शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील आम्ही नाही; वारीस पठाण विधानावरून देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका ; 25 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
सररकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरु झाले. आज या अधिवेशनाचा दुसरा दिवस. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करुन राज्य सरकारने कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या विरोधकांच्या शिडातील हवा पहिल्याच दिवशी काढून घेतली. त्यामुळे आता अधिवेशनात आज नव्याने काय मुद्दे चर्चेला येतात याबाबत उत्सुकता आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारला निशाणा करत वारिस पठाण यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील पण आम्ही नाही. जर कोणी काही बोलले तर त्याला त्याच प्रकारे उत्तर दिले जाईल. भाजपाकडे इतकी सत्ता आहे. असे फडणवीस यांनी आझाद मैदान येथे आयोजित केलेल्या सभेच्या दरम्यान म्हंटले आहे.
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या वतीने महाविकास आघाडी सरकारने सुरु केलेल्या ‘शिवभोजन थाळी’ योजनेसाठी 5 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रस्टच्या विश्वस्तांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दिल्ली सरकारच्या शिक्षण संचालनालयाच्या विनंतीनुसार आणि विद्यार्थी, कर्मचारी आणि पालकांची गैरसोय टाळण्यासाठी दिल्लीच्या उत्तर पूर्व भागात 26 फेब्रुवारी रोजी होणार्या 10वी आणि 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
एप्रिल 2020 मध्ये निवृत्त होणाऱ्या राज्यसभा सदस्यांच्या जागा भरण्यासाठी येत्या 26 मार्च ला निवडणुका घेतल्या जाणार आहेत, महाराष्ट्रातील सात राज्यसभेच्या जागा यामार्गे भरल्या जातील. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत माहिती दिली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत. तसेच भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि त्यांची पत्नी सविता कोविंद यांनी ट्रम्प दांमत्याचे स्वागत केले आहे. ट्वीट-
हिंगणघाट घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता. त्यानंतर आंध्रप्रदेश सरकारने केलेल्या ‘दिशा’ कायद्याची माहिती घेण्यासाठी गुरूवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ आंध्र प्रदेशमध्ये गेले होते. आता या शिष्टमंडळाने या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नियुक्त केली आहे.
नागरिकत्व कायद्याच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शन केली जात आहे. यातच काल मुंबई येथील मरिन ड्राईव्ह परिसरात नागरिकांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात अंदोलन केली होती. मरीन ड्राईव्ह येथे अंदलोनकर्त्यांपैकी 30 ते 35 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आल्यीच माहिती समोर आली आहे. ट्वीट-
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था आदी मुद्द्यांवर राज्यातील भाजप नेते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. ठाकरे सरकारची कर्जमाफी फसवी असून 60 हजार शेतकऱ्यांची पत्रे राज्यपाल यांच्याकडे देण्यात आली आहेत, अशी माहिती टीव्ही9ने दिली. तसेच राज्यपालांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. होस्नी मुबारक यांनी वयाच्या 91 वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ट्वीट-
ईशान्य दिल्लीत CAA आणि NRC ला विरोध करण्यासाठी सुरु झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यानंतर काही वेळातच दिल्लीच्या भजनपुरा परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. या कारणास्तव या 144 कलम लागू करण्यात आला आहे. पाहा काही ताजे फोटोज:
हिसाचार झाल्यानंतर केंद्र सरकार खडबडून जागे झाले असून, ईशान्य दिल्ली परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. तसेच, या परिसरात एक महिन्यांसाठी जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. ईशान्य दिल्लीत CAA आणि NRC ला विरोध करण्यासाठी सुरु झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आजही या ठिकाणी येथे हिंसाचाराच्या
हिसाचार झाल्यानंतर केंद्र सरकार खडबडून जागे झाले असून, ईशान्य दिल्ली परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. तसेच, या परिसरात एक महिन्यांसाठी जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. ईशान्य दिल्लीत CAA आणि NRC ला विरोध करण्यासाठी सुरु झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आजही या ठिकाणी येथे हिंसाचाराच्या
हिसाचार झाल्यानंतर केंद्र सरकार खडबडून जागे झाले असून, ईशान्य दिल्ली परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. तसेच, या परिसरात एक महिन्यांसाठी जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. ईशान्य दिल्लीत CAA आणि NRC ला विरोध करण्यासाठी सुरु झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आजही या ठिकाणी येथे हिंसाचाराच्या
हिसाचार झाल्यानंतर केंद्र सरकार खडबडून जागे झाले असून, ईशान्य दिल्ली परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. तसेच, या परिसरात एक महिन्यांसाठी जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. ईशान्य दिल्लीत CAA आणि NRC ला विरोध करण्यासाठी सुरु झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आजही या ठिकाणी येथे हिंसाचाराच्या
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था आदी मुद्द्यांवर राज्यातील भाजप नेते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. भाजपने आज राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनालाही अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
दिल्ली: सीएए, एनआरसी विरोधक-समर्थक यांच्यात झालेल्या हिंसाचारामुळे व्यथीत झालेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली प्रार्थना. गेल्या दोन दिवसांत दिल्लीत झालेल्या हिंसाचारामुळे संपूर्ण देश चिंतेत आहे. यामध्ये जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान झाले आहे. जर हिंसा वाढली तर त्याचा प्रत्येकावर परिणाम होईल, असे मतही केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे.
