पुणेकरांना लवकरात लवकर मेट्रोची सुविधा देऊन वाहतुकीवरचा ताण करणार- अजित पवार; 22 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

23 Nov, 04:58 (IST)

पुणेकरांना लवकरात लवकर मेट्रोची सुविधा देऊन वाहतुकीवरचा ताण कसा कमी करता येईल याकडे आमचे लक्ष आहे. कुठेही निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. कचरा प्रश्न, सोलापूर रोडची वाहतूककोंडी यांसारख्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मी, दिलीप वळसे पाटील आणि इतर सहकारी प्रयत्नशील आहोत, असे अजित पवार म्हणाले आहेत. ट्वीट-

 

23 Nov, 03:59 (IST)

महाराष्ट्र: मुंबईच्या कांदिवली पूर्व भागातील ठाकूर व्हिलेज येथे चॅलेंजर्स टॉवरच्या 24 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग लागली होती. ही आग विझवण्यात आली आहे. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.

23 Nov, 03:22 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संसद सदस्यांसाठी बहुमजली फ्लॅटचे उद्घाटन करतील. लोकसभेचे सभापती ओम बिर्लादेखील या वेळी उपस्थित राहणार आहेत. हे फ्लॅट नवी दिल्लीतील डॉ बी डी मार्गावर आहेत, अशी माहिती समोर येत आहे. ट्वीट-

 

 

23 Nov, 03:02 (IST)

कर्नाटक मध्ये आज आणखी 1 हजार 704  जणांची नोंद झाली आहे. तर, 17 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्विट-

 

23 Nov, 02:15 (IST)

उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी रानी मौर्या यांना कोरोनाची लागण झाली आहे.

23 Nov, 02:12 (IST)

धार्मिक स्थळ नागरिकांच्या मागणीमुळे पुन्हा सुरु केली पण त्या ठिकाणी गर्दी करु नये असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

23 Nov, 01:50 (IST)

राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावायचा नाही आहे असे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. 

23 Nov, 01:49 (IST)

कोरोनापासून जेवढे लांब राहता येईल तेवढे रहा असे आवाहन मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

23 Nov, 01:47 (IST)

पोस्ट कोविडचे परिणाम भयंकर ठरतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

23 Nov, 01:46 (IST)

कोरोनाच्या काळात  शाळा उघडण्याची सुद्धा अद्याप भीती आहेच असे  उद्धव ठाकरे यांनी म्हटले  आहे. 

23 Nov, 01:44 (IST)

मास्क घाला, अंतर पाळा आणि हात धुवा हेच तीन कोरोनाच्या काळातील तीन मुख्य उपाय असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

23 Nov, 01:43 (IST)

कोरोनावरील लस अद्याप हातात आलेली नाही असे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. 

23 Nov, 01:42 (IST)

कोरोना गेलेला नाही त्यामुळे गर्दी करु नका असे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

23 Nov, 01:39 (IST)

कार्तिकी यात्रेला गर्दी करु नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 

23 Nov, 01:38 (IST)

राज्यातील जनतेच्या सहकार्याला तोड नाही असे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

23 Nov, 01:37 (IST)

महाराष्ट्र करुन दाखवल्याशिवाय राहत नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

23 Nov, 01:36 (IST)

26/11 च्या शूरवीरांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली  वाहिली आहे. 

23 Nov, 01:35 (IST)

आजपर्यंत जे काही सण झाले ते अत्यंत साधेपणाने आणि संयमाने साजरे केले गेले असल्याचे मुख्यमंत्री   उद्धव ठाकरे  यांनी म्हटले आहे. 

23 Nov, 01:33 (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात झाली आहे. 

23 Nov, 01:32 (IST)

गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या मृत्यनंतर केंद्रीय सुरक्षामंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या परिवाराची भेट घेतली आहे.

Read more


देशात कमी झालेल्या कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं चित्र दिसून येत आहे. शनिवारी देशात 46 हजार 232 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या 90 लाख 50 हजार 597 इतकी झाली आहे. तसेच 564 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 32 हजार 726 वर पोहोचली आहे.

याशिवाय महाराष्ट्रातदेखील कोरोना रुग्णांच्या संख्येत शनिवारी मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. काल दिवसभरात राज्यात 5 हजार 760 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले. तसेच 62 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवाळीनंतर करोना रुग्णांची संख्या वाढणार असल्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली होती. त्यानुसार, दिवाळी आणि हिवाळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. नागरिकांनी योग्य खबरदारी न घेतल्यास देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दरम्यान, सोमवारपासून राज्यातील इयत्ता 9 वी ते 12 चे वर्ग सुरु होणार आहेत. त्यामुळे सध्या सर्व शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत 8 शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच नांदेड जिल्ह्यात 22 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शिक्षकांनाचं कोरोना विषाणूची लागण झाल्याने पालक आणि शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement