दिल्ली: हाथरस आणि फार्म बिलावरुन अखिल भारतीय किसान काँग्रेस पक्षाने केलेल्या आंदोलनामुळे काही जणांवर कोरोनासंबंधित नियम आणि कलम 144 चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल ; 2 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
हाथरस आणि फार्म बिलावरुन अखिल भारतीय किसान काँग्रेस पक्षाने केलेल्या आंदोलनामुळे काही जणांवर कोरोनासंबंधित नियम आणि कलम 144 चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हाथरस प्रकरणातील पीडितेचा मृतदेह तिच्या कुटूंबाच्या स्वाधीन न केल्याने हे सिद्ध होते की यूपी सरकार जमीन कायद्याच्या किंवा मूलभूत हक्कांवर विश्वास ठेवत नाही असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
6 ऑक्टोबर रोजी भारत आणि जर्मनी दरम्यान विमाने पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा होणार आहे, जर्मन परिवहन व डिजिटल मूलभूत सुविधा मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.
सामुदायिक शौचालयांची उभारणी व देखभाल करण्यासाठी संसाधने एकत्रित करण्याच्या उद्देशाने राबवलेल्या सहा महिन्यांच्या मोहिमेबाबत, देशात गुजरात राज्याने पटकावला पहिला क्रमांक
हाथरस प्रकरणात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एसपी, डीएसपी, इन्स्पेक्टर आणि काही इतर अधिकाऱ्यांना प्राथमिक तपासणी अहवालाच्या आधारे निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत माहिती दिली.
राजधानी दिल्लीत आज कोरोना विषाणूच्या 2,920 रुग्णांची व 37 मृत्यूंची नोंद झाली आहे. अशाप्रकारे दिल्लीतील एकूण संक्रमितांची संख्या 2.85 लाखावर व मृत्यूंची संख्या 5,438 वर पोहोचली.
मुंबईत आज कोरोना विषाणूच्या 2,440 रुग्णांची व 42 मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या शहरामध्ये 28,472 सक्रीय रुग्णांवर उपचार चालू असून, आतापर्यंत 9,011 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात आज 15,591 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 13,294 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. अशाप्रकारे एकूण 11,17,720 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 2,60,876 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 78.91% झाले आहे.
सध्या हाथरस बलात्कार प्रकरणाबाबत दिल्लीच्या जंतर मंतर येथे प्रदर्शन चालू आहे, यावेळी सीएम अरविंद केजरीवालही तिथे दाखल झाले आहे. ते म्हणाले, 'या विषयावर कोणतेही राजकारण होऊ नये. यूपी, मध्य प्रदेश, राजस्थान, मुंबई किंवा दिल्लीमध्ये अशी घटना का घडली पाहिजे? देशात बलात्काराच्या घटना घडू नयेत. संपूर्ण देशाची अशी इच्छा आहे की दोषींना कडक शिक्षा व्हावी. यावेळी पीडितेच्या कुटूंबास शक्य तितक्या मदतीची आवश्यकता आहे.'
दिल्ली येथील जंतर मंतरवर हाथरस प्रकरणाबाबत मोठे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनामध्ये घडलेल्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सामील झाले आहेत.
वर्धा जिल्ह्यातील 'सेवाग्राम आश्रम', जिथे महात्मा गांधी स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी राहिले होते त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा, असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
सोलापूर: भारतीय चलना सारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा सोलापुरात तयार करणे सुरु असल्याची माहिती विजापूरनाका पोलिसांना गुप्तहेरांमार्फत मिळाली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सापळा रचून संशयित आरोपींना रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याकडून 1 लाखा पर्यंतच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
उत्तर प्रदेशात माता-बहिणांच्या स्वाभिमानाला धक्का पोहचवण्याचा विचार करणार्या कठोर शासन दिले जाणार आहे. त्यांना अशी शिक्षा मिळेल जी भविष्यात इतरांसाठी उदाहरण असेल. युपी सरकार प्रत्येल माता-बहिणीचं रक्षण करण्यासाठी कटबद्ध असेल. अशी माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीटर वरून दिली आहे.
‘Atal Tunnel, Rohtang’च्या उद्या उद्घाटनापूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून आज पाहणी करण्यात आली आहे. यावेळी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर देखील उपस्थित होते.
भारतामध्ये आज (2 ऑक्टोबर) महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त दिल्लीमध्ये राजघाट येथील स्मृतिस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राजकीय मंडळींनी हजेरी लावत आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. दरम्यान मोदींनी ट्वीटरच्या माध्यमातून आपली आदरांजली अर्पण करताना, भारताला अधिक समृद्ध करण्यासाठी गांधीजींचे विचार प्रेरणा देतील.अशा आशयाचे ट्वीट करण्यात आले आहे.
पंतप्रधानांपाठोपाठ देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद देखील राजघाटावर आले होते. भारतामध्ये आज महात्मा गांधीजी यांच्यासोबतच लालबहादूर शास्त्री यांची देखील जयंती साजरी केली जात आहे.
दरम्यान देशामध्ये हाथरस येथील बलात्काराच्या घटनेनंतर त्याचे पडसाद संपूर्ण भारतामध्ये पहायला मिळत आहेत. काल कॉंग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी काल पीडितेच्या मुलीची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धक्काबुकी झाली. त्यावरून देखील कॉंग्रेस नेत्यांनी व अन्य विरोधकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी कॉंग्रेस नेते निदर्शनं करणार आहेत. आज कृषिविधेयकाचादेखील आंदोलनादरम्यान निषेध करण्यात आला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
भारतामध्ये कोरोना व्हायरस संकटाचा धोका देखील अद्याप कायम आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)