झारखंड मध्ये 23 नव्या रुग्णांसह राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1919 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत एकूण 11 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
आता संपूर्ण जगाला चीनशी व्यवहार करण्यात फारसा रस नसल्याने हे भारतासाठी चांगले संकेत आहे. जगातील ब-याच देशांना भारताशी व्यवहार करायचा अशून भारताने आता आयातीपेक्षा निर्यात वाढविले पाहिजे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसात, आतापर्यंत कोणताही जवान गंभीर नाही, सर्व स्थिर आहेत. 18 सैनिक लेह येथील रुग्णालयात आहेत व ते सुमारे 15 दिवसांसाठी आपले कर्तव्य बजावणार नाहीत. 58 सैनिक इतर रुग्णालयात आहेत व ते एका आठवड्यात परत कर्तव्यावर रुजू होतील.
कोविड-19 प्रकरणांची वाढती संख्या लक्षात घेता, रुग्णालयांमध्ये आयसीयू बेडची संख्या वाढवण्याची व्यवस्था दिल्ली सरकार करीत आहे, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत माहिती दिली.
मुंबईत आज दिवसभरात 1298 रुग्णांसह शहरात कोरोना बाधितांची एकूण संख्या 62,799 वर पोहोचली आहे अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 518 रुग्ण बरे झाले असून 67 रुग्ण दगावले असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
राज्यात आज 3752 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 120504 इतकी झाली आहे. आज नवीन 1672 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 60838 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 53901 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
धारावीत आज 28 जणांना कोरोना व्हायरसचे संक्रमण झाले आहे. त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 2134 वर पोहोचली आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने माहिती दिली आहे.
कर्नाटकमध्ये आज 210 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 7944 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 114 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
काँग्रेसमध्ये कोणत्याही पद्धतीची नाराजी नाही असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली त्यानंतर थोरात यांनी हे विधान केले आहे.
देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून त्याचा आकडा आता 354056 वर पोहचला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात नियमात शिथीलता जरी आणल्यानंतर नागरिकांची गर्दी पहायला मिळत आहे. यापूर्वीच कोरोनाच्या रुग्णांची अधिक वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुद्धा पार पडली. आता या पुढे देशात लॉकडाऊन लागू करणार नसून अनलॉकची प्रक्रिया पार पडणार असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या संकटानंतर भारत आणि चीन मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्व लद्दाख मधील गलवान खोऱ्यात चीनच्या सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात देशाचे 20 जवान शहीद झाले. यावरून नरेंद्र मोदी यांनी भारताला शांतता हवी असून चिथावणी दिल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात येईल अशा इशारा चीनला देण्यात आला आहे. तसेच शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असे ही मोदी यांनी म्हटले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तसेच पेट्रोल-डिझेलच्या किंमती गेल्या काही दिवसांपासून वाढत आहेत. तर आज पेट्रोल किंमतीत 0.53 पैशांची वाढ होऊन 77.81 रुपये झाले आहे. तर डिझेलच्या किंमतीत 0.64 पैशांची वाढ झाली असून 76.43 प्रति लीटर झाले आहे. या किंमती दिल्लीसाठी असणार आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)