सुरक्षेच्या कारणास्तव WHO ने थांबवली हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची चाचणी; 25 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी लॉकडाऊन निर्णयाची घोषणा करणे आणि तो अचानक जाहीर करणे चुकीचे होते. त्याच प्रमाणे 31 मे नंतर लॉकडाऊन जसा जाहीर केला त्याच पद्धतीने म्हणजेच अचानकपणे हटविणे चुकीचे ठरेल.

26 May, 04:26 (IST)

WHO ने सुरक्षेच्या कारणास्तव कोरोनाव्हायरसच्या उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या, मलेरिया ड्रग हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची चाचणी थांबविली आहे. वृत्तसंस्था एएफपीने ही बातमी दिली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सोमवारी सांगितले की, खबरदारी म्हणून कोरोना विषाणूच्या उपचारांसाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची क्लिनिकल चाचणी तात्पुरती बंद केली आहे.

26 May, 03:50 (IST)

पुणे जिल्ह्यात मागील 24 तासांत 459 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची आणि 8 मृत्यूची नोंद झाली आहे. अशाप्रकारे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 6153 व मृत्यूची संख्या 280 झाली आहे.

26 May, 03:25 (IST)

देशांतर्गत विमान प्रवासासाठी सर्व प्रवाशांना त्यांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्याचा सल्ला, दिल्ली सरकारने मार्गदर्शक सूचना म्हणून दिला आहे.

26 May, 02:56 (IST)

देशात लॉक डाऊन असतानाही, आता मंगळवारपासून भुवनेश्वरमधील बस सेवा पुन्हा सुरू होणार आहे. इथल्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.

26 May, 02:25 (IST)

हरियाणा येथे आणखी 29 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 1213 वर पोहचला आहे.

26 May, 02:11 (IST)

मुंबईत आज आणखी 1430 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 31,789 वर पोहचला आहे.

26 May, 02:02 (IST)

झारखंड येथे आणखी 14 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 392 वर पोहचला आहे.

26 May, 01:51 (IST)

अहमदाबाद येथे आणखी 310 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा  10,590 वर पोहचला आहे.

26 May, 01:32 (IST)

गुजरात येथे गेल्या 24 तासात 405 जणांना कोरोनाची लागण झाल्याने आकडा 14,468 वर पोहचला आहे.

26 May, 01:16 (IST)

महाराष्ट्रात आज आणखी 2436 जणांना कोरोनाची लागण झाल्याने आकडा 52 हजारांच्या पार गेला आहे.

26 May, 01:11 (IST)

गोव्यात आणखी एका व्यक्तीची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 67 वर पोहचला आहे.

26 May, 01:03 (IST)

मणिपूर येथे आणखी 2 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 36 वर पोहचला आहे.

26 May, 24:44 (IST)

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळात येणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

26 May, 24:25 (IST)

पंजाब येथे आणखी 21 जणांना कोरोनाची लागण झाल्याने आकडा 2081 वर पोहचला आहे.

26 May, 24:11 (IST)

आसाम येथे आणखी 48 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 514 वर पोहचला आहे.

25 May, 23:56 (IST)

धारावीत आज आणखी 42 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 1583 वर पोहचला आहे.

25 May, 23:32 (IST)

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची नारायण राणे यांची राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे मागणी केली आहे.

25 May, 23:18 (IST)

लॉकडाउनच्या काळात सायबर सेल कडून 419 FIR दाखल तर 223 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आले आहे.

25 May, 22:57 (IST)

केरळात आणखी 49 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 359 वर पोहचला आहे.

25 May, 22:36 (IST)

सरकारने विमानोड्डाणास मान्यता दिल्याने गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी दाखल झाले आहेत. विमानतळ संचालक गगन मलिक यांनी माहिती देताना म्हटले आहे की, "या विमानतळावरुन तीन विमानांचे उड्डाण होईल त्यानुसार दिल्ली आणि बंगळुरुसाठी ही विमाने झेपावतील.

Read more


कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊनला जनता आता सरावली आहे. लॉकडाऊन काळात नियमांचे पालन करुन आपले व्यवहार करण्यात नागरिक बऱ्यापैकी प्राधान्य देत आहेत. लॉकडाऊन पूर्णपणे हटविण्यात आला नसला तरी, काही प्रमाणात शिथिलता मिळाल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे दिसते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काल (24 मे 2020) राज्यातील जनतेला उद्देशून केलेल्या फेसबुक लाईव्ह संवादात लॉकडाऊन आणि तो हटविण्याबाबत काही माहिती दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी लॉकडाऊन निर्णयाची घोषणा करणे आणि तो अचानक जाहीर करणे चुकीचे होते. त्याच प्रमाणे 31 मे नंतर लॉकडाऊन जसा जाहीर केला त्याच पद्धतीने म्हणजेच अचानकपणे हटविणे चुकीचे ठरेल. कोरना व्हायरस संकट हळूहळू कमी होत जाईल. परंतू, पुढचे सर्वात मोठे आव्हान असेल ते राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती देण्याचे. त्यासाठी राज्य सरकारकडून विशेष प्रयत्न केले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भाषणात केंद्राकडून मिळणारा निधी, उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या रेल्वे यांबाबत काही मुद्दे मांडले. त्यानंतर भाजपने मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. तर रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनीही मजुरांची यादी केंद्राला द्या. आम्ही हव्या तेवढ्या ट्रेन देऊ, असे आव्हान उद्धव ठाकरे यांना दिले. त्यामुळे यापुढे महाराष्ट्र विरुद्ध केंद्र असा संघर्ष पाहायाला मिळतो काय? याबाबत मोठी चर्चा आहे. दरम्यान, यांसह शेती, अर्थ, उद्योग आणि विविध घटना घडामोडी आणि ठळक मुद्द्यांबाबत माहिती जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी सोबत जोडलले राहा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now