कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे लोकांनी एकत्र जमू नये म्हणून, पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश (सीआरपीसीचा कलम -144) लागू केला आहे. 31 मार्चपर्यंत हा आदेश लागू राहील. रवींद्र कदम, सह पोलिस आयुक्त, नागपूर यांनी ही माहिती दिली.
पाकिस्तानच्या सिंध आणि खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील प्रांताधिकार्यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही ठिकाणी कोरोना व्हायरसच्या अनुक्रमे 115 आणि 15 नवीन घटनांची पुष्टी करण्यात आली आहे. पाकिस्तानमधील एकूण पुष्टी झालेल्या प्रकरणांची संख्या आता 183 झाली आहे. कोरोना व्हायरसच्या बाबतीत एका दिवसातील ही सर्वात मोठी वाढ आहे.
मंत्रालयातील अधिकाऱ्याच्या भाऊ-वहिणीला कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मंत्रालयातील अधिकारीही टेस्टसाठी कस्तुरबात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला घरून काम करू देण्याची मुभा द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे
सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांना राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळी उशिरा केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना राज्यसभेवर उमेदवारी दिली आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सर्व महाविद्यालये, विद्यापीठ आणि अभियांत्रिकी महाविद्यालयीन परीक्षा, 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही घोषणा केली.
सध्या कोरोना व्हायरसमुळे देशात भीतीचे वातावरण आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित सोळाही व्यक्तींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त यांनी दिली आहे. तसेच पुणे जिल्हा वगळता विभागातील चारही जिल्ह्यात एकही पाॕझिटिव्ह रूग्ण आढळून आला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने घेतलेल्या पुढाकारांबाबत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याला संबोधित केले .सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, राज्य सरकारने निवडणूक आयोगालाही निवडणुका तहकूब करण्याची विनंती केल्याचे त्यांनी सांगितले आहे. या संकटाशी लढा देण्यासाठी सरकारसह नागरिकांनाही संयुक्त मोर्चेबांधणी करावी लागेल. तसेच नागरिकांनी घाबरू नये आणि शासनाने दिलेल्या सूचनांचे योग्य पद्धतीने पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केले आहे.
राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या सातव्या मजल्यावर तब्बल 40 व्हेंटिलेटरसह अतिदक्षता कक्ष सुरु करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ससून रुग्णालयाला तातडीने 5 कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी महत्वापूर्ण घोषणा केली आहे. तसेच नागरिकांनी सुरक्षित राहावे असे, आवाहन त्यांनी केले आहे. येत्या 31 मार्चपर्यंत शाळा, जलतरण तलाव, मॉल, बंद राहणार आहेत. याशिवाय कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा, सार्वजनिक वाहतुकीचा कमी वापर, लोकांमध्ये 1 मीटर अंतर ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत संपूर्ण जगात 6 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 70 हजारांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. यातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना सावधानी बाळगण्याचे आवाहन केले असून ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ट्वीट-
महाराष्ट्रातील वाढती कोरोना व्हायरसची दहशत पाहता आता धार्मिक स्थळ, देवस्थानं येथे मोठ्या प्रमाणात जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच विलीगीकरण कक्षात असलेल्यांच्या हाताच्या मागच्या बाजूला खास स्टॅम्प लावला जाणार आहे.
मुंबई मधील प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायक मंदीर पुढील आदेश मिळेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान मुंबईसह महाराष्ट्रात, देशात सध्या कोरोना व्हायरचा धोका पसरत आहे. त्यापार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात आली आहे. दरम्यान आता या फाशीविरूद्ध अक्षय, पवन अणि विनय International Court of Justice मध्ये पोहचले आहेत.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची दहशत पाहता आता विद्यापीठांच्या अंतिम परीक्षा, पालिका आणि पंचायत निवडणूका 3 महिने पुढे ढकलण्याची शिफारस आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस दहशतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह चीफ सेक्रेटरी ऑफ द स्टेट यांनी घेतली रिव्ह्यु मिटींग आहे. दरम्यान ही बैठल व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारा पार पडली. यावेळेस प्रत्येक जिल्ह्याचे मॅजिस्ट्रेट देखील उपस्थित होते.
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेशने आपल्याच वकील वृंदा ग्रोव्हर यांच्या विरुद्ध आपल्याला अंधारात ठेवल्याचे म्हणत दाखल केलेली याचिका आज सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. यापुढे मुकेश पुन्हा दया याचिका दाखल करू शकणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
भीमा कोरेगाव प्रकरणात संशयित गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे, या दोघांनाच स्वतः गुन्ह्याची कबुली देण्यासाठी तीन आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे. तसेच या दोघांनाही त्वरित स्वतःचे पासपोर्ट जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जगभरात वाढत चाललेला कोरोना व्हायरसचा विळखा आता अधिकच दहशत पसरवत आहे. यामध्येच इराण मध्ये अडकलेल्या 52 भारतीय विद्यार्थी आणि शिक्षक यांची आज सुटका करण्यात आली आहे. अद्याप इराणमधून सुटका करणार्यांची आता 389 वर पोहचली आहे. दरम्यान आज परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. यावेळेस त्यांनी एम्बेसी मध्ये काम करणार्या अधिकार्यांचे आभार मानले आहे. सध्या चीन पाठोपाठ कोरोना व्हायरसचे सर्वाधिक बळी इराणमध्ये गेले आहेत. धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात भाविक इराण, तेहरानमध्ये पोहचले होते.
महराष्ट्रातही कोरोनाचं सावट अधिक दाट झालं आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. मुंबई, पुणे, नागपूर सह राज्यात 33 रूग्ण आहेत. तर आता कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी महाराष्ट्रात चित्रपटगृह, नाट्यगृह यांच्यासह शाळा, कॉलेज 31 मार्च पर्यंत बंद ठेवली जाणार आहेत.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
मध्य प्रदेशामध्ये आज कमलनाथ सरकारची फ्लोअर टेस्ट होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या कॉंग्रेसला रामराम ठोकल्यानंतर तेथील विधानसभेतील कमलनाथ सरकार धोक्यात आल्याची चर्चा होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)