पुण्यात आज 193 नव्या रुग्णांची नोंद; 10 जणांचा मृत्यू; 19 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

मुंबई सह महारामध्ये सोबत देशा-परादेशातील घडामोडी, कोरोना बद्दलचे अपडेट्स, कोरोना विषाणूबद्दल माहिती आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लेटेस्टली मराठीला नक्की भेट द्या.

20 May, 04:50 (IST)

महाराष्ट्रात मुंबईनंतर सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण पुणे शहरात आढळून आले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 193 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 10 जणांचा मृत्यू झाला आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

20 May, 04:15 (IST)

1 जून पासून दररोज 200 नॉन एसी रेल्वे गाड्या धावणार आहेत, असं रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं आहे.

 

20 May, 03:26 (IST)

लॉकडाउनच्या काळात अवैध मद्य विक्री व वाहतूक केल्याप्रकरणी 5797 गुन्हे दाखल; आतापर्यंत 2601आरोपींना अटक तर, 15 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. एएनआयचे ट्वीट-

 

 

20 May, 02:54 (IST)

महाराष्ट्रात सर्वाधित कोरोनाबाधित रुग्ण मुंबई शहरात आढळून आले आहेत. मुंबईत आज 1 हजार 411 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 43 जणांचा मृत्यू झाला आहे. एएनआयचे ट्विट- 

 

 

20 May, 02:30 (IST)

सुरुवातीला कोविड 19 रूग्णांना ठेवण्यासाठी पलंगाची काही कमतरता जाणवली परंतु आता आम्ही तयार आहोत असा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. एनएससीआय डोम, एमएमआरडीए मैदान आणि इतर ठिकाणी व्यवस्था केल्यावर आता कोविड रूग्णांसाठी  15000 बेड्स आणि आयसीयूसाठी 2000 बेड उपलब्ध आहेत असेही टोपे यांनी म्हंटले आहे. याशिवाय खाजगी रुग्णालयातील 80% बेड सुद्धा सरकारच्या ताब्यात घेण्याचा विचार आहे.

20 May, 01:51 (IST)

घाटकोपर येथील पंत नगर भागातील एका गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांवर 'समोसा पार्टी' आयोजित करून लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष आणि पक्षाचे संयोजक यांना अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आले. पुढील चौकशी सुरू आहे अशी माहिती  मुंबई पोलिसांनी दिली आहे.

20 May, 01:13 (IST)

महाराष्ट्रात आज कोरोनाचे 2100 नवे रुग्ण आढळले आहेत, यानुसार राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या 37,158 वर पोहचली आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.

20 May, 24:59 (IST)

मुंबईतील धारावीत आज 26 नवीन कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदली गेली आहेत. यानुसार आजवर कोरोनाचे एकूण 1,353 धारावी मध्ये आढळले आहेत. याबाबत मुंबई महानगरपालिकेकडून माहिती देण्यात आली आहे. 

 

20 May, 24:36 (IST)

देशात एका दिवसात 1,08,233 नमुन्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत एकूण 24,25,742 नमुन्यांची चाचणी घेण्यात आल्या आहेत. यापैकी 1  लाख 11 हजार 39 चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या आहेत अशी माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

20 May, 24:18 (IST)

पश्चिम बंगाल मध्ये अम्फान चक्रीवादळाची चाहूल लागली असून आज संकध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. दिघा या भागात हा जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या अंदाजानुसार उद्या अम्फान चक्रीवादळ पश्चिम बंगाल मध्ये धडकण्याची  शक्यता आहे.

20 May, 24:07 (IST)

मुंबईच्या बेस्ट मधील आणखीन 9 कर्मचाऱ्यांना COVID19 ची बाधा झाली आहे. यासोबतच बेस्टमधील एकूण सकारात्मक प्रकरणे आता 177 वर पोहचली आहेत

19 May, 23:57 (IST)

कऱ्हाडे ब्राम्हण संघाच्या वतीने कोरोनाविरुद्ध लढ्यात पुणे महापालिकेला वैद्यकीय साहित्याची मदत करण्यात आली. यात 100 पीपीई किट, 100 एन 95 मास्क, 100 बाटली सॅनिटायझर, 100 होमियोपॅथी बाटल्यांच्या गोळ्या देण्यात आल्या. या मदतीबद्दल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सर्वांचे आभार मनात माहिती दिली आहे.

