कोवॅक्सिनची (Covaxin) तिसऱ्या टप्प्यातील चाचणी 20 नोव्हेंबरपासून सुरू; 18 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
अनलॉक आणि दिवाळ सणाचे निमित्त करुन नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. त्यामुळे त्याचा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास काही निमित्त ठरले का, हे कळायला आणखी काही दिवस जावे लागतील खरे. परंतू, सध्या तरी कोरोना रुग्णांची घटती संख्या दिलासादायक ठरत आहे.
कोवॅक्सिनची (Covaxin) तिसऱ्या टप्प्यातील चाचणी 20 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. 200 स्वयंसेवकांना त्यांच्या शरीरविरोधी प्रतिसादाचा अभ्यास करण्यासाठी लवकर लस दिली जाईल. पहिल्या डोसच्या 28 दिवसानंतर 2 डोस दिले जातील. यामध्ये लसची कार्यक्षमता 90 टक्क्यांपेक्षा जास्त असेल अशी अपेक्षा असल्याचे मत कुलगुरू, पीजीआय रोहतक, हरियाणा यांनी व्यक्त केली.
झारखंड मध्ये 251 नव्या रुग्णांसह राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,06,742 वर पोहोचली बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 3 हजार 171 इतकी झाली आहे.
तामिळनाडू: Pethikuttai Reserve Forest जवळील शेतात आज सकाळी विद्युत धक्क्याने एका हत्तीचा मृत्यू झाला. चौकशी दरम्यान असे आढळले की, जमिनीच्या मालकाने शेतातील जंगली डुकरांना रोखण्यासाठी कुंपणाचे विद्युतीकरण केले होते.
मध्य प्रदेशः आज इंदूरमध्ये गुन्हेगार साजिद चंदनवाला यांची मालमत्ता जमीनदोस्त करण्यात आली. याबाबत डीआयजी इंदौर म्हणतात, 'आम्ही यापूर्वी अशा ड्राइव्ह चालवल्या आहेत. आता आम्ही जिल्हा प्रशासन व पालिका मिळून गुन्हेगारी कार्यात सहभागी असलेल्या लोकांची अशी अवैध अतिक्रमणे पाडण्यासाठी एकत्रितपणे कारवाई केली आहे.'
मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 871 रुग्णांची नोंद झाली असून, आज 1372 रुग्ण बरे झाले आहेत व 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे एकूण रुग्णांची संख्या 2,71,525 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 2,48,711 रुग्ण बरे झाले असून, 10,612 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात 8,658 सक्रीय रुग्ण आहेत.
महाराष्ट्रात आज कोरोना व्हायरसच्या 5,011 रुग्णांची नोंद झाली. यासह एकूण संक्रमितांची संख्या 17,57,520 वर पोहोचली आहे. आज 100 मृत्यूंची नोंद झाली असून, एकूण मृत्यूंची संख्या 46,202 वर गेली आहे.
मध्य प्रदेशः 'कॉम्पूटर बाबा'ला आज इंदूरच्या कोर्टाने जामीन मंजूर केला. तलवारीने एका व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती.
सलग 11 व्या दिवशी भारतामध्ये दररोज 50,000 पेक्षा कमी नवीन कोरोना विषाणू प्रकरणे अधली आहेत. मागील 24 तासांत 38,617 रुग्ण आढळले असून, 44,739 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या भारताचा रिकव्हरी रेट 93.52% वर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.
भारताचा भाग लडाख हा चीनमध्ये दाखविल्याबद्दल ट्विटरने लेखी दिलगिरी व्यक्त केली आहे, तसेच कंपनीने भारतीयांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागितली आहे. संसदीय समितीच्या अध्यक्ष मीनाक्षी लेखी यांनी पीटीआयला याबाबत माहिती दिली.
