आसाम पोलिसांकडून बनावट नोटा छापणाऱ्या फेक टोळीचा भंडाफोड; 25 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

अनेक दशकांची परंपरा असलेला शिवसेना दसरा मेळावा यंदा कोरना व्हायरसच्या सावटामुळे अत्यंत साधेपणाने आणि केवळ 50 जणांच्या उपस्थितीत वीर सवरकर हॉल मुंबई येथे पार पडत आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

26 Oct, 05:05 (IST)

आसाम: पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या फेक टोळीचा भंडाफोड केला. या प्रकरणी गुवाहाटीमध्ये आज चार लोकांना अटक केली. यांच्याकडून बनावट नोटांचे बंडल, बनावट नोटा छापण्यासाठी वापरलेली मशीन, एटीएम कार्ड, 14 मोबाइल फोन आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे.

26 Oct, 04:41 (IST)

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 45 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. ट्विट-

 

26 Oct, 04:14 (IST)

विजयदशमी उत्सवानंतर रविवारी रात्री आठच्या सुमारास दिल्लीतील एअर क्वालिटी आरोग्यास घातक असल्याची नोंद झाली. आनंद परबत आणि अशोक विहार दोन्ही ठिकाणे धोकादायक कॅटेगरीजमध्ये येतात. एनसीआर प्रदेशात स्टबल बर्नमुळे हवेची गुणवत्ता खालावत आहे.

 

26 Oct, 03:26 (IST)

राजस्थानः कॉंग्रेसने जयपूरला दोन महानगरपालिका क्षेत्रात विभागले असा आरोप भाजपचे आमदार वासुदेव देवनानी यांनी केला आहे.

26 Oct, 03:00 (IST)

महाराष्ट्र राज्यात आज 6059 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 5648 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1460755 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 140486 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.8% झाले आहे.

26 Oct, 02:20 (IST)

गेल्या 24 तासात दिल्लीमध्ये 4136 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 33 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 3826 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

 

26 Oct, 02:02 (IST)

आरजेडी नेते तेज प्रताप यादव यांनी हसनपूर विधानसभा मतदार संघात आज सकाळी मुलांबरोबर क्रिकेटचा आनंद घेतला.

 

26 Oct, 01:18 (IST)

तोंडात शेण भरून तुम्ही आमच्यावर गोमूत्राच्या गुळण्या केल्या. आता ढेकर देऊन गप्प बसा. कारण आमचं कोणीचं काही बिघडू शकत नाही - मुख्यमंत्री 

26 Oct, 01:16 (IST)

मुंबई पाकव्याप्त काश्मीर आहे. महाराष्ट्रात  मुंबई पोलिस हे निक्कमे आहेत. महाराष्ट्रात गांजा पिकत नाही. राज्यातील सर्व घरात तुळशी वृंदावन आहेत. गांज्याची नव्हे - मुख्यमंत्री 

26 Oct, 01:04 (IST)

महाराष्ट्राचे 38 हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडे बाकी आहेत. केंद्र राज्यात कर्ज उचलण्यास सांगत आहे. मात्र, हे कर्ज कधी आणि कोणी फेडायचं? जीएसटी योजना फसली आहे - मुख्यमंत्री   

26 Oct, 24:57 (IST)

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेवर टीका करत असलेल्या भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यावर मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जहरी टीका केली आहे.  मुख्यमंत्र्यांनी आज दसरा मेळाव्यात नारायण राणेचा उल्लेख बेडूक आणि त्यांची दोन पिल्लं असा केला. हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारले जातात का तर मंदिरं उघडले नाहीत म्हणून मात्र,  ज्यावेळी बाबरी पाडली त्यावेळी हे शेपट्या घालून बसले होते - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

26 Oct, 24:48 (IST)

हिंम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना दसरा मेळाव्यात व्यक्त केला आहे.

26 Oct, 24:40 (IST)

शिवसेनाप्रमुखांनी संघर्ष करण्याचा मार्ग दाखवला, असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना दसरा मेळाव्यात व्यक्त केलं आहे. 

