गोव्यात कोरोना व्हायरसच्या आणखी 9 रुग्णांची नोंद, राज्यात एकूण 29 प्रकरणांची नोंद;17 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

18 May, 05:07 (IST)

गोव्यात कोरोना व्हायरसच्या आणखी 9 रुग्णांची नोंद, अशाप्रकारे राज्यात एकूण 29 प्रकरणांची नोंद झाली आहे. यामध्ये सध्या एकूण 22 सक्रीय रुग्ण असून, 7 जण रिकव्हर झाले आहेत.

 

18 May, 04:52 (IST)

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कोविड 19 च्या मृतांचा आकडा आजच्या 9 मृत्युंसह 114 वर पोहोचला. ठाणे शहरातील 88 आणि नवी मुंबईतील 62 रुग्णांसह आज 252 नवीन प्रकरणांची नोंद झाली. यासह एकूण रुग्णांची संख्या 3,684 अशी झाली आहे.

18 May, 03:49 (IST)

पुण्यात आज दिवसभरात 201 कोरोना संक्रमित रुग्णांची भर, तर 53 रुग्ण कोरोनामुक्त.आज एकूण 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

18 May, 03:13 (IST)

देशांतर्गत प्रवासी उड्डाण संचालनावर आणि आंतरराष्ट्रीय व्यापारी प्रवासी सेवांवरील बंदी 31 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. नागरी उड्डाण संचालक (DGCA) यांनी याबाबत माहिती दिली.

18 May, 02:50 (IST)

नेपाळ सरकार कोरोना व्हायरसचे प्रवक्ते डॉ. युवराज खतिवडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जूनपर्यंत नेपाळमध्ये लॉकडाउन वाढविण्यात आला आहे.

18 May, 02:27 (IST)

कोरोना विषाणूने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात थैमान घातला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित मुंबईत आढळून आले आहेत. मुंबईत करोनाबाधितांच्या संख्येने  20 हजारांचा आकडा ओलांडला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

 

18 May, 02:14 (IST)

कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजवला आहे. राज्यात दिवसभरात तब्बल 2 हजार 347 रुग्णांची भर पडली आहे. तर, 63 जणांचा मृत्यू झाला आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

18 May, 01:28 (IST)

मुंबई येथील धारावी परिसरात कोरोना विषाणूचे जाळे मोठ्या वेगाने पसरत चालले आहे. धारावीत आज 44 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 242 वर पोहोचली आहे. तर, कोरोनाबळींची संख्या 56 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

18 May, 01:21 (IST)

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जेष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, 10 वर्षाखालील मुलांनी गरज नसल्यास बाहेर पडू नये, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहे. एएनआयचे ट्वीट-

 

18 May, 24:53 (IST)

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, जलतरण तलाव, बार आणि सभागृह, 31 मेपर्यंत देशभरात बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

 

18 May, 24:38 (IST)

कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. एएनआयचे ट्विट- 

 

18 May, 24:16 (IST)

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने भारत सरकारची मंत्रालये/विभाग, राज्य सरकारे व राज्य अधिकारी यांना, 31 मे 2020 पर्यंत राष्ट्रव्यापी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करणे चालू ठेवण्यास सांगितले आहे. 

 

17 May, 23:32 (IST)

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा गोळीबारात शहीद झालेल्या पोलीसांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाहली श्रद्धांजलीगडचिरोली जिल्ह्यातील कियरकोटीच्या जंगलात नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या शोधमोहीमेवर नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षक धनाजी व्हनमाने आणि जवान किशोर आत्राम यांना वीरमरण आले. दोघांनाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी श्रद्धांजली वाहली. ट्वीट- 

 

17 May, 22:28 (IST)

एअर इंडियाचे उड्डाण बुकिंग सध्या बंद आहे आणि भारत सरकारकडून निर्देश मिळाल्यानंतर पुन्हा सुरू होईल असे सांगत एअर इंडियाचे देशांतर्गत उड्डाणे पुन्हा सुरु झाल्याच्या बातम्यांबाबत कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे.

17 May, 22:06 (IST)

भामरागड येथील पोयरकोठी-कोपर्शी जंगला नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 2 सुरक्षा रक्षकांचा मृत्यू तर 3 जण जखमी झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.

17 May, 21:48 (IST)

वंदे भारत मिशन अंतर्गत ओमान हून 103 भारतीयांना तिरुअनंतपुरमला घेऊन येणा-या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विशेष विमानाने उड्डाण केले आहे.

17 May, 20:43 (IST)

महाराष्ट्रापाठोपाठ तमिळनाडूतही लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवले असल्याची घोषणा तमिळनाडू सरकारने केली आहे. 

 

17 May, 20:31 (IST)

राजस्थान येथे आणखी 123 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 1963 वर पोहचला आहे.

17 May, 20:14 (IST)

महामार्गावरुन  प्रवास करताना गाडीवर FASTag नसल्यास, वॅलिडिटी संपली किंवा कार्यरत नसल्यास टोल प्लाझावर दुप्पट टोल वसूली करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

17 May, 20:00 (IST)

देहरादून येथे कोरोनाबाधितांचा आकडा 92 वर पोहचला असून आज नवा एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला आहे.तर 52 जणांची आतापर्यंत प्रकृती सुधारली आहे.

Read more


[Poll ID="null" title="undefined"]सध्या संपूर्ण देश कोरोनाविरुद्ध एक मोठी झुंज देत आहे. ही लढाई जिंकण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. मात्र यात देशवासियांना कोणत्याही आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आत्म निर्भर भारत अभियान'( Atma Nirbhar Bharat Abhiyan) या नव्या पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज काय असले याबाबत माहिती देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग 4 पत्रकार परिषद घेत आहेत. आज सकाळी 11 वाजता निर्मला सीतारमण 'आत्म निर्भर भारत अभियान' पॅकेजची अखेरची माहिती देणार आहेत. या पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व देशवासियांचे या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देखील आज काही घोषणा करण्याची शक्यता आहे.

जगभरात मृत्यूचे तांडव सुरु केलेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) भारतातही कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 85,940 वर पोहोचली आहे. यात आतापर्यंत 2752 रुग्ण दगावले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 30, 153 रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याचेही सांगण्यात येत आहे. सद्य स्थितीत देशात 53,035 रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

तर महाराष्ट्रामध्ये 1606 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद झाली, यासह राज्यातील संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 30,706 झाली आहे. सध्या 22,479 सक्रीय रुग्ण असून, कोरोना विषाणूमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या आजच्या 67 रुग्णांसह 1135 झाली आहे. राज्यात 524 लोक बरे झाले असून, आतापर्यंत 7088 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत 884 नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, यासह एकूण रुग्णांची संख्या 18396 वर गेली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now