औरंगाबाद जिल्ह्यात आज 286 जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत 33351 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 257 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 36456 झाली आहे. ट्वीट-
केरळमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत रजेवर होते. तसेच अनेक संधी देण्यात आल्या तरीही या आपल्या कर्तव्यावर रुजू होण्याकडे कोणताही कल न दाखवणाऱ्या 432 वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह 385 डॉक्टरांना बडतर्फ केले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री के. शैलजा यांनी दिली आहे. पीटीआयचे ट्वीट-
ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 02 भिवंडीमधील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये 'महिला तक्रार निवारण' दिनानिमित्त बैठक आयोजित करून लोकांच्या अडीअडचणी ऐकून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.
आजपासून देशभरात नवरात्रोत्सवास सुरुवात झाली आहे. मात्र, यंदा नवरात्रोत्सवावर कोरोना विषाणूचं संकट आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतात 73 लाखाहून अधिक जणांना या विषाणूची लागण झाली आहे. मात्र, कोरोनाच्या संसर्गातून बरे होणाऱ्यांची संख्यादेखील अधिक आहे. त्यामुळे आतापर्यंत सुमारे 64 लाखाहून अधिक जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
दरम्यान, आजपासून महिला प्रवाशांना मुंबई आणि उपनगरीय रेल्वे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. परंतु, असं असलं तरी मध्य रेल्वे प्रशासनाने सरसकट सर्व महिलांना प्रवासाची परवानगी देता येणार नसल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर गोंधळाचे वातावरण निर्माण झालं आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
याशिवाय राज्यात परतीच्या पावसामुळे पुणे, औरंगाबाद आणि कोकण या तीन विभागांना मोठा तडाखा बसला आहे. या विभागात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे आतापर्यंत 48 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील या परिस्थितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कल्पना दिली असून पंतप्रधानांनी महाराष्ट्राला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.