 

26 Oct, 24:29 (IST)

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज दसऱ्याच्या शुभदिनी सहकुटुंब हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.

26 Oct, 24:20 (IST)

शक्तिकांत दास यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे.

 

26 Oct, 24:10 (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सावरकर स्मारकारत पोहोचले असून त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील सावरकर स्मारकारत दाखल झाले आहेत. 

 

25 Oct, 23:45 (IST)

केरळमध्ये आज 6,843 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. सध्या राज्यातील 96,585 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

25 Oct, 23:25 (IST)

नागालँडमध्ये आज 111 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 55 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

25 Oct, 22:55 (IST)

विरोधी पक्ष दिशाहीन झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशाला विरोध करण्यास सुरुवात केली आहे, असा आरोप भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केला.

25 Oct, 22:30 (IST)

शिवसैनिक आणि  राज्यातील राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागून राहिलेला शिवसेना दसरा मेळावा अवघ्या तासाभरात सुरु होणार आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावर असताना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे आपल्या भाषणात ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read more


राज्य आणि देशभरात आज विजयादशमी म्हणजेच दसरा सण साजरा होत आहे. कोरोना व्हायरस संकटाचे सावट अद्यापही कायम असल्यामुळे दरवर्षीचा उत्साह यंदाच्या दसऱ्यात पाहायला मिळत नाही. तरीही नागरिक आपापल्या पद्धतीने सोशल डिस्टन्सींग आणि सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करताना दिसत आहेत. नागरिकांनी घरं सजवली आहेत. घरासमोर रांगोळी काढून, चौकटींना हार घातले आहेत. व्यवसायिक, दुकानदार आणि विविध संस्था संघटना यांनीही आपली अवजारं, शस्त्र पुजली आहेत. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा मुहूर्त असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आज सोने खरेदी, गृहप्रवेश, गृह, वाहन अथवा महत्त्वाच्या वस्तू, खरेदी करण्यावर भर दिला जातो.

दरम्यान, परंपरेने साजरा होत असलेला दसऱ्यासोबतच राजकीय पक्षांचा दसराही खास असतो. त्यामुळे हे पक्ष संघटना यंदाचा दसरा कसा साजरा करतात याकडे विशेष लक्ष लागून राहिले आहे. गेल्या अनेक दशकांची परंपरा असलेला शिवसेना दसरा मेळावा यंदा कोरना व्हायरसच्या सावटामुळे अत्यंत साधेपणाने आणि केवळ 50 जणांच्या उपस्थितीत वीर सवरकर हॉल मुंबई येथे पार पडत आहे. शिवसेना दसरा मेळाव्याला मोठी परंपरा आहे. हा मेळावा नेहमी दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर होतो. शिवसेना या मैदानाला शिवतीर्थ असे म्हणते. मात्र, यंदा हा मेळावा अत्यंत साधेपणाने साजरा होत आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सवही नेहमी मोठ्या उत्साहात साजरा होतो. परंतू, यंदा संघाचा उत्सवही अवघ्या 50 लोकांच्या उपस्थितीत साजरा केला जात आहे. या उत्सवात संघाचे सरसंघचालक मोहन भागवत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यासोबतच भाजप नेत्या पंकजा मुंडे यासुद्धा गोपीनाथगडावरुन आपल्या मेळाव्यात भाषण करणार आहेत. त्यांचा मेळावाही डिजिटल पद्धतीने साजरा होणार असून, व्हर्च्युअल मेळाव्यात त्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा आज 'मन की बात' या रेडीओ कार्यक्रमातून देशातील जनतेला संबोधित करणार आहेत.

दरम्यान, कोरोनाव व्हायरस, राजकारण, अर्थकारण, खेळ, उद्योग, कृषी, गुन्हे आणि यांसह विविध क्षेत्रातील ताज्या घटना घडामोडी तपशीलासह जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग सोबत जोडलेले राहा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now