देशभरात आज विविध ठिकाणी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. दिल्ली पोलीसांनी आज 275 किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी 7 जणांना अटक केली आहे. जप्त केलेल्या गांजाची रक्कम 15 लाख इतकी असल्याचे सांगितले जात आहे.
कोकण विभागात "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" मोहीम गाव पातळीपर्यंत राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी या योजनेचा उपयोग होईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोरोनाविषयी कोकण विभागाच्या आढावा बैठकीत व्यक्त केला.
राज्यात गेल्या 24 तासात कोरोना व्हायरस संक्रमित 17,794 नव्या रुग्णांची नोद झाली. तर 416 जणांचा मृत्यू झाला. एका दिवसात 19,592 जण बरे झाले. या सर्व आकडेवारीसर राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 13,00,757 इतकी झाली आहे. यात प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या 2,72,775 रुग्णंसह डिस्चार्ज मिळालेल्या 9,92,806 आणि मृत्यू झालेल्या 34,761 जणांचा समावेश आहे.
किसान मजदूर संघर्ष समितीने जाहीर केले आहे की त्यांनी शेती बिलाविरुद्ध आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पंजाबमध्ये 29 सप्टेंबरपर्यंत 'रेल रोको' आंदोलन वाढविण्यात येत आहेत. गुरुवारी 25 सप्टेंबर) झालेल्या आंदोलनातही अनेक रेल्वे मार्ग रोखून धरण्यात आले.
दुबई येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयमवर होत असलेल्या आयपीएलच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिल्ली कॅपीटल प्रथम फलंदाजी करण्यास मैदानात उतरला आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात नव्या कृषी विधेयकांविरोधात (New Farm Bills) विरोधकांनी आणि सत्ताधारी एनडीएतील काही घटकपक्षांनी विरोध दर्शवला. तरीही ही शेती विधेयकं संसदेत सरकारने मंजूर केली. मात्र हा बिलाला आता देशभरातील शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी विरोध दर्शवत आज भारत बंद ची (Bharat Bandh Against Farm Bills) हाक दिली आहे. या बिलाविरोधात आज शेतकरी संघटनांकडून देशव्यापी आंदोलन होणार आहेत. महाराष्ट्रातील (Maharashtra) विविध शेतकरी संघटनाही आज 'भारत बंद' मध्ये सहभागी होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगढ़, उत्तराखंड,कर्नाटक या राज्यांसह देशभरातील इतरही राज्यांतील शेतकरी या बंदमध्ये सहभागी होतील.
संपूर्ण देशाला 2020 हे वर्ष म्हणावे तितके चांगले नाही असच एकूण परिस्थितीवरुन दिसत आहे. एकीकडे मुसळधार पाऊसाने लोकांचे प्रचंड नुकसान झाले असून दुसरीकडे कोरोना व्हायरसने संपूर्ण देशाला ग्रासलेले आहे. देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 57 लाख 32 हजार 519 इतकी झाली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, कोरोना मृतांंचा टक्का हा 1.59% इतका आहे. तर आजवर कोरोनावर मात केलेल्यांंची संख्या (Coronavirus Recovered) 46, 74, 988 इतकी झाली आहे. कोरोना रिकव्हरी रेट सुद्धा सध्या 81 टक्क्यांंच्या वर आहे. देशात 9,66,382 जणांवर उपचार (Coronavirus Active Cases) सुरु आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तर महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या 12,82,963 इतकी झाली आहे. तर मुंबईत कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1,92,301 इतकी झाली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)