19 May, 23:40 (IST)

आम आदमी पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून भाजप ला गरिबांच्या विरुद्ध म्हणत एक ट्विट करण्यात आले आहे.

19 May, 23:31 (IST)

कोरोना व्हायरस संबंधित खोटे मॅसेज पाठवून त्यामार्फत स्मार्टफोन मध्ये व्हायरस पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे असा इशारा सीबीआय तर्फे केंद्रशासित प्रदेश व राज्यांना देण्यात आला आहे. याविषयी संबंधित अधिकाऱ्यांनी खबरदारी बाळगावी असे सुद्धा सीबीआयने सूचित केले आहे.

19 May, 23:16 (IST)

गेल्या 24 तासांत BSF मधील 3 जणांना  झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कालपासून 22 बीएसएफ जवानांना  दिल्लीतील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 214 जण बरे झाले आहेत. तर एकूण 144 जवानांवर उपचार सुरु आहेत.

19 May, 22:53 (IST)

अम्फान चक्रीवादळामुळे केरळमध्ये मान्सूनच्या आगमनात थोडा उशीर होण्याची शक्यता हवामान खात्याचे प्रमुख मृत्युंजय मोहपात्रा यांनी वर्तवली आहे. 5 जूनपर्यंत मान्सून केरळ किनाऱ्यावर पोचेल असे अंदाज हवामान खात्याने व्यक्त केले आहेत.

19 May, 22:14 (IST)

बंगालच्या उपसागारातील Cyclone Amphan पूर्वे किनारपट्टीला येत्या दोन  दिवसात धडकणार असल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील 2 दोन पश्चिम बंगाल मध्ये ट्रेनने मजुरांना आणणं थांबवा अशी विनंती केली आहे.

19 May, 21:16 (IST)

आज महाराष्ट्र सरकारने राज्यात लॉकडाऊन 4 ची नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये आता रेड झोन आणि इतर व कंटेन्मेंट झोन अशी वर्गवारी असेल. पहा कुठे काय मिळणार?

19 May, 20:41 (IST)

यंदा कोव्हिड 19 च्या संकटामुळे परदेशी शिक्षणासाठी जाण्याचा प्लॅन रद्द करणार्‍या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून JEE-Mains 2020 साठी अर्ज करण्यासाठी 24 मे पर्यंत  मुदत देण्यात आली आहे.

19 May, 19:45 (IST)

आज श्रीनगरमध्ये सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत 2 जणांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. दरम्यान जम्मू कश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शस्त्रसाठा आणि हत्यारं जप्त करण्यात यश आली आहेत.

Read more


महाराष्ट्रामध्ये आज सकाळी एका अपघातामध्ये 4 स्थलांतरित मजुरांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. दरम्यान सोलापूर कडून झारखंडच्या दिशेने प्रवास करणार्‍या ट्रकचा यवतमाळ नजिक अपघात झाला. ट्रक आणि बसच्या धडकेमध्ये बसमधील 15 प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत. काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मजुरांना सबुरी ठेवण्याचा सल्ला दिला आहे. स्थलांतरित मजुरांची त्यांच्या मूळ गावी नेण्याची योग्य व्यवस्था केली जाईल असा विश्वास त्यांनी सरकारच्या वतीने दिला आहे.  न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड आणि एम आर शाह यांनी 11 मे दिवशी अर्णब यांच्या विरोधातील  निकाल राखीव ठेवला होता. यामध्ये पालघर मॉब लिंचिंग सोबतच वांद्रे स्थानकाबाहेरील मजुरांच्या गर्दी प्रकरणाचा समावेश होता.

दरम्यान मुंबईकरांना देखील आता पोलिसांनी सज्जड दम दिला आहे. 18 मे पासून लॉकडाऊन 4 सुरू झालं आहे. अद्याप राज्यात रेड झोनला सवलती देण्यात आलेल्या नाही त्यामुळे विनाकारक गाड्या घेऊन रस्त्यावर फिरणं टाळा. अन्यथा कडक कारवाईला सामोरं जावं लागेल असे सांगण्यात आलं आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

सध्या राज्यांराज्यामध्ये वाहतूकीला परवानगी आहे. स्थलांतरित मजुरांसाठी श्रमिक स्पेशल ट्रेन चालवल्या जात आहे. देशभरात कोरोना बाधितांचा सध्या एक लाखाच्या जवळ पोहचला आहे. महाराष्ट्रातही काल सलग दुसर्‍या दिवशी 24 तासामध्ये 2 हजारापैक्षा अधिक कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now