मुंबईमध्ये गेल्या 24 तासात 1,823 नवे कोरोना रुग्ण सापडले असून 1,644 जणांना डिस्चार्ड देण्यात आला आहे. याशिवाय दिवसभरात 37 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2,38,548 इतकी झाली आहे.
मुंबईतील महिला चाकरमान्यासाठी उद्यापासून लोकलसेवा चालू होणार होणार आहे. महिलांना सकाळी 11 ते 3 व सायंकाळी 7 नंतर लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
यंदाच्या नीट परीक्षेचा निकाल थोड्याच वेळात जाहीर केला जाईल दरम्यान काही वेळापूर्वीच नीट परीक्षेची Final answer key जारी करण्यात आली आहे. तर निकाल विद्यार्थी ntaneet.nic.in किंवा nta.ac.in वर पाहू शकतील.
जगभरातील युजर्ससाठी ट्विटर आज पहाटे ठप्प झालं होतं. दरम्यान दीड-दोन तासांनंतर ते पुन्हा सुरळीत सुरू झालं आहे. काही वेळापूर्वीच युजर्ससाठी ट्वीटरकडून माहिती देण्यात आली आहे. 'सिस्टीममध्ये काहीसा बिघाड झाल्याने सेवा ठप्प झालेली असू शकते हॅकिंग किंवा सुरक्षेच्या दृष्टीने कोणता धोका असल्याची माहिती नाही असे सांगत त्यांनी सेवा पूर्ववत केली आहे.
महाष्ट्रामध्ये परतीच्या पावासाने पुन्हा धुमाकूळ घातला आहे. निम्म्या महाराष्ट्राला मागील 2-3 दिवसात झोडपून काढले आहे. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. 17 ऑक्टोबर पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. आज मुंबईसह कोकण किनारपट्टीला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
मुंबईमध्ये प्रवासासाठी अद्याप लोकल ट्रेन सुरू झाल्या नसल्या तरीही हळूहळू व्यवहार सुरू झाले आहे. आजपासून वर्दळीसाठी मुंबई मेट्रो सुरू झाली आहे. घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो सेवा आता खुली करण्यात आली आहे. मात्र त्यामध्ये मर्यादीत आसनव्यवस्था उपलब्ध आहे. तसेच आज मेट्रोकडून नियमावली जारी करण्यात आली आहे.