कोल्हापूरमध्ये आयकर निरीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची माहिती समोर आली आहे. एसीबीने ही कारवाई केली आहे. एका डॉक्टरकडून कारवाई टाळण्यासाठी त्याने 10 लाखांची लाच मागितली होती. ट्विट-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला माहिती तंत्रज्ञान विभागाचा आढावा. महानेटच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टरांशी साधला संवाद. पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. तसेच महानेट यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश दिले आहेत. ट्वीट-
बीडमध्ये हार्डवेअर प्लायवूडच्या दुकानात रसायनाचा स्फोट झाल्याने एकाचा मृत्यू झाला आहे, तर अन्य दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बीड शहरातल्या जिजामाता चौक परिसरात घडली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. सध्या स्फोटच्या कारणांचा पोलिस तपास घेत आहेत.
महाराष्ट्रामध्ये आज कोरोना विषाणूच्या 3,994 रुग्णांची व 75 मृत्यूंची नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या 18,88,767 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत 48,574 जणांचा मृत्यू झाला आहे.
अहमदाबाद शहर रुग्णालयात कोरोना व्हायरसचा उपचार घेत असलेल्या 59 वर्षीय व्यक्तीला तब्बल 113 दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचे म्हणणे आहे की, ही बहुधा सर्वात जास्त काळ रुग्णालयात कोरोना व्हायरसचा उपचार घेत असलेली व्यक्ती असावी.
सोलापूरच्या करमाळा परिसरात गेले काही दिवस बिबट्याने धुमाकूळ घातला होता. याआधी भिवरवाडी येथे बिबट्याने गाई व वासरावर हल्ला केला होता. आता मिळालेल्या माहितीनुसार या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात आले आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) तामिळनाडू सरकारला कांचीपुरम कृषी कार्यालयात शौचालयाची सुविधा नसल्याबद्दल नोटीस बजावली आहे. यामुळे या ठिकाणी 7 डिसेंबर रोजी एका महिला वेअरहाऊस व्यवस्थापकाचा मृत्यू झाला होता.
संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे सायबर सल्लागार अमित शर्मा यांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते, आत्मनिर्भरतेचा अग्नि पुरस्कार मिळाला. सायबर डोमेनमध्ये हा पुरस्कार प्राप्त करणारे ते सर्वात तरुण आहेत.
अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सौम्य इंफेक्शन असून प्रकृती ठीक आहे. पण वैद्यकीय सल्ल्यानुसार 7 दिवस सेल्फ आयसोलेशनमध्ये राहणार आहेत.
जे लोक शेतकर्यांना MSP देऊ शकत नाहीत, त्यावर खरेदी करू शकत नाही तेच MSP वरून शेतकर्यांना भरकटवत आहेत असा आरोप PM नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर लगावला आहे.
बॉक्सर आणि कॉंग्रेस नेता विजेंद्र सिंह कृषी कायद्याविरोधात शेतकर्यांच्या समर्थनासाठी सिंधू बॉर्डरवर पोहचला आहे. त्याने हा लढा सरकार विरूद्ध नाही तर 3 काळ्या कायद्याविरुद्ध असल्याचं म्हटलं आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशातील शेतकर्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारा संवाद साधणार आहेत. दरम्यान सध्या देशात कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनं तीव्र होत आहेत. शेतकरी हे कायदे रद्द करण्यासाठी 23 दिवस आंदोलनं करत आहेत. केंद्रीय नेत्यांसोबत शेतकरी नेते चर्चा करत आहेत मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता मोदी या चर्चेमध्ये काय संबोधित करणार? याकडेच सार्यांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात आता कोरोना आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. मात्र अनेकांचं लक्ष आता लसीकरण मोहिमेकडे लागलं आहे. कोरोना वायरसच्या थैमानानंतर त्याचा खात्मा करण्यासाठी भारत लसीकरणासाठी सज्ज होत आहे. यामध्ये केंद्रीय पथकाकडून मंजुरी मिळाल्यानंतर तात्काळ राज्यात लसीकरण सुरू होऊ शकतं असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्ह्टलं आहे. तसेच काल त्यांनी कर्मचार्यांना दिलेल्या दिलासादायक बातमी दिली आहे. यामध्ये आता कोरोनाबाधित राज्य सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय खर्च परत दिला जाणार आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
महाराष्ट्रात जानेवारी 2021 पर्यंत लसीकरणाला सुरूवात होऊ शकते. त्यासाठी लसीकरणाकरिता प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. नाव नोंदणी सुरू आहे. कोविड योद्धे, आरोग्य कर्मचारी, को मॉर्बिडीटी असलेले रूग्ण यांचा पहिल्या टप्प्यांत समावेश आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)