पुणे शहरात आज नव्याने 1,762 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या 57,523 झाली आहे. तर 1,203 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या 18,040 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता 2,81,840 झाली असून आज 2,585 टेस्ट घेण्यात आल्या.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची आणि आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरक्षा परिस्थितीबाबत बैठक पार पडली. डीजीपी सुबोध कुमार जयस्वाल आणि मुंबई पोलिस आयुक्त परम बीर सिंह हेही या बैठकीला उपस्थित होते.
बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना मुंबईच्या नानावटी रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 11 जुलै पासून ते हॉस्पिटलमध्ये दाखल होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटीव्ह असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्यांनी स्वतः ट्वीटरच्या माध्यमातून ही बातमी देताना त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटीव्ह असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्यांनी स्वतः ट्वीटरच्या माध्यमातून ही बातमी देताना त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे.
महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना काल मातृशोक झाला असून आज जालना मध्ये शारदाबाई टोपे यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान मागील 3-4 महिन्यांपासून राजेश टोपे आईचं आजारपण सांभाळत राज्यातील कोरोना परिस्थिती सांभाळत होते. एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत ते नाशिक, पुणे दौर्यावर होते. अनेक कोरोना हॉटस्पॉटच्या जागीदेखील त्यांनी भेट दिली होती.
दरम्यान मुंबईकडून आता गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या चाकरमान्यांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. अनेक गावामध्ये मुंबई, पुण्यातून येणार्या चाकरमान्यांसाठी 14 दिवस क्वारंटीन राहण्याचे नियम आहेत. तर यामुळे अनेक मुंबई-गोवा मार्गावर देखील मोठी रांग पहायला मिळत आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
सध्या तलावक्षेत्रामध्ये पाणी कमी असल्याने मुंबई- पुण्यामध्ये पाणी कपातीचं संकट घोंघावत आहे. दोन्ही मुख्य शहरांमध्ये पाणीसाठा कमी आहे.