दिल्लीत मध्यरात्री 1 वाजेपर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता; 20 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

मुंबई, ठाणे सह देशा-परदेशातील ठळक घडामोडी, महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी मराठी लेटेस्टलीला भेट द्या.

21 Jul, 05:17 (IST)

दिल्लीच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान खात्याने राष्ट्रीय राजधानीवर काही ठिकाणी पहाटे 1 वाजेपर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

21 Jul, 04:45 (IST)

आसाम राज्यातील 24 जिल्हे आणि 24,30,502 लोकांना पुराचा फटका बसला आहे. पूर ग्रस्तांसाठी राज्यभरात 468 शिबिरे उभारली आहेत. काझीरंगा नॅशनल पार्क येथे पुरामुळे 113 प्राण्यांचा मृत्यू झाला, तर 140 जनावरांची सुटका करण्यात आली आहे. एएनआयचे ट्वीट-

 

 

 

21 Jul, 04:19 (IST)

पुणे शहरात आज 1,817 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्ण संख्या 39,203 झाली आहे. 830 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या 14, 757 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता 2,09,222 झाली असून आज 6,918 स्वॅब टेस्ट घेण्यात आल्या.

21 Jul, 04:06 (IST)

गोवा येथील रेडकर हॉस्पिटलमध्ये कोरोना व्हायरसची स्थानिक स्वरूपाची विकसित लस Covaxin च्या मानवी चाचण्या सुरू झाल्या आहेत. गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत माहिती दिली.

21 Jul, 03:43 (IST)

पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज 2 हजार 282 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ज्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 44 हजार 769 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

 

21 Jul, 02:59 (IST)

महाराष्ट्रात  आज तब्बल 8 हजार 240 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 176 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 18 हजार 695 वर पोहचली आहे. यापैकी 1 लाख 75 हजार 29 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 1 लाख 31 हजार 334 जणांवर उपचार सुरु आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

 

 

21 Jul, 02:09 (IST)

मुंबईत आज कोरोनाच्या आणखी 1043 रुग्णांची भर पडल्याने आकडा 1,02,267 वर पोहचला आहे.

21 Jul, 02:00 (IST)

शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भुमिपूजनासाठी बोलवण्यासाठी राम जन्मभूमी तिर्थ क्षेत्राच्या ट्रस्टींना पत्र लिहिले आहे.

21 Jul, 01:49 (IST)

महाराष्ट्रात आज कोरोनाचे आणखी 8240 रुग्ण आढळून आले असून 176 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील COVID19 चा आकडा 3,18,695 वर पोहचला आहे. 

 

21 Jul, 01:44 (IST)

कांदिवली रेल्वे स्थानकात घडललेल्या अपघाताप्रकरणी चार जणांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

21 Jul, 01:23 (IST)

ICC Men's T20 World Cup 2020 कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आला आहे.

21 Jul, 01:19 (IST)

सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी वांद्रे पोलीस स्थानकात तीन Psychiatrists आणि एका Psychotherapist यांनी जबाब नोंदवला आहे.

21 Jul, 24:59 (IST)

गुजरात येथे गेल्या 24 तासात कोरोनाचे आणखी 998 रुग्ण आढळून आले असून आकडा 49,439 वर पोहचला आहे.

21 Jul, 24:31 (IST)

मुंबईतील धारावीत आणखी कोरोनाचे 12 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2492 वर पोहचला आहे.

21 Jul, 24:23 (IST)

भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी वरवरा राव यांचे कोविड19 चे रिपोर्ट्स संदर्भात NIA आणि राज्य सरकारने कळवावे असे  बॉम्बे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.

21 Jul, 24:03 (IST)

हिमाचल प्रदेशात कोरोनाबाधितांचा आकडा 1561 वर पोहचला आहे.

20 Jul, 23:44 (IST)

तमिळनाडू येथे कोरोनाचे आणखी 4985 रुग्ण आढळून आले असून 70 जणांचा बळी गेला आहे.

20 Jul, 23:22 (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच ठरवतील अयोध्या राम मंदिराच्या भुमीपुजनासाठी जायचे की नाही असे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

20 Jul, 23:14 (IST)

दिल्लीत आणखी 954 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 53 जणांचा बळी गेला आहे.

20 Jul, 23:04 (IST)

यवतमाळ येथे 8 जणांची कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 382 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Read more


महाराष्ट्रामध्ये आरोग्या विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, काल (19 जुलै) च्या रात्री सर्वाधिक रूग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. काल रात्री महाराष्ट्रात 9 हजार 518 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 258 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 10 हजार 455 वर पोहचली आहे. यापैकी 11 हजार 854 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 69 हजार 569 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुणे जिल्ह्यात रूग्णसंख्येने 50 हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता ठाणे, पुणे, डोंबिवली, कल्याणमध्ये अजूनही काही प्रमाणात लॉकडाऊन सुरू आहे. ठाण्यात आता कटेन्मेंट आणि हॉट्स स्पॉट्समध्ये लॉकडाऊन असेल. तर पुण्यामध्ये आजपासून दुसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू झाला आहे. पुण्यातील लॉकडाऊन 23 जुलै पर्यंत असेल. तर 31 जुलै पर्यंत ठाणे, कल्याण डोंबिवली च्या कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

जगभरात कोरोना व्हायरसमुळे शिक्षण व्यवस्थेला फटका बसला आहे. राज्यात आता आजपासून सह्याद्री चॅनलवर टीली मिली हा नवा कार्यक्रम प्रसारित होणार आहेत. यामध्ये 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना टेलिव्हिजनवर अभ्यासक्रमपर कार्यक्रम दाखवले जाणार आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now