Coronavirus In India: भारतात 24 तासांत 1229 नवे कोरोना बाधित रुग्ण; एकूण संक्रमितांची संख्या 21700 वर

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) आज दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी देशात कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) मरण पावलेल्या लोकांची संख्या वाढून 686 झाली आहे, तर एकूण संक्रमितांची संख्या 21700 वर पोहचली आहे

Coronavirus in India | Representational Image (Photo Credits: IANS)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) आज दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी देशात कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) मरण पावलेल्या लोकांची संख्या वाढून 686 झाली आहे, तर एकूण संक्रमितांची संख्या 21700 वर पोहचली आहे. आज देशात 1229 नवीन रुग्ण आणि 34 मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या देशात 16689 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व 4325 लोकांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे आणि एक रुग्ण दुसर्‍या देशात गेला आहे. संसर्गाच्या एकूण प्रकरणांपैकी 77 लोक परदेशी आहेत. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या कोरोना व्हायरसचे वाढण्याचे प्रमाण काही अंशी कमी झाले आहे.

आरोग्य मंत्रालयानुसार, सध्या देशात असे 12 जिल्हे आहेत जिथे मागील 28 दिवस किंवा त्याहून अधिक काळात कोरोनाची नवीन प्रकरणे आढळली नाहीत. आता असे एकूण 78 जिल्हे (23 राज्ये/केंद्रशासित प्रदेश) आहेत जिथे गेल्या 14 दिवसांत कोणतेही नवीन प्रकरण समोर आले नाही. सध्या देशात योजलेल्या उपाययोजनांमुळे ट्रान्समिशन कमी करण्यात, व्हायरसचा प्रसार कमी करण्यात आणि तो दुप्पट होणाचा दर वाढविण्यात यश आले आहे.

दरम्यान, 23 मार्च रोजी देशभरात 14,915 चाचण्या केल्या गेल्या होत्या, त्यानंतर आता 22 एप्रिल रोजी 5 लाखाहून अधिक चाचण्या केल्या आहेत. मात्र हे पुरेसे नसल्याचे मत एन्व्हायर्नमेन्ट सेक्रेटरी व अध्यक्ष सीके मिश्रा यांनी व्यक्त केले आहे. रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी सरकारने विविध केंद्रांवर कॉन्व्हॅलेसेन्ट प्लाझ्मा पद्धती वापरण्यास सुरवात केली आहे. यामध्ये बरे झालेल्या रुग्णांचे रक्त वापरून नवीन रुग्ण ठीक केले जातात. जे ठीक झाले आहेत असे रुग्ण मोठ्या संख्येने पुढे येऊन रक्तदानही करत आहेत. (हेही वाचा: सोनिया गांधी यांना देशातील कामगारांची चिंता; ‘लॉक डाऊन'मुळे 12 कोटी नोकऱ्या गेल्या, केंद्राने तातडीने गरिबांना 7500 रुपये द्यावेत’)

दरम्यान, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर मुंबई, इंदूर आणि जयपूरमध्ये कोरोना-संक्रमित लोकांची संख्या सातत्याने वाढत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif