महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण ; 18 फेब्रुवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

शेतकरी आंदोलन, राजकारण, समाज, संस्कृती, क्रीडा, विज्ञाण, कोरोना व्हायरस, कोरोना लस यांसर स्थानिक, प्रादेशीक आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटना, घडामोडींचा ताजा तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी सोबत जोडलेले राहा.

19 Feb, 05:17 (IST)

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

19 Feb, 04:33 (IST)

मध्य प्रदेश: मंडला जिल्ह्यातील बाम्हनी भागात आज पहाटे बसचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात घडला. यामध्ये एकाचा मृत्यू आणि 12 जण जखमी झाले आहे. एएसपी गजेंद्रसिंग कंवर यांनी सांगितले की, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

19 Feb, 04:01 (IST)

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर मधील बाटमलू भागात आज पहाटे SSB च्या छावणीला आग लागली.

19 Feb, 03:28 (IST)

उत्तर प्रदेशात मागील 24 तासांत 1,20,384 कोरोनाच्या चाचण्या झाल्या असून आतापर्यंत राज्यात एकूण 3 कोटी 37 हजार 25 नमुने तपासण्यात आले आहेत.

19 Feb, 03:21 (IST)

स्पुटनिक व्ही लस ची चाचणी भारतात तिस-या टप्प्यात आली असून मार्चच्या मध्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी माहिती एफएस हर्षवर्धन श्रृंगला यांनी दिली आहे.

19 Feb, 03:05 (IST)

मुसळधार पावसामुळे मानसरोवर स्टेशनात हार्बर मार्गावरील गाड्या थांबविण्यात आल्या आहेत अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाने दिली आहे.

19 Feb, 02:24 (IST)

अमरावती, यवतमाळ आणि अकोला येथील अधिक कोरोना रुग्ण असलेले भाग containment zone म्हणून जाहीर करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

19 Feb, 02:05 (IST)

IPL 2021 Auction: अर्जुन तेंडुलकर 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे.

19 Feb, 01:34 (IST)

Coronavirus in Mumbai: मुंबईत आज 736 नवे कोविड-19 रुग्ण आढळून आले असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

19 Feb, 01:00 (IST)

एका इमारतीत 5 हून अधिक कोरोना रुग्ण आढळल्यास इमारत सील करण्यात येईल, असे BMC आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले. त्याचबरोबर लग्नसोहळ्याचे हॉल, क्लब आणि रेस्टोरन्ट्स यांच्यावर वेळोवेळी धाड टाकून तिथे नियमांचे उल्लंघन होत नाही, हे तपासले जाईल. ब्राझीलहून परतणाऱ्या प्रवाशांना इंस्टीट्युशनल क्वारंटाईन होणे गरजेचे आहे. अधिक रुग्ण आढळणाऱ्या भागात चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात येईल.

19 Feb, 24:58 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 20 फेब्रुवारी रोजी Governing Council of NITI Aayog ची सहावी बैठक- PMO

19 Feb, 24:47 (IST)

Coronavirus in Maharashtra: आज राज्यात 5,427 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 38 जणांना मृत्यू झाला आहे. तर 2,543 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

एकूण रुग्णसंख्या: 20,81,520

कोरोनावर मात केलेल्यांची संख्या: 19,87,804

सक्रीय रुग्ण: 40,858

मृतांचा आकडा: 51,669

19 Feb, 24:17 (IST)

कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे यवतमाळ जिल्ह्यात निर्बंध; लॉकडाऊन नाही

18 Feb, 23:46 (IST)

औरंगाबाद येथे फक्त 10 वी आणि 12 वीचे वर्ग सुरु राहतील. इतर विद्यार्थ्यांना 28 फेब्रुवारी शाळेत जाणे बंधनकारक नाही.

18 Feb, 23:22 (IST)

अमरावती जिल्ह्यात 21 फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. शनिवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत.

18 Feb, 23:06 (IST)

उत्तराखंड दुर्घटना: 61 मृतदेह आणि 28 शरीराचे अवयव बाहेर काढण्यात आले. 34 मृतदेह आणि 1 शरीराचा भाग यांची ओळख पटली असून 56 कुटुंबातील सदस्य आणि 49 मृतदेहाचे डीएनए नमुने घेण्यात आले आहेत, अशी माहिती चामोली पोलिसांनी दिली आहे.

18 Feb, 22:20 (IST)

विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस विक्रमी यश मिळवेल, असा विश्वास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे.

18 Feb, 21:53 (IST)

सिलीगुडी येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्तांनी इंधन दरवाढीविरधात मोर्चा काढला.

18 Feb, 21:13 (IST)

 

कोरोना व्हायरस संसर्गाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. त्यामुळे क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. क्वारंटाईन असलेली व्यक्ती जर बाहेर फिरताना आढळली तर त्या व्यक्तीवर थेट एफआयआर केला जाणार आहे.

18 Feb, 20:57 (IST)

आता देशभरात जाऊन 40 लाख ट्रॅक्टर्स एकत्र आणले जातील. काही अडचण आली तर हे शेतकरीही तेथे आहेत आणि ट्रॅक्टर्सही. हे ट्रॅक्टर पुन्हा दिल्लीला जातील. या वेळी नांगर क्रांती होईल. शेतकरी आपले नांगर घेऊन रॅलीत सहभागी होतील, असा इशारा शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे.

Read more


महाराष्ट्रासोबतच देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus ) संकट आता हळूहळू नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. असे असतानाच हे संकट पुन्हा आव्हान म्हणून उभे राहणार का? असा सवाल उपस्थित होण्यासारखे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना (Coronavirus In Maharashtra) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार पाठीमागील 24 तासात राज्यात तब्बल 4,787 जणांना कोरोना व्हायरस संक्रमण झाल्याचे पुढे आले आहे. तर तब्बल 40 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत राज्यात 3,853 जणांना कोरोनातून डिस्चार्जही मिळाला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण आणि त्यात वनमंत्री संजय राऊत यांचा होणारा उल्लेख यावरुन महाविकासआघाडी सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. त्यात वनमंत्री संजय राठोड हे कोणाच्याही संपर्कात नाहीत. त्यामुळे चर्चेला अधिकच उधान आले आहे. महाविकासआघाडी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही या प्रकरणावरुन प्रसारमाध्यमांनी विचारणा केली. यावर अजित पवार म्हणाले. ते नॉट रिचेबल असले तरी आमच्या संपर्कात आहेत. गायब नाहीत. येत्या गुरुवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलतील अशी महिती आहे.

भारतात आज सलग 10 व्या दिवशी पेट्रोल डिझेल दरांनी उच्चांग गाठला आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात प्रचंड वाढ होताना दिसत आहे. पाठिमागील 18 दिवसांमध्ये 12 वेळा पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. गेल्या काही दिवासांमध्ये पेट्रोल तब्बल 34 रुपयांनी महागले आहे. तर डिझेल 32 रुपये प्रतिलिटर दराने वाढले आहे. देशभरातील पेट्रोल डिझेलचे दर खालील प्रमाणे.

शहर            पेट्रोल           डीजल

मुंबई             96.32       87.32

दिल्ली           89.88      80.27

चेन्नई             91.98       85.31

कोलकाता    91.11         83.86

नोएडा           88.39      80.70

शेतकरी आंदोलन, राजकारण, समाज, संस्कृती, क्रीडा, विज्ञाण, कोरोना व्हायरस, कोरोना लस यांसर स्थानिक, प्रादेशीक आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटना, घडामोडींचा ताजा तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी सोबत जोडलेले राहा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now