प्रमुख शहरांमधील घर विक्री ऑक्टोबर ते डिसेंबर 2020 मध्ये चतुर्थांश-तिमाही आधारावर 50 टक्क्यांनी वाढली; 25 जानेवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

राजभवनावर निघणाऱ्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेच्या नेतृत्वात हा मोर्चा निघत आहे. महाराष्ट्रातील सुमारे 21 जिल्ह्यांमधून शेतकरी आणि कामगार हे मुंबई येथे दाखल झाले आहेत.

26 Jan, 04:55 (IST)

Http://99acres.com च्या अहवालानुसार, प्रमुख शहरांमधील घर विक्री ऑक्टोबर ते डिसेंबर 2020 मध्ये चतुर्थांश-तिमाही आधारावर 50 टक्क्यांनी वाढली आहे.

26 Jan, 04:14 (IST)

कर्नल संतोष बाबू, एनबी सब नुदुराम सोरेन, के पलानी, तेजिंदर सिंग, एनके दीपक सिंह सेप्ट गुरतेज सिंह यांच्यासह लष्कराच्या सहा जवानांना गलवान व्हॅली संघर्षासाठी शौर्य पदके प्रदान केली गेली.

26 Jan, 03:42 (IST)

राज्यात आज 477 केंद्रांवर 35, 816 (74 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात आज धुळे जिल्ह्यात सर्वात जास्त 144 टक्के लसीकरण झाले आहे. पाठोपाठ वर्धा, भंडारा, उस्मानाबाद, सातारा या जिल्ह्यांत 100 टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले. आजपासून लसीकरण सत्राला सुरवात झाली. उद्या मंगळवार वगळता पाच दिवस लसीकरण सत्र होईल. 31 जानेवारीला पोलिओ लसीकरण असल्याने 30 जानेवारीचे कोरोना लसीकरण सत्र होणार नाही.

26 Jan, 02:48 (IST)

सरकारकडून 'पद्म' पुरस्कारांची घोषणा झाली आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे, गायक एस पी बालसुब्रमण्यम (मरणोत्तर), वाळू कलाकार सुदर्शन साहू, पुरातत्वशास्त्रज्ञ बीबी लाल पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

26 Jan, 02:45 (IST)

सैन्याच्या Advanced Light Helicopter ध्रुवने जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात क्रॅश लँडिंग केल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये 2 पायलट जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

26 Jan, 02:27 (IST)

गुजरात मध्ये आज दिवसभरात 390 कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 2,59,487 वर पोहोचली आहे.

26 Jan, 01:52 (IST)

मुंबईत आज 348 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून कोरोना बाधितांची एकूण संख्या  3,06,393 वर पोहोचली आहे.

26 Jan, 01:29 (IST)

महाराष्ट्रात आज दिवसभरात 3080 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 19,15,344 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच आज दिवसभरात 1842 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

26 Jan, 01:07 (IST)

कर्नाटक मध्ये 375 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची एकूण संख्या 9,36,426 वर पोहोचली आहे.

26 Jan, 01:01 (IST)

आज जम्मू-काश्मीर मधील भारतीय सेनेच्या रुग्णालयात स्वास्थ्य कर्मचा-यांना कोविड लस देण्यात आली आहे.

26 Jan, 24:54 (IST)

नैसर्गिक आपत्ती आणि कोविड सारखा कठीण काळ असताना देखील शेतकरी बांधवांनी कृषी उत्पादनात कुठलीही कसर ठेवली नाही असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.

26 Jan, 24:49 (IST)

एक कृतज्ञ राष्ट्र म्हणून आमच्या शेतक-यांच्या हितासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहे असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शेतक-यांना संबोधित करताना म्हणाले.

26 Jan, 24:25 (IST)

तमिळनाडू मध्ये आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी डिंडीगुल रोड शो केला. See Pics

26 Jan, 24:03 (IST)

आतापासून दर दिवसा 1138 एक्सप्रेस धावणार. यात फेस्टिवल रेल्वेचाही समावेश असल्याची माहिती भारतीय रेल्वे मंत्रालयाने दिली.

