दिल्ली येथे आज आणखी 7 हजार 802 नव्या रुग्णांची नोंद, 91 मृत्यू; 13 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

14 Nov, 05:13 (IST)

दिल्ली येथे आज आणखी 7 हजार 802 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 91 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4 लाख 74 हजार 830 वर पोहचली आहे. ट्विट-

 

14 Nov, 05:09 (IST)

बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी धनयत्रोदशीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट-

 

14 Nov, 04:45 (IST)

दिवाळी निमित्त केरळच्या तिरुअनंतपुरममधील लोकांनी मिठाईच्या दुकानात भेट दिली आहे. ट्वीट-

 

14 Nov, 03:52 (IST)

पाकिस्तानकडून युद्धबंदीच्या उल्लंघनात जखमी झालेल्या एका जवानाचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे एकूण चार जवानांनी आपला जीव गमावला. भारतीय सेनाने याची माहिती दिली.

14 Nov, 03:36 (IST)

उत्तर प्रदेश प्रभारी म्हणून राधा मोहन सिंग यांची नियुक्ती करण्यात आली असून अरुण सिंग कर्नाटकचे नवीन प्रभारी म्हणून नियुक्त झाले आहेत. ट्वीट-

 

14 Nov, 03:10 (IST)

जम्मू काश्मीरच्या कैमोह कुलगाम येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात भीषण आग लागली आहे. ट्वीट-

 

14 Nov, 02:38 (IST)

अजित शर्मा यांची बिहार कॉंग्रेस लेजिस्लेटिव्ह पार्टी (CLP) नेते म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते भूपेश बघेल यांनी याबाबत माहिती दिली.

14 Nov, 02:13 (IST)

महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 4,132 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्ण संख्या 17,40,461 वर पोहोचली आहे. आज 127 रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यातील एकूण मृत्यूसंख्या 45,809 वर पोहोचली आहे.

14 Nov, 01:58 (IST)

अयोध्येत आज सरयू नदीच्या काठावर 5,84,572 मातीचे दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवामध्ये 'मोठ्या प्रमाणावर तेलाचे दिवे प्रज्वलित' करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला.

14 Nov, 01:46 (IST)

महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनुसार रेल्वे मंत्रालयाकडून, शालेय शिक्षक व शाळांमधील इतर शिक्षकेतर कर्मचार्‍यांना उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. स्थानकांवरील प्रवेशासाठी वैध ओळखपत्रे आवश्यक आहे. वेस्टर्न रेलवे पीआरओ नी याबाबत माहिती दिली.

14 Nov, 01:12 (IST)

2019-20 मध्ये उत्तीर्ण किंवा पुढील वर्गात घातलेल्या 1ली ते 9 वी तसेच 11 वीच्या विद्यार्थ्यांना कोविड परिस्थितीमुळे गुणपत्रिका मिळण्यात अडचणी येत आहेत.  विद्यार्थ्यांनी आर्थिक मदतीसाठी प्रमाणपत्रासह केंद्रीय सैनिक बोर्डाच्या http://ksb.gov.in वर 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

14 Nov, 24:44 (IST)

उत्तराखंड येथील गंगोत्री मंदिराचे पोर्टल हिवाळ्यासाठी 15 नोव्हेंबरपासून बंद असणार आहे.

13 Nov, 23:50 (IST)

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार असले, तरी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यात ही माहिती दिली. हिवाळी अधिवेशन मुंबईत घेतल्याने विदर्भावर अन्याय होत असल्याची विरोधकांकडून होत असलेली टीका पटोले यांनी खोडून काढली.

13 Nov, 23:07 (IST)

चेन्नईत एक व्यक्ती, त्याची बायको आणि मुलाची हत्या करण्यात आल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्रात 3 जणांना अटक करण्यात आली आहे. वैवाहिक वादामुळे हा खून झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

13 Nov, 22:43 (IST)

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत अयोध्येत दीपोत्सव सोहळ्यास प्रारंभ झाला आहे. दिवाळी कार्यक्रमात संध्याकाळी 5.51 लाख मातीचे दिवे प्रज्वलित केले जातील.

13 Nov, 22:25 (IST)

Drug Case: अर्जुन रामपाल याचा मित्र Paul Bartel याला NCB ने अटक केल्यानंतर कोर्टाने येत्या  25 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

13 Nov, 22:03 (IST)

जम्मू कश्मीर मध्ये पाकिस्तानकडून LOC च्या येथे करण्यात आलेल्या गोळीबारात 3 जणांचा बळी तर बहुतांशजण जखमी झाले आहेत.

13 Nov, 21:47 (IST)

जम्मू-कश्मीर येथे पाकिस्तानकडून पुन्हा एकदा LOC चे उल्लंघन करण्यात आले आहे.

13 Nov, 21:26 (IST)

सेनसेक्स 85.51 अंकांवर स्थिरावला असून 43,443 वर बंद झाला आहे.

13 Nov, 20:45 (IST)

Deepotsav2020:उत्तर प्रदेश मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल दीपोत्सव कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी दाखल  झाले आहेत.

Read more


देशात आजपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे. तर सर्वत्र आजच्या दिवशी धनतेरस साजरा केली जाणार आहे. हिंदूंसाठी धनतेसरचा दिवश शुभ मानला जात असून धन्वंतरीची पूजा केली जाते. तर सोशल मीडियात धनरतेसरच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या जात आहेत. दिवाळीची पहिली पहाट उद्या असणार असल्याने सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पुढील 3-4 दिवस दिसणार आहे. याच पार्श्वभुमीवर गुजरात मधील राजकोट येथील एका आर्ट गॅलरी मध्ये रांगोळी कलाकार महिलेने 100 विविध रांगोळ्या काढत आपली कला सादर केली आहे.

 

दुसऱ्या बाजूला अद्याप कोरोनाचे सावट देशावर कायम असून यंदाचा दिवाळीचा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात यावा असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. काही राज्यांनी फटाके विक्री किंवा फोडण्यावर बंदी घातली आहे. पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करावा असे ही म्हटले आहे.  तर दिवाळीचा सण आणि दिल्लीतील प्रदुषण पाहता तेथील नागरिकांना आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागणार  आहे. दिल्लीतील वायुची गुणवत्ता अधिक खराब झाल्याचे पहायला मिळत आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान,  सिरम इन्स्टिट्युटची कोविशील्ड लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. अंतिम टप्प्यातही ही लस पास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महिन्याअखेरपर्यंत कोविशील्ड लसीची चाचणी पूर्ण होईल. त्यामुळे कोरोना संसर्गावरील लस लवकरच उपलब्ध होणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now