पर्यावरणाची हानी केल्याबद्दल डोंबिवलीतील 50 उद्योगांना प्रत्येकी तब्बल 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनने ही कारवाई केली आहे. येत्या 7 दिवसांत ही रक्कम प्रदूषणनियंत्रण मंडळ कार्यालयात जमा करावी असेही आदेश या कंपन्यांना देण्यात आले आहेत.
नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (NRC) बिहारमध्ये लागू करणार नाही. बिहार विधानसभेने संमत केला ठराव. तसेच, राष्ट्रीय लोकसंख्या नेदणी 2010 प्रमाणेच लागू करण्याचा निर्णय सरकारने एका दुरुस्थीसह घेतला.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना राबविण्यात आलेली जलयुक्त शिवार योजना अत्यंत फसवी असून, त्यात भ्रष्टाचर झाला आहे. अनेक कामंही अत्यं निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा अहवाल पुणे येथील युनीक रिसर्च संस्थेने दिला आहे.
सीएए, एनआरसी यांवरुन राजधानी दिल्लीमध्ये उसळलेला आगडोंब. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा सुरु असतानाच ईशान्य दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी झालेला गोळीबार, त्यात एका व्यक्तीचा मृत्यू. अनेकांचे जखमी होणे. यांमुळे सीएए, एनआरसी आणि दिल्ली चर्चेच्या आणि कायदासुव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आली आहे. दुसऱ्या बाजुला डोनाल्ड ट्रम्प हे भरत भेटीवर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या दौऱ्यात काय घडामोडी घडतात. भारत अमेरिका यांच्यात काय करार होतात. उभय देशांतील संबंध अधिक दृढ करण्यासाठी काय पावले टाकली जातात यांवरही आज दिवशभर लक्ष ठेवले जाणार आहे.
राज्य विधिमंडळाचे आणि पर्यायाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सररकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरु झाले. आज या अधिवेशनाचा दुसरा दिवस. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करुन राज्य सरकारने कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या विरोधकांच्या शिडातील हवा पहिल्याच दिवशी काढून घेतली. त्यामुळे आता अधिवेशनात आज नव्याने काय मुद्दे चर्चेला येतात याबाबत उत्सुकता आहे.
जगभरासाठी डोकेदुखी ठरलेला कोरोना व्हायरस आजही आपल्या संकटाची छाया जगावर कायम ठेऊन आहे. दररोज या कुठे ना कुठे नागरिकाना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त येत आहे. त्यामुळे हे संकट पुढे आणखी किती गहिरे होणार हाही एक प्रश्नच आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसबाबतही घडणाऱ्या घडामोडींवर लेटेस्टली लक्ष ठेऊन आहे.
दरम्यान, वरील विविध मुद्द्यांसह स्थानिक प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्वच पातळींवर घडणाऱ्या घटना, घडामोडी आदींवर लेटेस्टली मराठी लक्ष ठेऊन असणार आहे. त्यामुळे ठळक घटना आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठीसोबत जोडलेले राहा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)