25 Jan, 23:18 (IST)

जम्मू-काश्मीर येथील कुपवाडा जिल्ह्यात हंदवाडा येथे भारतीय सैन्याकडून प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरु आहे. अशा परिस्थितीत होणा-या संभाव्य घटनांविषयी माहिती देऊन आम्ही येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत आहोत अशी माहिती  आरआर बटालियनचे द्वितीय कमांडर लेफ्टनंट कर्नल गारगोटे यांनी दिली.

25 Jan, 22:53 (IST)

नाशिक जिल्ह्यात आज थंडीचा कडाका पुन्हा वाढला असून येथील तापमान 10.4 अंश सेल्सियस इतके झाले आहे. 

 

25 Jan, 22:30 (IST)

राज्यपालांवर झालेल्या टीकेनंतर राजभवनाकडून पत्रकाद्वारे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आजच्या शेतकरी मोर्चात राज्यपलांवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती.

25 Jan, 22:10 (IST)

राजभवनावर राज्यपाल उपस्थित नसल्यामुळे निवेदन न देताच शेतकरी मोर्चा परत फिरला आहे. राज्यपलांना देण्यासाठी आणलेले निवेदनही शेतकऱ्यांनी फाडून टाकले.

25 Jan, 21:59 (IST)

राज्यपाल जर राजभवनावर नसतील तर आम्हीही राजभवनावर जाणार नाही. राज्यपालांना देण्यात येणारे निवेदन आम्ही इथेच फाडून टाकणार आहोत. आपले निवेदन आपण राष्ट्रपतींना पाठवणार आहोत, असा पवित्रा आंदोलक शेतकऱ्यांनी घेतला आहे.

25 Jan, 21:40 (IST)

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने उभारलेल्या भिवंडी -कल्याण- शिळफाटा रस्त्यावरील पत्रीपूल रेल्वे उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला.

Read more


केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी देशभरातील शेतकरी दिल्ली येथे जमले आहेत. यात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचा मोठा समावेश आहे. दरम्यान, देशभरातील राज्यांच्या राजभवनांवरही शेतकरी प्रादेशिक पातळीवर मोर्चा काढणार आहेत. महाराष्ट्रातही या मोर्चाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. नाशिक आणि राज्याच्या इतर भागांतून आलेले शेतकरी आणि कामगार मुंबई येथे रविवारी दाखल झाले आहेत. हे शेतकरी राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवन येथे मोर्चा काढणार आहेत. या मोर्चांत शेतकरी, कामगार ट्रॅक्टर घेऊन सहभागी होणार आहेत.

दरम्यान, राजभवनावर निघणाऱ्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेच्या नेतृत्वात हा मोर्चा निघत आहे. महाराष्ट्रातील सुमारे 21 जिल्ह्यांमधून शेतकरी आणि कामगार हे मुंबई येथे दाखल झाले आहेत.

दरम्यान, मुंबईत होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकाही सतर्क झाली आहे. मोर्चास्थळी आणि गर्दीच्या स्थळी आरोग्य अथवा स्वच्छतेच्या प्राथमिक गरजांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या निर्माण होऊ नयेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेने आवश्यक ती सेवा पुरवली आहे.

मोर्चाच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी मुंबई पोलीस सज्ज असून आवश्यक तो बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आझाद मैदानाभोवती सुमारे 100 पोलीस अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली पोलिसांच्या 500 तुकड्या तैनात केल्या आहेत. शिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या नऊ तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, शेतकरी आंदोलनासोबतच शेती, क्रीडा, साहित्य, समाज, संस्कृती, विज्ञान, अर्थकारण, राजकारण, उद्योगविश्व, इंटरनेट, डिजिटल वर्ल्ड आणि इतर क्षेत्रातील घटना घडामोडींचा ताजा तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now