19-Minute 34-Second Viral Video: व्हायरल व्हिडिओ काय आहे? मूळ लिंक शोधणे किंवा शेअर करणे ठरू शकते मोठा गुन्हा

सोशल मीडियावर गेल्या काही काळापासून '१९ मिनिटे ३४ सेकंदांचा व्हिडिओ' (19 Minute 34 Second Viral Video) या नावाने खाजगी व्हिडिओ आणि लिंक्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य, यामागील एआय आणि सायबर फसवणुकीचे धोके याविषयी सविस्तर वृत्त.

सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म्सवर गेल्या काही काळापासून '१९ मिनिटे ३४ सेकंदांचा व्हिडिओ' (19 Minute 34 Second Viral Video) हा कीवर्ड प्रचंड ट्रेंड होत आहे. एका जोडप्याचा खाजगी व्हिडिओ असल्याचा दावा करत नेटिझन्सकडून याच्या लिंक्स शोधल्या आणि शेअर केल्या जात आहेत. मात्र, सायबर गुन्हेगारी आणि पोलीस विभागाच्या तपासानुसार, या ट्रेंडच्या नावाखाली इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर अफवा, डीपफेक (Deepfake AI) व्हिडिओ आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या लिंक्स पसरवल्या जात आहेत. असा कोणताही अक्षेपार्ह मजकूर डाऊनलोड करणे किंवा शेअर करणे हा गंभीर कायदेशीर गुन्हा असून यामुळे युजर्स मोठ्या संकटात सापडू शकतात.

सायबर पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मूळ खाजगी व्हिडिओ लीक झाल्यानंतर सोशल मीडियावरील अनेक युजर्स आणि ट्रोलर्सनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी या प्रकरणाचा गैरवापर सुरू केला. इंटरनेटवर या व्हिडिओचे 'सीझन २', 'पार्ट २' किंवा 'पार्ट ३' या नावांनी जे व्हिडिओ उपलब्ध आहेत, ते पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आले आहेत. यामध्ये अनेक निष्पाप मुली आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचे चेहरे मॉर्फ करून त्यांना विनाकारण बदनाम केले जात असल्याचे समोर आले आहे.

लिंकच्या नावाखाली सायबर स्कॅमचे जाळे

या ट्रेंडचा फायदा घेत सायबर भामट्यांनी इंटरनेटवर फसवणुकीचे मोठे जाळे विणले आहे. टेलिग्राम, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामवर 'ओरिजिनल व्हिडिओ लिंक' (Original Link) देण्याच्या बहाण्याने ज्या लिंक्स शेअर केल्या जात आहेत, त्या प्रत्यक्षात मालवेअर (Malware) किंवा फिशिंग लिंक्स आहेत. या संशयास्पद लिंक्सवर क्लिक केल्यास युजर्सच्या मोबाईलचा ताबा सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकतो, तसेच बँक खात्यातून पैसे चोरीला जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक युजर्सचे बँक अकाउंट यामुळे रिकामे झाले असल्याच्या नोंदी समोर आल्या आहेत.

कायदेशीर कडक कारवाई आणि जेलची हवा

भारतीय कायद्यानुसार, कोणत्याही व्यक्तीची संमती नसताना तिचा खाजगी किंवा अश्लील व्हिडिओ पाहणे, डाऊनलोड करणे किंवा इतरांना फॉरवर्ड करणे हा आयटी कायद्यांतर्गत (IT Act) अत्यंत गंभीर गुन्हा मानला जातो.

माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६७ ए: या कलमांतर्गत कोणत्याही अश्लील किंवा लैंगिक कृत्य दर्शवणारा मजकूर इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर प्रसारित केल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी ५ वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि १० लाख रुपयांपर्यंत दंड होऊशको.

कलम ६६ ई: कोणत्याही व्यक्तीच्या खाजगी क्षणांचे फोटो किंवा व्हिडिओ तिच्या संमतीशिवाय सार्वजनिक केल्यास ३ वर्षांची जेल होऊ शकते.

नागरिकांना प्रशासनाचे आवाहन

डिजिटल जगतात कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याचा आणि गोपनीयताचा (Privacy) आदर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सोशल मीडियावरील कमेंट सेक्शनमध्ये "लिंक प्लीज" (Link Please) असे लिहिणे किंवा अशा पोस्टवर मीम्स बनवणे देखील गुन्ह्याला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. सायबर पोलिसांनी नागरिकांना कडक इशारा दिला आहे की, अशा प्रकारच्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये आणि असे व्हिडिओ ग्रुप्सवर फॉरवर्ड करणे तातडीने थांबवावे, अन्यथा थेट पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement