मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट; 18 जानेवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

19 Jan, 05:19 (IST)

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली आहे. ट्वीट-

 

19 Jan, 05:15 (IST)

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील रामपूर सेक्टरमध्ये पाकिस्तानने  शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

19 Jan, 04:21 (IST)

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दिलेल्या प्रतिसादाबद्दल भाजपने जनतेचे आभार मानले आहेत. ट्विट-

 

19 Jan, 03:28 (IST)

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. ट्विट-

 

19 Jan, 03:07 (IST)

वाशीम जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. आमदार अमीत झानक, जिल्हाध्यक्ष दिलीप सरनाईक आणि काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन!, अशा आशयाचे ट्विट काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. ट्विट-

 

 

19 Jan, 02:14 (IST)

गुजरात येथे कोरोनाचे आणखी 495 रुग्ण आढळल्याने आकडा 2,56,367 वर पोहचला आहे.

19 Jan, 02:05 (IST)

गुरुग्राम मध्ये खासगी विमानाचे 40 वर्षीय  वैमानिक यांचा द्वारका एक्सप्रेस वे येथे रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

19 Jan, 01:43 (IST)

महाराष्ट्रात पार पडलेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचा 80 टक्के विजय झाला आहे.

19 Jan, 01:09 (IST)

राजस्थान येथे अल्पवयीन मुलीचा शेतात  मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून अधिक तपास सुरु असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे.

19 Jan, 24:54 (IST)

Amazon Prime वरील Tandav या सीरिज बद्दल निर्मात्यांनी भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे म्हणत  माफी मागितली आहे.

19 Jan, 24:43 (IST)

देशात 18 जानेवारी पर्यंत 1,48,266 जणांना कोरोनाची लस दिली गेल्याची आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.

19 Jan, 24:25 (IST)

गाझियाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि फरीदाबा येथील हवेच्या गुणवत्तेची अधिक नित्कृष्ट दर्जाची नोंद करण्यात आली आहे. 

19 Jan, 24:13 (IST)

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतली आहे.

18 Jan, 23:54 (IST)

मार्च ते डिसेंबर पर्यंतच्या गाळे भाड्यावर कोणताही दंड आकारला जाणार नसल्याचा महापालिकेचा निर्णय घेतल्याने गाळेधारकांना दिलासा मिळाला आहे.

18 Jan, 23:36 (IST)

अर्णव गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यामधील लीक झालेल्या चॅट्बद्दल अधिक माहिती घेत असून त्यात बालकोट एअरस्ट्राइक आणि पुलवामा हल्ल्याबद्दल संवाद होता असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

18 Jan, 23:10 (IST)

नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या परेडमध्ये राफेल फायटर जेट सहभागी होणार  असल्याची माहिती दिली गेली आहे.

18 Jan, 22:57 (IST)

उत्तर प्रदेशात गेल्या 6 महिन्यात फक्त 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

18 Jan, 22:46 (IST)

दिल्लीतील RML रुग्णालयात 69 हेल्थवर्कर्संना कोरोनाची लस दिली गेली आहे.

18 Jan, 22:36 (IST)

पश्चिम बंगालमधील  कोलकातामध्ये बीजेपी च्या रॅलीत बीजेपी कार्यकर्त्यांवर दगडफेक  करण्यात आली आहे.

18 Jan, 21:36 (IST)

केंद्रीय अर्थमंत्री यंदाच्या अर्थसंकल्पापूर्वी आज देशभरातील सार्‍या राज्यांच्या, केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थ मंत्र्यांसोबत घेणार बैठक घेणार आहेत.

Read more


महाराष्ट्रामध्ये आज ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालाचा धुरळा उडणार आहे.राज्यात काही ठिकाणी बिनविरोध निवडणूका पार पडल्या आहेत. मात्र काही ठिकाणी चुरशीच्या निवडणूका पहायला मिळणार आहेत. राज्यात सत्ता समीकरणं बदलल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने आता ग्रामीण पातळीवर त्याचे काही पडसाद दिसतात का? हे पहावं लागणार आहे. काही ठिकाणी आमदारांच्या गावांमध्ये त्यांच्या राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या पहायला मिळाल्या आहेत. पुण्यामध्ये आज विजयी मिरवणूका काढता येणार नाही. फटाके फोडणं, गुलाल उधळणं यावर बंदी आहे.

दरम्यान देशामध्ये शेतकरी आंदोलन कायम आहे. नवे 3 कृषी कायदे रद्द करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. त्यानंतर आता आज सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यावर सुनावणी होणार आहे. येत्या 26 जानेवारी म्हणजे भारताच्या प्रजासत्ताक दिनी शेतकरी ट्रॅक्टर रॅली काढणार आहे. दिल्ली मध्ये दुसरीकडे लष्कराकडून रिपब्लिक डे ची तयारी जोरदार सुरू आहे. राजपथावर त्याची रंगीत तालीम सुरू आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

कृषी कायद्यांवरून निर्माण झालेला तेढ सध्या देशात कायम आहे. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने 12 जानेवारीला पुढील आदेशापर्यंत नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेऊन हा तिढा सोडवण्यासाठी शिफारशी करण्याकरिता चार सदस्यांची समितीही नियुक्त केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now