इंग्लंड विरुद्ध टी-20 मालिकेत संजू सॅमसन याची भारतीय संघात निवड न झाल्याने चाहते नाराज; 20 फेब्रुवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आजच्या दिवसभरातील ताज्या बातम्या, महत्त्वाच्या घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठीसह जोडलेले रहा...
इंग्लंड विरुद्ध टी-20 मालिकेत अनेक भारतीय युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मात्र, या यादीत राजस्थानचा तडाखेबाज फलंदाज संजू सॅमसनचे नाव नसल्याने त्याच्या चाहत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे.
चमोली जिल्ह्यातील तपोवन येथील धरणाच्या ढिगाऱ्याखाली आणखी पाच मृतदेह सापडले आहेत. आतापर्यंत एकूण 67 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, अशी माहिती उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी दिली आहे. ट्वीट-
जम्मू काश्मीरच्या बाराजुल्ला भागात दहशतवाद्याने केलेल्या गोळीबारात 2 पोलीस जवान शहीद झाले. या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. जम्मू काश्मीर पोलीस दहशतवाद्यांना नक्कीच धडा शिकवतील अशी मला खात्री आहे, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत. ट्वीट-
मी अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात नाही तर त्यांच्या कार्याविरूद्ध बोललो. ते खरे नायक नाहीत. जर ते असते तर दु: खाच्या वेळी ते लोकांच्या पाठीशी उभे राहिले असते. त्यांना 'कागज के शेर' रहायचो असेल तर, आम्हाला काही अडचण नाही, असे महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रमुख नाना पटोले म्हणाले आहेत. ट्वीट-
मुंबई: तोतया पोलिस बनून पंचतारांकित हॉटेलमधून 12 कोटी लुटल्याप्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुरदृष्टीचे आहेत. कोरोनाचे संकट पुढील काळात कसे वाढेल याचा त्यांना अंदाज होता. त्यामुळेच त्यांनी टप्प्याटप्प्याने सेवा सुरु करण्याकडे त्यांचा कल होता. त्यावेळेस मंदिरं, शाळा सुरु करण्याबाबत आग्रही असणारे विरोधक रुग्णवाढीची जबाबदारी घेणार आहेत का? असा सवालही संजय राऊत यांनी केला.
पर्यावरणवादी मुलांमुळे देशाला धोका कसा? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. देशात आजही आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी खुलेपणाने लावली होती. आता ती छुप्या पद्धतीने लावण्यात आली आहे. तसंच त्यांनी इंधन दरवाढीबद्दलही भाष्य केले.
राज्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लादण्यात आले असून मुंबईतही कडक नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. तसंच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एनआयटीआय आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या सहाव्या बैठकीचे अध्यक्षपद भुषवतील. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. यात कृषी, पायाभूत सुविधा, उत्पादन, मानव संसाधन विकास, तळागाळातील सेवा वितरण आणि आरोग्य व पोषण या विषयावर चर्चा होईल.
पेट्रोल डिझेलच्या दरात आज सलग 12 व्या दिवशीही वाढ झाली आहे. आज दिल्लीत पेट्रोलचे दर 90.58 प्रति लीटर असून डिझेल 80.97 रुपये प्रति लीटरने मिळत आहे. इंधनदरात सातत्याने होणाऱ्या वाढीचा बोजा सर्वसामान्यांच्या खिशावर पडत आहे. यावरुन काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून केंद्र सरकारला वारंवार लक्ष्य केले जात आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणावरुन विरोधक पेटून उठले असून संबंधित मंत्री संजय राठोड यांच्या चौकशीची आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.