फेसबुक आणि इंस्टाग्राम यांची सेवा याक्षणी डाऊन; 17 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
कोरोनाव व्हायरस, राजकारण, अर्थकारण, खेळ, उद्योग, कृषी, गुन्हे आणि यांसह विविध क्षेत्रातील ताज्या घटना घडामोडी तपशीलासह जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग सोबत जोडलेले राहा.
फेसबुक आणि इंस्टाग्राम यांची सेवा याक्षणी डाऊन झाली आहे. वेबसाइट लोड करण्याचा प्रयत्न करताना एक एरर मेसेज दिसत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.
राज्यसभेचे खासदार अशोक गस्ती यांना न्यूमोनिया आणि कोरोना व्हायरसचे निदान झाले होते, 2 सप्टेंंबर पासुन त्यांंच्यावर मणिपाल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते आज 10:30 वाजता त्यांंचे निधन झाले आहे, ते 55 वर्षांंचे होते.
लोकसभेत ऐतिहासिक कृषी सुधारणा विधेयक मंजूर होणे हा देशातील शेतकरी व कृषी क्षेत्रासाठी महत्वाचा क्षण आहे. या विधेयकावरुन शेतकर्यांना भटकवण्याचा प्रयत्न झाला पण हे विधेयक मध्यस्थ व इतर अडचणींपासून तुम्हाला मुक्त करेल असे मी शेतकर्यांंना आश्वासन देतो. एमएसपीआणि सरकारी खरेदीची व्यवस्था कायम राहील. हे विधेयक शेतकर्यांंना बळ देईल अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी दिली आहे.
अंदमान आणि निकोबारमध्ये आज 11 नवीन कोरोना विषाणू रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संक्रमितांची संख्या 3,604 वर पोहोचली आहे. यामध्ये 52 मृत्यू व 174 सक्रीय रुग्णांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ऐतिहासिक कोसी रेल मेगा पूल देशाला समर्पित करतील. पंतप्रधान बिहारच्या हितासाठी प्रवासी सुविधांशी संबंधित इतर रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटनही करतील, रेल्वे मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.
महाराष्ट्र राज्यात आज 24,619 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 19,522 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 8,12,354 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 3,01,752 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 70.90% झाले आहे. राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या 11,45,840 वर पोहोचली आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 2,389 रुग्णांची नोंद झाली आहे, यासह एकूण संक्रमितांची संख्या 1,78,275 वर पोहोचली आहे. आज मुंबईमध्ये 1,173 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 1,36,739 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये 32,849 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज शहरामध्ये कोरोनाच्या 43 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण 8,320 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बीएमसीने याबाबत माहिती दिली.
मराठा आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाच्या स्थगिती आदेशाला महाराष्ट्र सरकार आव्हान देईल असे महाराष्ट्र मंत्री आणि कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
मुंबई पोलिसांकडून नवे नियम शहरात लागू करण्यात आले नसल्याची आदित्य ठाकरे यांची माहिती दिली आहे. त्यामुळे त्रस्त होण्याची काहीच गरज नसल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे गरीब, वंचित आणि शोषितांची सेवा करणे असे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय ठप्प झाले असताना महाराष्ट्र सरकारने बेरोजगार तरुणांना एक दिलासा दिला आहे. कोरोना संसर्गाच्या पारश्वभूमीवर कोणतीही सरकारी नोकर भरती बंद असताना राज्य सरकारने पोलिसांना मात्र या बंदीतून वगळले आहे. त्यामुळे राज्यत लवकरच तब्बल 12, 528 पदांसाठी मेगा पोलीस भरती होणारआहे. राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक नुकतीच पार पडली. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमूख यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. विशेष बाब म्हणून पोलीस भरतीस राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
राज्यात आणखी एक विषय सध्या नाजूक ठरला आहे. तो म्हणजे मराठा आरक्षण. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली. त्यामुळे राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या भावना राज्य सरकारला माहिती आहे. राज्य सरकार मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या न्याय हक्कांपासून तसूभरही मागे हटणार नाही. तसेच, मराठा आरक्षणाला न्यायालयाने दिलेल्या स्थगितीवर पुढची दिशा काय ठरवायची याबाबत अंतिम निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाज आरक्षण या विषयावर नुकतीच एक सर्वपक्षीय बैठकही पार पडली आहे.
देश आणि राज्यातील विविध प्रश्न अधिक गंभीर होऊन पुढे येत असताना कोरोना व्हायरस संकट अद्यापही कायम आहे. हे संकट केवळ कायमच नाही तर दिवसेंदिवस अधिक गंभीर रुप धारण करत आहे. राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमितांची एकूण संख्या 10 लाखाच्याही पुढे गेली आहे. तर, देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 50 लाखांच्या पुढे गेली आहे. सरासरी मृत्यूचे प्रमाण टक्केवारीत पाहिले तर ते कमी दिसते आहे. परंतू, एकूण आकडा अधिक वाटतो आहे, अशी स्थिती आहे.
दरम्यान, कोरोनाव व्हायरस, राजकारण, अर्थकारण, खेळ, उद्योग, कृषी, गुन्हे आणि यांसह विविध क्षेत्रातील ताज्या घटना घडामोडी तपशीलासह जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग सोबत जोडलेले राहा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)