भवानी पेठेतील एका राहिवासी इमारतीमधील ४८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या संपूर्ण इमारतीत ५८४ जणांचे स्त्राव नमुने घेतले असून पैकी १३१ जणांचे अहवाल प्राप्त त्यात ४८ जणांना लागण झालेली आहे.
दिवसभरात राज्यातील ८२६८ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री. अवैध मद्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी केलेल्या धडक कारवाईत आतापर्यंत ५६०८ गुन्ह्यांची नोंद, २५२० आरोपींना अटक तर १५ कोटी १७ लाखांचा मुद्देमाल जप्त- उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप
काही दिवसांपूर्वी वूहान येथे कोरोना विषाणू सकारात्मक रुग्ण आढळल्यानंतर आता चीन, कोविड-19 साठी दररोज 1.5 दशलक्ष Nucleic Acid Tests करण्याच्या तयारीत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात आज दिवसभरात 1606 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 67 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 30706 वर पोहोचली आहे. यातील 22479 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.
पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने २०२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे. यात खासगी रुग्णालये ९९, नायडू-महापालिका रुग्णालये ९६ आणि ससूनमधील ७ रुग्णांचा समावेश आहे.
मुंबईत 18 हजार 396 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. दिवसभरात 884 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, गेल्या 24 तासात 238 जणांनी कोरोनावर मात केली आहे. एएनआयचे ट्वीट-
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे संकट गडद होत असल्याचे चिन्ह दिसू लागली आहेत. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस आपल्या जीवाची बाजी लावून कर्तृव्य बजावत आहे. दरम्यान, कोरोना विषाणूशी लढत असताना पोलीस निरीक्षक अमोल हनुमंत कुलकर्णी यांचा मृत्यू झाला आहे. यातच महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी धारावीतील शाहूनगर पोलीस ठाण्याला भेट देऊन अमोल कुलकर्णी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहली आहे. एएनआयचे ट्वीट-
कोरोनामुळे मुंबई शहरात दिवसेंदिवस मृतांच्या संख्येत वाढ होत असताना दादर, माहीम, धारावी येथे आज एकाही मृत्यूची नोंद नाही, अशी माहिती एनएनआय वृत्त संस्थेने दिली आहे. एएनआयचे ट्विट-
दिल्ली येथे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज सुखदेव विहार उड्डाणपुलावर आपपल्या घरी परतणाऱ्यासाठी इच्छुक असलेल्या स्थलांतरित कामगारांशी संवाद साधला आहे. एएनआयचे ट्वीट-
जम्मू-काश्मीर: कुलगाम जिल्ह्यातील फ्रिसल भागात दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. एएनआयचे ट्वीट-
विमान क्षेत्राच्या विकासासाठी 3 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. देशातील 6 विमानतळांचा विकास करणार असून विकासासाठी पीपीपी मॉडलिंगचा वापर केला जाणार आहे. विमान क्षेत्राचा विकास केल्यास 1 हजार कोटींची बचत होऊ शकते.
संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भर करण्यासाटी 'मेक इन इंडिया' आवश्यक असून काही शस्त्रात्रांचा आयातीवर निर्बंध घालण्यात येणार आहेत. त्यामुळे संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता येण्यास मदत होईल. संरक्षण क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक 49% वरुन 74% वर करण्यात आली आहे.
कोळसा उत्पादन वाढीवर भर देणार असून त्यासाठी 50 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. तसंच खाजगी कंपन्यांनाही कोळसा उत्पादनाची मुभा देण्यात आली आहे.
कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे सर्व क्षेत्रात आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली असून त्यात सुधारणा करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे गुंतवणूक वाढवून रोजगार निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. बँकींग क्षेत्रात अधिक सुधारणा करायच्या आहेत. असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.
कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. तर सरकारसमोरील आव्हानं वाढत आहेत. दरम्यान स्थलांतरीत मजूरांना घरी परतण्यासाठी श्रमिक ट्रेन्स सुरु केल्या असल्या तरी अनेक मजूर जीवावर उदार होऊन मिळेल त्या मार्गाने प्रवास करताना दिसत आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून आजही उत्तर प्रदेशात मजूरांचा भीषण अपघात झाला. यात 23 जणांचा बळी गेला असून 15 जण जखमी झाले आहेत.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसच्या वाढता प्रभाव भारत देशही अनुभवत आहे. दिवसभरात रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा चौथा टप्पा येत्या 2 दिवसांत सुरु होईल. परंतु, लॉकडाऊन 4.0 पूर्णतः वेगळ्या पद्धतीचा असणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र त्याचे स्वरुप आणि कालावधी लवकरच आपल्या समोर येईल.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसच्या संकटात मदत म्हणून भारताला व्हेंटिलेटर्स दान केले आहेत. कोविड 19 या अदृश्य शत्रूला संपवण्यासाठी भारत आणि अमेरिका लस तयार करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करत असल्याचेही ट्रम्प म्हणाले. तसंच या कोरोना विरुद्धच्या लढाईत आम्ही भारत आणि पंतप्रधान मोदी यांच्या सोबत आहोत. आपण एकत्रितपणे या अदृश्य शत्रूवर मात करु असेही आश्वासक वक्तव्य ट्रम्प यांनी केले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)