मृदुला सिन्हा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातन व्यक्त केल्या आहेत. श्रीमती मृदुला सिन्हाजी लोकसेवेच्या प्रयत्नांसाठी कायम लक्षात राहतील. त्या एक निपुण लेखिका होत्या. साहित्याबरोबरच संस्कृतीतही त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे तीव्र दु:ख होत आहे. त्यांच्या कुटुंबीयांबद्धल सहानभुती आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, 23 जानेवारी या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते. नेताजी सुबाषचंद्र बोस यांची जयंती राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर करावी.
भाजप खासदार मनोज तिवारी यांनी दिल्ली येथील केजरीवाल सरकारला 'नमक हराम' सरकार म्हणून संबोधले आहे. ज्या नागरिकांच्या जीवावर हे सरकार स्थापन झाले. त्यांच्याच विरोधात हे सरकार असल्याचा आरोप मनोज तिवारी यांनी केला आहे.
देशासह राज्यभरातील लॉकडाऊन अनलॉकच्या माध्यमातून शिथील करत आता अपवाद वगळता जवळपास संपुष्टात आणला गेला आहे. अशातच आणखी एक दिलासादायक वृत्त पुढे येत आहे. ते म्हणजे ज्या कोरोना व्हायरस संसर्गाच्या भीतीमुळे लॉकडाऊन लावण्यात आला तिच कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या कमालीच्या वेगाने घसरणीला लागली आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या काल पहिल्यांदाच 30 हजारांपेक्षाही कमी नोंदवली गेली. देशपातळीवरील आतापर्यंतची ही नोंद सर्वात निचांकी मानली जात आहे. अर्थात, अनलॉक आणि दिवाळ सणाचे निमित्त करुन नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. त्यामुळे त्याचा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास काही निमित्त ठरले का, हे कळायला आणखी काही दिवस जावे लागतील खरे. परंतू, सध्या तरी कोरोना रुग्णांची घटती संख्या दिलासादायक ठरत आहे.
अनलॉक करताना सर्व सेवा-सुविधा, दुकाने, कार्यालये सरु करण्यास परवानगी देण्यात आली. आता मंदिरे कधी उघडणार यासाठी आंदोनल करणाऱ्यांनाही सरकारने दिलासा देत मंदिरे उघडली. दरम्यान, आता शाळा कधी सुरु होणार याबाबत उत्सुकता होती. दरम्यान, राज्य सरकारने इयत्ता नववी ते 12 पर्यंतचे वर्ग येत्या सोमवारपासून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी शाळेत येणाऱ्या शिक्षकांसाठी कोरोना व्हायरस चाचणी करणे बंधनकारक आहे. असे असले तरी शिक्षकांनी घाबरण्याचे मुळीच कारण नाही. कारण, शिक्षकांसाठी ही चाचणी पूर्णपणे मोफत केली जाणार आहे.
बिहार विधानसभा निवडणूक 2020 मध्ये काँग्रेस पक्षाची कामगिरी अगदीच सुमार दर्जाची झाली. त्यामुले काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते कपील सिब्बल यांनी नेतृत्वावर जाहीर तोफ डागली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कपिल सिबल यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेस पक्षातील नेतेही आक्रमक झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसमधील नेत्यांकडून सिबल यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. आता हा वाद किती ताणला जातो याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, कोरोनाची रुग्णसंख्या घटली. ही दिलासादायक बाब नक्कीच आहे. परंतू, रुग्णसंख्या घटली म्हणून गाफील राहण्याचे काहीच कारण नाही. धोका अद्यापही टळला नाही. धोका कायम आहे. त्यामुळे सर्वच नागरिकांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यायची आहे. मास्क वापरणे, सतत हात धुणे, कारणाशिवाय गर्दीत जाणे टाळणे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी घराबाहेर जाणे टाळणे या बाब कटाक्षाणे पाळायच्या आहेत, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरस, जागतिक, स्थानिक राजकारण, शेती, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान, क्रीडा, संस्कृती, यांसह विविध क्षेत्रातील ठळक घडामोडींचा ताजा तपशील पाण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)