रुग्ण आढळून आले असून 57 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे शहरातील COVID19 चा आकडा 1,09,096 वर पोहचला आहे. 

27 Jul, 01:31 (IST)

महाराष्ट्रात एकाच दिवसात कोरोनाचे 9,431 रुग्ण आढळून आल्याने आकडा 3,75,799 वर पोहचला आहे.

27 Jul, 01:11 (IST)

पंजाब येथे कोरोनाचे आणखी 534 रुग्ण आढळून आले आल्याने आकडा 13,218 वर पोहचला आहे.

27 Jul, 24:51 (IST)

मुंबईतील धारावीत आज कोरोनाचे फक्त 2 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2531 वर पोहचल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

27 Jul, 24:38 (IST)

मुंबईतील चिल्ड्रन होम मधील 286 पैकी 84 मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे तर 30 बालकांना COVID19 ची लागण झाली आहे.

27 Jul, 24:24 (IST)

ग्रेटर हैदराबादचे महापौर बोंटू राममोहन यांची COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

27 Jul, 24:04 (IST)

आँध्र प्रदेशात गेल्या 24 तासात कोरोनाचे आणखी 7627 रुग्ण आढळून आले आहेत.

26 Jul, 23:45 (IST)

तमिळनाडू येथे आज कोरोनाचे आणखी 6986 रुग्ण आढळले तर 85 जणांचा बळी गेला आहे.

26 Jul, 23:35 (IST)

केरळात आज कोरोनाच्या आणखी 927 रुग्णांची भर पडली आहे.

Read more


पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज 26 जुलै रोजी मन की बात (Maan Ki Baat) या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत.कोरोनाचे (Coronavirus) संकट देशावर घोंगावत असताना दिवसरात्र राबून काम करणाऱ्या कोविड योद्ध्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आजच्या कार्यक्रमातून मोदी भाष्य करतील असे अंदाज आहेत. तसेच आज देशासाठी अत्यंत खास दिवस म्हणजेच भारत पाकिस्तान 1999 कारगिल युद्धातील आपल्या देशाचा विजयी दिवस सुद्धा आहे. याच कारगिल विजय दिवसाबाबत (Kargil Vijay Diwas)  सुद्धा मोदी विशेष भाष्य करतील.

दुसरीकडे कोरोनाच्या स्थितीकडे पाहायला गेल्यास,मागील 24 तासात देशात विक्रमी अशा 4,42,031 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यापैकी सरकारी टेस्टिंग लॅब मध्ये पहिल्यांदाच 3,62,153 इतक्या मोठ्या संख्येत चाचण्या पार पडल्या तर खाजगी लॅब्स मध्ये सुद्धा कालच्या दिवसात 79,878 इतक्या चाचण्या झाल्याचे समजतेय. सध्या भारतात 13 लाखाहून अधिक कोरोना रुग्ण असून यापैकी 8  लाखहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान, देशात काही भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वी आसाम मध्ये निर्माण झालेली पूरस्थिती आटोक्यात येते ना येत तोपर्यंत आता बिहार मध्ये सुद्धा काही दिवसांपासून पूर आला आहे. मुझ्झाफरनगर सारख्या भागात अनेक भागात पाणी साचले असून आता NDRF च्या तुकड्या लोकांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now