महाराष्ट्रातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढतेय; महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती; 20 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय कारण राज्यात सर्वाधिक चाचण्या केल्या जात आहेत. त्यासाठी आयसीएमआरच्या सूचना कटाक्षाने पाळल्या जात आहे. घरोघर जाऊन नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण देखील केले जात आहे.त्यासाठी 6359 पथके कार्यरत आहेत. कुठलीही तडजोड न करता सर्वेक्षण केले जात आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ट्वीट-
हृदयविकाराचे आजार, 65 वर्षापेक्षा अधिक व्यक्ती आणि 15 वर्षाखालील मुलांना Hydroxychloroquine दिले जात नाही असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोना विषाणूने संपूर्ण भारतात हाहाकार माजवला आहे. दिल्लीतही कोरोनाचे जाळे पसरत चालले आहे. दिल्लीत आज आणखी 78 रुग्णांची भर पडली आहे. यामुळे कोरोना बाधीत रुग्णांची संख्याने 2 हजाराचा वर पोहचली आहे. एएनआयचे ट्वीट-
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली उद्या मध्य प्रदेश मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, अशी माहिती एएनआयने वृत्त संस्थेने दिली आहे. ट्वीट-
कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु असतानाही रुग्णांच्या संख्येत सकारात्मक बदल झाला नाही. यातच महाराष्ट्रात आज आणखी 466 नवे रुग्ण आढळल्याचे समजत आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 4 हजार 666 वर पोहचली आहे. तसेच आज एकूण 65 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एएनआयचे ट्वीट-
मुंबईतील रुग्णालयातील 11 कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र त्यांना 14 दिवसांसाठी होम क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आला आहे. तर गेल्या आठवड्यात जवळजवळ 30 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
मुंबईतील 53 पत्रकारांची कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या सर्वांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर 171 पत्रकारांचे नमूने घेण्यात आले आहेत. हे सर्व पत्रकार फोटोग्राफर्स, व्हिडिओ, जर्नलिस्ट आणि रिपोर्ट्स आहेत. बहुतांश जणांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
कर्नाटकात कोरोनाबाधितांचा आकडा 480 वर तर 16 जणांचा बळी गेला आहे. तसेच 112 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचसोबत गेल्या 24 तासात 18 नव्या कोरोना रुग्णांची भर पडल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
भारतात 1553 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आकडा 17265 वर पोहचल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तसेच गेल्या 24 तासात 36 जणांचा बळी गेल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.
भारताचा कोरोना विरोधातील लढा तीव्र असून त्या पार्श्वभूमीवर 3 मे देशभरात लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. मात्र यामुळे भारताचे अर्थव्यवस्था कोलमडू नये यासाठी 20 एप्रिलपासून केंद्रीय सरकारने एक नवीन नियमावली काढली आहे. त्यानुसार, काही उद्योगधंदे, ऑफिसेस आजपासून सुरु करण्यात येणार आहे. याचाच अर्थ आजपासून काही अंशी लोक घराबाहेर पडतील. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने आजपासून राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवसुली सुरु करण्यात आली आहे. यासंदर्भातील मुंबईतील वाशी टोलनाक्यावरील काही फोटोज आज ANI वृत्तसंस्थेने दाखविली आहेत.
महाराष्ट्रात आज 552 नवीन कोरोना व्हायरस केसेस आणि 12 मृत्यूची नोंद झाली आहे. यासह एकूण सकारात्मक घटनांची संख्या 4200 वर पोहचली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 223 मृत्यूची नोंद झाली असून, 507 रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. भारतात परदेशी नागरिकांसह कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराची लागण झालेल्या लोकांची, संख्या 16,116 झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. मंत्रालयाने रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना व्हायरस संक्रमणामुळे 519 लोक मृत्यूमुखी पडले आहेत आणि सध्या एकूण 13,295 लोक या साथीच्या आजाराशी झुंजत आहेत. त्याचबरोबर, गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूची 1324 नवीन प्रकरणे नोंदविली गेली आहेत, तर 31 लोकांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तर जगभरातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीविषयी बोलायचे झाले तर, अमेरिकेत गेल्या 24 तासांत 1,997 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती AFP न्यूज एजन्सी ने दिली आहे. जगभरात एकूण 24,06,910 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यातील 1,65,059 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)