ताजिकिस्तान मध्येही रात्री 10.31 च्या सुमारास जाणवले भूकंपाचे धक्के ; 12 फेब्रुवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

13 Feb, 04:28 (IST)

ताजिकिस्तान मध्येही रात्री 10.31 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. 6.3 रिश्टेर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता होती.

13 Feb, 04:24 (IST)

अमृतसर मध्ये रात्री 10.34 च्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. 6.1 रिश्टेर स्केल तीव्रता होती.

13 Feb, 04:15 (IST)

जम्मूसह दिल्ली, उत्तराखंड, नोएडा मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.

13 Feb, 04:12 (IST)

जम्मू च्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले

13 Feb, 04:04 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे झालेल्या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटूंबियांबद्दल ट्विटच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आणि जखमींसाठी प्रार्थना केली.

13 Feb, 03:45 (IST)

पुण्यात आज दिवसभरात कोरोनाचे नवे 258 रुग्ण आढळले आहेत. पुणे शहरातील एकूण संख्या आता  1, 94, 309 इतकी झाली आहे. शहरातील 350 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून, शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 1, 87, 995 झाली आहे.

13 Feb, 03:18 (IST)

तामिळनाडू: विरुधुनगरमधील फटाक्यांच्या कारखान्यात लागलेल्या आगीतील मृतांचा आकडा 16 वर पोहोचला आहे. सध्या 33 लोकांना रुग्णालयात दाखल केले आहे.

13 Feb, 02:28 (IST)

आँध्र प्रदेशात पर्यटकांची बस दरीत कोसळून 4 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

13 Feb, 02:11 (IST)

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आज मध्यरात्रीपासून 5 रुपयांनी कमी होणार असल्याची आसामचे अर्थमंत्री हिमंता शर्मा यांनी माहिती दिली आहे.

13 Feb, 01:46 (IST)

लोकसभेत Arbitration & Conciliation (Amendment) Bill, 2021 पास झाले आहे.

13 Feb, 01:28 (IST)

नोएडा, ग्रेटर नोएडा, गुडगाव आणि फरिदाबाद येथील हवेची गुणवत्ता खालावली गेली आहे.

13 Feb, 01:05 (IST)

देशातील 77,66,319 जणांना आतापर्यंत कोरोनाची लस दिल्याची आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.

13 Feb, 24:37 (IST)

तमिळनाडू येथे कोरोनाचे आणखी 483 रुग्ण आढळले असून 6 जणांचा बळी  गेला आहे.

13 Feb, 24:22 (IST)

लोकसभेचे कामकाज शनिवारी दुपारी 4 ऐवजी सकाळी 10 वाजता पार पाडले जाणार असे ओम बिर्ला यांनी म्हटले आहे.

12 Feb, 23:49 (IST)

जगभरात 229.7 लाख लसीचे डोस पाठवण्यात आल्याची माहिती अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.

12 Feb, 23:25 (IST)

टीएमसी पक्षातील राज्यसभेचे खासदार दिनेश त्रिवेदी यांनी एम वैकंय्या नायडू यांच्याकडे  पदाचा राजीनामा सोपवला आहे.

12 Feb, 23:17 (IST)

दिल्लीत कोरोनाचे आणखी 141 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 3 जणांचा बळी  गेला आहे.

12 Feb, 22:57 (IST)

तमिळनाडू मधील फटाक्यांच्या फॅक्ट्ररीत आग लागल्याच्या दुर्घटनेतील मृतांच्या परिवाला 2 लाखांची तर जखमींना 50 हजारांची आर्थिक मदत करण्याची पंतप्रधानांनी घोषणा केली आहे.

12 Feb, 22:42 (IST)

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत हे शेतकऱ्यांच्या सात विविध ठिकाणी पार पडणाऱ्या बैठकीला उपस्थितीत राहणार आहेत.

12 Feb, 22:33 (IST)

केंद्राला शेतीविषयक कायदे मागे घ्यावे लागतील, अन्यथा शेतकरी पंतप्रधानांना आपले सामर्थ्य दाखवतील, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गंगानगर येथील मेळाव्यात म्हटलं आहे.

 

 

Read more


महाराष्ट्रात काही जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील निवासी वसतिगृहात 75 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 500 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे नागपूरमध्ये 4 दिवसांत 1 हजार 398 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 1 लाख 37 हजार 498 इतकी झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोलचा दर 94.36 रुपये प्रतिलिटर असा आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दरम्यान, उत्तराखंडच्या चमोली येथे आपत्तीनंतर बचावकार्य सुरू आहे. आयटीबीपीबरोबरचं सैन्य दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक पोलिस मदतकार्यात सहभागी आहेत. आतापर्यंत 33 हून अधिक लोकांचे मृतदेह सापडले आहेत. याशिवाय बेपत्ता झालेल्या 170 लोकांचा शोध सुरू आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now