लातूर मेडिकल कॉलेजला विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्था नाव देण्यास मान्यता; 15 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
केवळ अमरावती येथील विद्यार्थिनींची शपथ, सीएए, एनआरसी, कोरोना व्हायरसच नव्हे तर देशातील आर्थिक मंदी सदृश्य स्थिती, महाविकास आघाडी सरकारचे निर्णय, विरोधकांचे राजकारण, शेती, शिक्षण, आरोग्य, जागतिक घडामोडी यांसारख्या विविध विषयांमधील, क्षेत्रांमधील अपडेट्सही आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. म्हणूनच जोडलेले राहा लेटेस्टली मराठीसोबत.
लातूर मेडिकल कॉलेजला विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्था म्हणून नाव देण्यात येणार आहे. लातूर (ग्रामीण) चे माजी आमदार त्र्यंबक भिसे यांनी मागणी केलेल्या या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली.
जेरूसलेम महापालिका आणि भारत-इस्रायल चेंबर ऑफ कॉमर्स फेडरेशनतर्फे, मुंबईत उद्या आशियातील पहिला जेरूसलेम मुंबई उत्सव पार पडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या मैदानात सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत हा उत्सव पार पडेल.
14 फेब्रुवारी रोजी, अमरावतीच्या महिला कला व वाणिज्य महाविद्यालयात मुलींना प्रेम विवाहाविरोधात शपथ घ्यायला लावली होती. त्यानंतर या घटनेबाबत प्रचंड टीका झाली. आता या प्रकरणाबद्दल प्राचार्य राजेंद्र हावरे यांनी लेखी दिलगिरी व्यक्त केली आहे.
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर येथे आज टेम्पो आणि ट्रक मध्ये धडक झाल्याने एक अपघात झाल्याचे समजत आहे, यामध्ये तब्बल 25 जण गंभीर जखमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या अपघातग्रस्तांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाशिक मध्ये हिंगणघाट प्रकरणाचे पुनरावृत्ती झाली असून एका विवाहित महिलेला बस स्टॅन्ड वर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न झाल्याचेच समजतेय, यावर चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधून नेत, यापुढे 'सुट्टे पेट्रोल -ॲसीड विक्रीवर बंदी आणा' अशी मागणी केली आहे, तसेच महाराष्ट्रातील अजून किती मुलींना असे जळताना आपण पाहत राहणार आहेत असा संतप्त सवालही चित्रा यांनी केलेला आहे.
हिंगणघाट जळीतकांडाची घटना अजूनही ताजी असताना आज नाशिक- लासलगाव भागात सुद्धा असाच काहीसा प्रकार घडला आहे. लासलगाव बस स्थानकात उभ्या असलेल्या एका महिलेवर पेट्रोल ओतून 2 ते 3 मुलांकडून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समजतेय.
नाणार येथे रिफायनरीच्या कामाविषयी आज शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ख्यात असणाऱ्या सामना मध्ये जाहिरात आल्याने संतप्त नाणार वासियांनी थेट सामनाच्या कार्यालयातच धडक दिली आहे. शिवसेनेने या जाहिरातीचे स्पष्टीकरण द्यावे व आपली नेमकी भूमिका समोर मांडावे असे या नागरिकांचे म्हणणे आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात शाहीनबाग येथे धरणे आंदोलनाला बसलेल्या महिला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत. अमित शाह यांनी आंदोलकांसमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव मान्य करून उद्या, रविवारी या महिलांमधील काही प्रतिनिधी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत.
महाविकास आघाडी सरकार कोसळून राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असे भाजप नेत्यांचे भाकीत खोडून पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. खडसे यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नसल्याचा दावा केला आहे. नवी मुंबईत भाजपचं राज्यव्यापी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनाला संबोधित करताना खडसे यांनी हा दावा केला आहे.
शरद पवार यांनी जबाबदारी दिली म्हणूनच मुख्यमंत्री होऊ शकलो. अन्यथा ते आपले स्वप्नच नव्हते अशी प्रांजळ कबुली देत महाविकासआघाडी सरकारच्या स्थापनेची आणि मुख्यमंत्री होण्याचे श्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना दिले आहे.
जळगाव: मुक्ताईनगर आज मुक्त झाले. कोणापासून आणि कशापासून, हे आपल्याला माहिती आहे. बंधनात ठेवण्याचेही काम तुम्हीच करत होता असे उपस्थितांना उद्देशून बोलत कोणाचाही नामोल्लेख न करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टाोला लगावला आहे.
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकासआघाडी सरकार तत्पर आहे. शेतकरी हाच केंद्रबिंदू ठेऊन महाविकासआघाडी सरकार स्थापन झाले आहे. शेतकऱ्यांचे भले व्हावे हिच या सरकारची भूमिका असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
मुक्ताईनगरमध्ये अडचणींव मात करण्याची शक्तीआहे असे सांगत शरद पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे बोलत आहेत. मुक्ताईनगर हा भाजप नेते एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.
भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षासोबत जाणार नाही असे स्पष्ट करत नवी मुंबईमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढेण आणि स्वबळावर सत्ता आणेन असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला आहे.
चिकन खाल्ल्याने कोरोना व्हायरस होतो अशी अफवा सोशल मीडियावर पसरल्यामुळे नागपूरमधील चिकन, मनट मार्केटला मोठा धक्का बसला आहे. लोकांनी चिकन खाने सोडल्याने मार्केट ओस पडले आहे. त्यामुळे शेतकरी, चिकन मटन विक्रेते आदींनाही जोरदार फटका बसला आहे.
भाजपची साथ सोडून शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत हातमिळवणी केली. केवळ स्वार्थाने एकत्र आलेल्या या महाविकासआघाडी सरकारविरोधात रणनिती भाजपच्या राज्यस्तरीय परिषदेत ठरवली जाईल - विनोद तावडे
भारतीय जनता पक्षाची राज्यस्थरीय परिषद नवी मुंबई येथे पार पडणार आहे. या बैठकीपूर्वी भाजपची कार्यकारिणी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीनंतर विनोद तावडे हे पत्रकार परिषद घेत आहेत.
महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेले मतभेद उघडकीस येऊ लागले आहेत. मात्र, सरकार काही इतक्यात पडणार नाही. या सरकारमधील मतभेद हळूहळू वाढीस लागतील आणि ही आघाडी मोडून पडेल, असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शेतकरी मातीतून सोनं पिकवतो. त्याचा सन्मान झाला पाहिजे. सरकार आपलं आहे. हा सन्मान नक्की होईल. शेतकरी कर्जबाजारी आहे. त्याच्या समस्यांची सोडवणूक झाली पाहीजे. शेतकऱ्याला दिवसा वीज मिळायला हवी. याची सरकारला कल्पना आहे. त्या विषयावर काम सुरु आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जळगाव येथे म्हटले आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे स्थानक येथील एका महाविद्यालयाने 'व्हॅलेंटाइन डे'चे निमित्त साधत आपल्या विद्यार्थिनींना चक्क प्रेमविवाह नकरण्याची शपथ दिली. विशेष म्हणजे विद्यार्थिनींनीही ही शपथ घेतली आणि वादाला तोंड फुटले. व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day 2020) म्हणजे जगभरातील लोक आणि खास करुन प्रेमी युगुलांकडून साजरा केला जाणारा हटके उत्सव. भारतात त्याला विरोध आणि समर्थन अशा दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात. दरम्यान, अमरावती येथील शाळेतील प्रकार अनेकांसाठी धक्कादायक होता. या प्रकरणावर समाजातील विविध क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. हा वाद अद्यापही संपला नाही. त्यामुळे आज या वादाचे पडसाद कसे उमटतात त्याबाबत उत्सुकता आहे.
सीएए (CAA) , एनआरसी (NRC) या मुद्द्यांवरु देशभरात रान पेटले असून, त्याच्या समर्थन आणि विरोधात मोर्चे निघत आहेत. आंदोलने होत आहेत. दरम्यान, या सर्वात लक्षवेधी ठरला आहे ते दिल्ली येथील शाहीन बाग आंदोलन. सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात इथे गेली अनेक दिवस आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला देशभरातून अनेक नागरिक, संस्था संघटना पाठिंबा देत आहेत. काही सेलेब्रिटी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरही या आंदोलनाला शाहिन बाग येथे जाऊन पाठिंबा देत आहेत. प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यानेही इथे नुकतीच भेट दिली. दरम्यान, या विषयावर केंद्र सरकार, देशभरातील नागरिक आणि आंदोलक आज काय प्रतिक्रिया देतात, निर्णय घेतात यावरही लेटेस्टली मराठी नजर ठेऊन असणार आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) हा जगभरातील अनेक देशांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. भारताचा शेजारी असलेल्या चीन देशात या व्हायरसचा उगम झाला. एकट्या चीनमध्येच काही हजार लोकांचा बळी कोरोना व्हायरसने घेतला आहे. तर लक्षवधी लोकांना या आजाराची बाधा झाली आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस हा सध्या चिंतेचा विषय ठरला आहे. भारतातीलही अनेक नागरिक विविध देशांमध्ये, जहाजावर कोरोना व्हायरसमुळे अडकून पडली आहेत. भारत सरकार त्यांच्या संपर्कात आहे. या सर्व घटना घडामोडींचा तपशीलही आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत.
दरम्यान, केवळ अमरावती येथील विद्यार्थिनींची शपथ, सीएए, एनआरसी, कोरोना व्हायरसच नव्हे तर देशातील आर्थिक मंदी सदृश्य स्थिती, महाविकास आघाडी सरकारचे निर्णय, विरोधकांचे राजकारण, शेती, शिक्षण, आरोग्य, जागतिक घडामोडी यांसारख्या विविध विषयांमधील, क्षेत्रांमधील अपडेट्सही आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. म्हणूनच जोडलेले राहा लेटेस्टली मराठीसोबत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)